सदगुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (०९-०६-२०११)
हरी ॐ
विष्णूसहस्त्र नामामध्ये "ॐ मंत्राय नम:" ह्या नावाचा अभ्यास करताना आपण बीजमंत्र बघितले.पुढे प्रवास करत करत आपण श्री गुरुक्षेत्रम मंत्रावर स्थिर झालो .
ह्यात सर्व बाधाप्रशमनं मध्ये आपण बाधा बघितल्या किती बाधा बघितल्या? कुणाला नाही आठवत. म्हणजे पुढचे पाठ मागचे सपाट.
आतापर्यंत एकुण ८ बाधा झाल्या आणि एकूण किती बघायच्या होत्या तर ११. तर ९, १०, ११ ह्या तीन बाधा बघायच्या आहेत. आज जी ९ वी बाधा बघायची आहे ती अतिशय महत्वाची आहे, जी मनुष्याच्या जीवनात ठायी ठायी जाणवते.
बर्याच वेळा मनुष्याच्या जीवनात करायला गेलो एक आणि झाले भलतेच असे घडत असते. आमच्या हाताच्या रेषाच उलट्याच. आमच्या मीठाला चवच नाही. प्रत्येकाने अशी वाक्ये किती वेळा ऐकली असतील. म्हणजे intention एक आहे, कृती चांगली आहे पण response वेगळाच होतो .
आपण ठरवतो रात्री लवकर झोपायचे व सकाळी लवकर उठायचे, पण घडते का? नाही झोपायला नेमके तेव्हाच १२-१ वाजतात आणि मग उठायला दुपार होते. जर आपण ठरवले की आता ह्याच्यापुढे अजिबात चिडायचे नाही तेव्हा लगेच पुढच्या ५ व्या मिनीटाला चिडचिड सुरु होते. असं का होते?
दरवर्षी पहिल्या दिवशी ठरवले जाते बापुंनी सांगितलेली एक उपासना रोज अमुक वेळा करायची. पहिल्या दिवशी उपासना नीट होते, दुसर्या दिवशी ठीक होते, तिसर्या दिवशी सकाळी अर्धी,संध्याकाळी अर्धी होते. मग फक्त संध्याकाळीच अर्धी होते, पुढे एक दिवसाआड व हळुहळु पूर्ण बंद होते.
जेव्हा अपचनाचा त्रास झाल्यावर डॉक्टर कडॆ आपण जातो. अनेकदा डॉक्टर ने अन्न चावुन खाण्यास सांगितलेले असते पण आपण तसे वागतो का? बरीच माणसे तोंड सतत बंद ठेवतात त्यांच्या तोंडाला वास येतो ह्यामागे scientific reson आहे, ह्याला ४ गोष्टी कारणीभूत असतात. ब्रश नीट न केल्याने फक्त १०% तर
१) मुख्य म्हणजे कोठा साफ नसला तर तोंडाला वास येतो .
२) मनुष्याच्या लाळेत अनेक bacteria असतात त्यामुळे जर सतत तोंड बंद असेल तर अतिशय घाणेरडा वास येतो.
३) तोंड व गुदद्वार ह्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे, जेव्हा डॉक्टर गुद्द्वाराची तपासणी करतो तेव्हा तोंड उघडुन लांब लांब श्वास घेण्यास सांगतो. कारण त्यामुळे अन्ननलिका व गुदद्वार ह्यांची आकुंचन- प्रसरणाची क्रिया होत असते ज्यामुळे अन्न पुढे सरकायला मदत होते.
४) जेवणानंतर जर नीट चुळ भरली नाही, ब्रश केला नाही तर जे अन्न दातात अडकलेले असते ते तसेच राहिल्याने कुजते आणि असंख्य bacterias तयार होतात त्यामुळे मग घाणेरडा वास येत राहतो .
त्यामुळे गप्प गप्प राहण्यापेक्षा मिळूनमिसळून राहा, आनंदी राहा, गप्पा, विनोदात सहभागी व्हा.
इथे किती जण ३२ वेळा चावुन खातात? कोणी सांगितल्यावर १ दिवस खातील परत मग नेहमी सारखे घाईघाईत खाणे सुरु होते. जास्तीत जास्त आपण सात ते आठ वेळा घास चावतो. काही जण तर घास चावण्याच्या फंदातच पडत नाहीत गिळूनच टाकतात.
कधी वजन कमी करायचे ठरवले की नेमकी तेव्हाच जास्त भुक लागते. कोणाला वजन वाढवायचे असेल तर भूकच लागत नाही. असे का नेहमी घडत असते ?
कधी वजन कमी करायचे ठरवले की नेमकी तेव्हाच जास्त भुक लागते. कोणाला वजन वाढवायचे असेल तर भूकच लागत नाही. असे का नेहमी घडत असते ?
