१) श्रवण भक्ती : श्रवण ही संपर्क साधण्यासाठी मानवाची मुलभूत गरज आहे. परमात्म्याचे नाम व गुणसंकीर्तन ऐकणे हि भक्तीची सर्वात पहिली पायरी आहे.
भगवंताच्या गुणांच्या श्रवणाने सत्त्व गुणांचा संचय होत जातो. मी स्वत : जे नामस्मरण , गुणसंकीर्तन करतो , ते स्वतःच ऐकणे, माझे शब्द मी स्वत: ज्या प्रमाणात ऐकतो, त्या प्रमाणात माझी भक्ती वेगाने फलदायी होते .
स्वत: परमात्म्याचे गुण संकीर्तन करणे म्हणजेच 'कीर्तन भक्ती'
|| मग जो गाई वाडेकोडे , माझे चरित्र माझे पोवाडे ,

तयाचिया मी मागे-पुढे , चोहीकडे उभाची ||
|| एक तत्व नाम दृढ धरी मना,
हरिसी करूणा येईल तुझी ||
४) वंदन भक्ती : वंदन म्हणजे नमस्कार. मनाचे नम: करणे , म्हणजेच चुकीच्या गोष्टींकडे झेपावणारे मन उचित गोष्टींकडे वळविणे. दिवसाच्या चोवीस तासांपैकी कमीत कमी चोवीस मिनिटे फक्त भगवंतासाठीच ठेवण्याचे बंधन म्हणजेच 'वंदन मर्यादा'.
वंदनाचाच एक अविभाज्य व सुंदर प्रदेश म्हणजे 'धूळभेट ' .परमात्म्याच्या चरणांची धूळ हीच सर्वश्रेष्ट विभूती. म्हणूनच भगवंताच्या सगुण साकार मूर्तीच्या चरणांना लावलेले गंध, परमात्म्याच्या हवनातील उदी, अथवा परमात्म्याच्या तसबिरीसमोर लावलेल्या उदबत्तीची रक्षा कपाळाला व गळ्याला लावावी.
त्यामुळे आपोआपच गळ्याच्या स्थानी असणारे विशुद्ध चक्र अशुद्धीकडून शुद्धीकडे प्रवास करण्यास तयार होऊ लागते .
'श्रीमद पुरुषार्थ' ग्रंथराजाच्या प्रत्येक खंडातील प्रत्येक शब्द म्हणजे साक्षात परमात्म्याच्या चरणांच्या धुळीचा एक कणच होय.ते शब्द मुखी असणे , मुखातून मनात शिरणे, व मनातून कृतीत उतरणे म्हणजेच 'मर्यादा - उदीचे' ग्रहण करणे होय.
५) अर्चन भक्ती : भगवंताच्या साकार रूपाशी स्वत:चे घट्ट नाते स्थापन करण्यासाठी केलेला प्रयास, त्यासाठी केलेली प्रत्येक प्रेममय कृती म्हणजे 'अर्चन'.
परापूजा, मानसपूजा, व मूर्तीपूजा हे तीनही अर्चन भक्तीचेच प्रकार आहेत .
६) पादसंवाहन भक्ती : पादसंवाहन भक्ती म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार (सत्य, प्रेम, आनंद) ,स्वतःचे इतरांशी आचरण ठेवणे.
७) दास्य भक्ती : दास्य भक्ती म्हणजे ' माझा स्वामी जेवढा समर्थ तसाच मीही होणार' ह्या इच्छेने 'त्याच्या' पायाशी राहून विनम्रपणे त्याच्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेणे होय.
दास्य भक्ती म्हणजे संपूर्ण शरणागती. परमात्म्याचे दास्यत्व म्हणजे परमेश्वराचे प्रेम, निर्भयता, व पावित्र्य, ह्या त्रिवेणी संगमाचे दास्यत्व स्वीकारणे.
३) स्मरण भक्ती : स्मरण म्हणजे आठवण. परमेश्वर आहे, सदैव आहे व अत्यंत कृपाळू आहे, ह्याचे नित्य स्मरण आवश्यक आहे.
