आषाढी अमावास्या “तमसो मा ज्योतिगर्मय”, असा संदेश देणारी, मंगलमय अशी मानली जाते...
हा दिवस 'दिव्यांची अमावास्या' म्हणून साजरा केला जातो.या दिवशी दिपपूजा केली जाते. कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे या दिवशी केले जातात. दूधा-तुपा सोबत गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो.
श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दिपपूजनाचा दिवस म्हणून पण ओळखली जाते.पूर्वीच्या काळी अंधारात आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जात असे. आदल्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांना लख्ख करून ठेवलं जायचं.
कारण
श्रावण दुसर्या दिवसापासून चालू होणार असतो.व हा अत्यंत
पवित्र धार्मिक महिना असतो.ह्या महिन्यात वेग वेगळी पूजा, व्रत
वैकल्य,अभिषेक
केले जातात.त्यामुळे ह्या सर्वासाठी जे पूजा साहित्य लागते
ते साफ करून श्रावण
महिन्यासाठी सज्ज करणे हा त्याचा उद्देश आहे.
मग आजच्या दिवशी सगळ्या दिव्यांना पाटावर मांडून त्यासमोर रांगोळी काढून,गंध-फुलांनी त्यांची मनोभावे पूजा केली जात असे. अशाप्रकारे, काळामिट्ट अंधार उजळून टाकणा-या ह्या चिमुकल्या सूर्यदूतांची पूजा करून त्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जात असे.
पण गेल्या काही वर्षांत आपण आषाढी अमावस्येला गटारी ठरवून, जणू काही भरपेट मांसाहार आणि मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच असलेली अमावस्या असे तिला रूप देऊन टाकले आहे.
आषाढी अमावस्येनंतर श्रावण सुरू होतो, त्यामुळे मांसाशन वर्ज्य मानले जाते. पुढच्या महिन्याभरात ते मिळणार नाही, ते आताच वसूल करून घेण्याकडे बहुतेकांचा कल असतो.
ह्या आषाढ अमावस्येला महाराष्ट्र , गुजरात, कर्नाटक , आंध्र प्रदेश या
राज्यात महत्त्वाचे स्थान
आहे.
दिपपूजा हि पंचमहाभूत (वायू, जल , अग्नी, आकाश व पृथ्वी ) व देवी लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांना समर्पित
केली जाते. पवित्र महिना असलेल्या श्रावण महिन्याचे स्वागत या दीपांनी केले जाते.
No comments:
Post a Comment