Latest News

ऋतूचर्या भाग-१



 
वैद्य शास्त्रात निसर्गा नुसार जगायला शिकवले जाते . सामान्यतः आपल्याला उन्हाळा, पावसाळा हिवाळा असे तीन ऋतू माहीत असतात, परंतु आयुर्वेदिक पद्धतीत संपूर्ण वर्ष सहा भागांत विभागलेले आहे. हेमंत-शिशिर (#हिवाळा), वसंत-ग्रीष्म (#उन्हाळा) आणि वर्षा-शरद (#पावसाळा) असे हे विभाजन आहे. सृष्टीतले बदल ठराविक साच्याप्रमाणे होतीलच असे नाही. त्यामुळे  ऋतू कधी सुरू झाला कधी संपला, हे आपल्याला नेहमी बाह्य वातावरणात होणाऱ्या बदलांवरूनच ठरवावे लागते,

भारतीय निसर्गा नुसार एक ऋतु संपण्या आधी दुसरा ऋतु सुरु होण्याचा जो काळ असतो त्यास आपण संधी काळ म्हणतो. अश्या दोन ऋतु मधील बदल होत असतानाच आपणास अनेक ठिकाणाहुन आजारपणाच्या वार्ता ऐकायला मिळतात. म्हणुन बाह्य वातावरणाचे निरीक्षण करून ऋतूचा अंदाज घेऊन आपला आहार-विहार ठरवणे आवश्यक असते
 
#वर्षा ऋतू - 
 
निरुक्ति- वर्षणं वृट विष | वर्षनम् अत्र अस्ति अंश आद्यश्च टाप=वर्षा:|

मास- श्रावण, भाद्रपद (इंग्रजी- जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर)

  • ऋतुलक्षण-  वर्षा हा विसर्ग काळातील ऋतु आहे.

आदानग्लानवपुषाअग्नि: सन्नो s पि सीदति | वर्षासु दोषैः इष्यन्ति तेऽम्बुलम्बाम्बुरेम्बरे ||
सतुषारेण मरुता सहसा शीतलेन | भूबाष्पेणाम्लेपायेन मलिनेन वारिणा ||
वन्हिनैव मन्देन तोष्विन्यन्योन्वइषिषु | भजेत् साधारणं सर्व उष्णं तेजपनं यत् ||” वाग्भट सुत्रस्थान

पावसामुळे थंड झालेल्या वातावरणामुळे, तसेच गार वाऱ्यामुळे शरीरात वातदोष वाढतो, तर आधीच्या ग्रीष्मातील उष्णतेमुळे तप्त झालेल्या जमिनीवर पावसाचे पाणी पडल्यामुळे येणाऱ्या गरम वाफांमुळे शरीरात पित्तदोष साठावयास सुरवात होते. ह्यात अग्नी मंद झाल्याने पचनही खालावते.

  • आहार-आचरणात घ्यायची मुख्य काळजी -

या ऋतूत असे अन्न सेवन करावे, जे वात, पित्त, कफ या तीनही दोषांना संतुलित ठेवेल. तसेच अग्नी प्रदीप्त करणारे हलके अन्न सेवन करावे.


#दोषावास्था - वर्षा ऋतूत बल अग्नि क्षीण झाल्याने पित्ताचा संचय होण्यास सुरुवात होते.

#रस - वर्षा ऋतुत अम्ल रसाची वृद्धि होते.

वर्षा ऋतु -    

  • पथ्यकर आहार - 

भाजलेले धान्य, पुराण जव, कुलत्थ, मूग, उडीद, जीरक, हिंग, काळे मिरे, , माठ, कोथिंबीर, पुदिना, भेंडी, लसूण, कांदा, सुंठ, सुरण, कद्दू, बोर, ताक, दूध, उकळलेले पाणी (श्रृतशीत जल), सैंधव मीठ, मधु, निंबू, दाडिम, गरम जेवण.

  • पथ्यकर विहार -

चंदन, खस आदि चूर्णाचा अभ्यंग, स्वच्छ, कोरडे लघु (हलके) रंगाचे कपडे घालणे, कोरड्या जागेवर बसणे, नेहमी पादत्राणे घालणे.

  •  अपथ्य आहार-

बाजरी, मका, नवीन तांदूळ, मसूर, हरभरा , तुरीची डाळ, हिरवा वाटाणा, मेथी, कारली, बटाटा, म्हशीचे दूध, पनीर, श्रीखंड, मिठाई, थंड जल, नदी आणि विहिरीचे पाणी, शुष्क मांस, मासे, तळलेले पदार्थ, झाकलेले पदार्थ, शिळे पदार्थ.

  • अपथ्य विहार-

दिवास्वाप,  अत्याधिक व्यायाम

  • वर्षाऋतुयोगासने

वर्षा ऋतूत मनुष्याचे शारीरिक बल अत्यंत कमी असते आणि वात-पित्ताची दुष्टी असते. त्यामुळे शरीरास लाभदायक दोष दुष्टी निवारक योगासने असावीत.
 
वर्षा ऋतूत उपयुक्त योगासने
1.
पद्मासन 2. वज्रासन 3. हलासन 4. ताडासन 5. बद्धकोनासन 6. भुजंगासन 7. वृक्षासन 8. धनुरासन 9. सर्वांगासन

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.