भगवंताचे नाम म्हणजेच भगवंताचे अकारण कारुण्य. भगवंताच्या नामातच भगवंताचे सामर्थ्य आहे .म्हणूनच नामस्मरण हे सर्वात सोपे व अत्यंत सूक्ष्म साधन आहे.
हरिसी करूणा येईल तुझी ||
४) वंदन भक्ती : वंदन म्हणजे नमस्कार. मनाचे नम: करणे , म्हणजेच चुकीच्या गोष्टींकडे झेपावणारे मन उचित गोष्टींकडे वळविणे. दिवसाच्या चोवीस तासांपैकी कमीत कमी चोवीस मिनिटे फक्त भगवंतासाठीच ठेवण्याचे बंधन म्हणजेच 'वंदन मर्यादा'.
वंदनाचाच एक अविभाज्य व सुंदर प्रदेश म्हणजे 'धूळभेट ' .परमात्म्याच्या चरणांची धूळ हीच सर्वश्रेष्ट विभूती. म्हणूनच भगवंताच्या सगुण साकार मूर्तीच्या चरणांना लावलेले गंध, परमात्म्याच्या हवनातील उदी, अथवा परमात्म्याच्या तसबिरीसमोर लावलेल्या उदबत्तीची रक्षा कपाळाला व गळ्याला लावावी.
त्यामुळे आपोआपच गळ्याच्या स्थानी असणारे विशुद्ध चक्र अशुद्धीकडून शुद्धीकडे प्रवास करण्यास तयार होऊ लागते .
'श्रीमद पुरुषार्थ' ग्रंथराजाच्या प्रत्येक खंडातील प्रत्येक शब्द म्हणजे साक्षात परमात्म्याच्या चरणांच्या धुळीचा एक कणच होय.ते शब्द मुखी असणे , मुखातून मनात शिरणे, व मनातून कृतीत उतरणे म्हणजेच 'मर्यादा - उदीचे' ग्रहण करणे होय.
५) अर्चन भक्ती : भगवंताच्या साकार रूपाशी स्वत:चे घट्ट नाते स्थापन करण्यासाठी केलेला प्रयास, त्यासाठी केलेली प्रत्येक प्रेममय कृती म्हणजे 'अर्चन'.
परापूजा, मानसपूजा, व मूर्तीपूजा हे तीनही अर्चन भक्तीचेच प्रकार आहेत .
६) पादसंवाहन भक्ती : पादसंवाहन भक्ती म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार (सत्य, प्रेम, आनंद) ,स्वतःचे इतरांशी आचरण ठेवणे.
७) दास्य भक्ती : दास्य भक्ती म्हणजे ' माझा स्वामी जेवढा समर्थ तसाच मीही होणार' ह्या इच्छेने 'त्याच्या' पायाशी राहून विनम्रपणे त्याच्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेणे होय.
दास्य भक्ती म्हणजे संपूर्ण शरणागती. परमात्म्याचे दास्यत्व म्हणजे परमेश्वराचे प्रेम, निर्भयता, व पावित्र्य, ह्या त्रिवेणी संगमाचे दास्यत्व स्वीकारणे.
८) सख्य भक्ती : मानवाच्या जीवनात नित्य सोबत असणारा एकमेव परिपूर्ण मित्र म्हणजे भगवंत. प्रत्येक गोष्टीत आधी 'तो' आणि मग 'मी' हा भाव नित्य जागृत ठेवणे म्हणजे सख्यभक्ती.
असा माझा जेव्हा भाव राहील तेव्हा ह्या सख्याचे प्रत्येक जीवावर असणारे निरतिशय प्रेम मला अनुभवता येईल.
९) आत्मनिवेदन भक्ती : स्वतःच्या समग्र जीवनाचा, प्रत्येक श्वासाचा, प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक भावाचा नैवेद्य 'त्याला' अर्पण करणे म्हणजेच 'आत्मनिवेदन'.
" पुष्प उमलले जे माझे, वाहिले तुलाची,
तुला तुझे देतानाही भरून मीच राही "
श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराज (प्रेमप्रवास)
No comments:
Post a Comment