आपण ग्रंथराज मध्ये बघितले की प्रत्येक मनुष्याच्या देहात ४ केंद्र असतात आहार, मैथुन, निद्रा व भय. अशीच ४ केंद्रे प्रत्येकाच्या मेंदुतही असतात ती म्हणजे -
१) Reward center ( बक्षिस केंद्र )
2) Punishment center ( शिक्षा केंद्र )
3) Pleasure center ( सुखाचे केंद्र )
4) Displeasure center ( दु:खाचे केंद्र )
ह्या ४ केंद्रांच्या माध्यमातुनच मनुष्याचे मन घडत असते. मनुष्याच्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ही ह्या ४ केद्रांशी संबधित असते. आयुष्यात घडणार्या प्रत्येक घटनेचा ही केंद्रे अभ्यास करतात व त्यानुसार त्यांची व्याप्ती ठरत असते. इथे हा अभ्यास कशाच्या आधारे केला जातो हे महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ आई बाबांनी सांगितलेली गोष्ट ही मुलांना pleasure वाटते की, displeasure ह्यावर त्याची व्याप्ती ठरते. जेव्हा मनुष्य अनुचित गोष्टीला displeasure व उचित गोष्टीला pleasure समजतो तेव्हा त्याचे मन समर्थ बनते.
मुलांचे मन काय ठरवत असते? तर ते pleasure गोष्टीला displeasure समजते. आई वडिलांनी काय शिकवले हे नक्कीच महत्वाचे असते परंतु मनुष्य हा स्वत: काय निर्णय घेतो हे अतिशय महत्वाचे असते. जेव्हा मन शिस्तीला displeasure समजते तेव्हा ते मनुष्याचे जीवन बेशिस्त, अनुशासनहिन बनवते.
आपण शाळेते एक law शिकतो, की जर एका बंदिस्त द्रव पदार्थाला pressure दिले तर ते सर्व बाजुने समानपणे पसरते, कुठला law आहे हा? कुणाला नाही आठवत? ह्याला Pascal's law म्हणतात.
आपला मेंदु solid, liquid व gases ह्याने बनलेला आहे. आपलं मन, भावविश्व हे fluid प्रमाणे आहे
Pascal's law प्रमाणे जसा द्रव पदार्थ pressure दिल्यामुळे सर्वत्र पसरतो तसेच आपल्या मनावर जे जे संस्कार होत असतात ते सर्व मन भर पसरतात. आपण जर बेशिस्त वागत राहिलो तर आपल्या मनातही तिच अनुशासनहिनता पसरते.
म्हणून जीवनात आनंदी राहाण्यासाठी, आनंद येण्यासाठी आनंदी वृत्ती असणे आवश्यक असते. आनंदाचे डोही आनंद तरंग तर जे लोक नेहमी किरकिर करतात, नेहमी दु:खी असतात त्यांच्या जीवनात सुद्धा मग कायम दुख:च राहते.
कामावरुन नवरा घरी आल्यावर बायकोने, मुलांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्याची चिडचिड करायची सवय असते. त्यामुळे तो कधी बायकोचे कौतुक करु शकत नाही, किंवा मुलांना प्रेमाने विचारु शकत नाही. अश्या मनुष्याच्या जीवनात आनंदाचे तरंग कधी उठूच शकणार नाहीत, त्याच्या जीवनात नेहमी दु:खच राहणार. ही बाधाच अशी आहे, ह्याला अतिशय सुंदर नाव आपल्या प्राचीन आचार्यांनी दिले आहे, जे अतिशय समर्पक आहे ते म्हणजे स्वमन बाधा.
स्वमन बाधा म्हणजेच स्वत:च्या मनाने स्वत:लाच केलीली बाधा. तुमच्या मनाला तुम्ही लावलेले वळण तुमच्या आड येत असते. आपल्याला हिंदी पिक्चरचे गाणे किती लवकर पाठ होते पण शाळेतील एखादी कविता पाठ व्हायची का? नाही. हे असे का घडते तर आपल्या मनाचे वळण तसे असते म्हणुन. तुम्ही म्हणाल आम्ही चांगले वागलो तरी लोक आमच्याशी वाईट वागतात हे कसे काय?
तर हे सुद्धा आपल्या मनामुळेच घडत असते. आपल्या प्रत्येकाच्या देहाभोवती एक aura (प्रभामंडल) असतो जो दिसत नाही. तुमच्याशी संबंधित व्यक्ती जे जे काही वागते ते ते सर्व modified करायचे काम तुमचा aura करत असते.
समजा तुम्हांला एखाद्या व्यक्तीला मारायचे आहे व तुमचा aura चांगला आहे तर तेव्हा काय घडते की, ती व्यक्ती आपोआप कुठेतरी पाय घसरुन आपटते किंवा पडते व तिला भरपुर मार लागतो.
एक उदाहरण इथे सांगतो, ७-८ वर्षापुर्वी माझ्याकडे एक जोडपे आले होते, दोघेही स्वभावाने चांगले पण बायको लग्नानंतर काही महिन्यांनी सतत गप्पगप्प रहायला लागली. तिला प्रचंड acidity चा त्रास होत होता. मी (प.पु.बापू) घरातले वातावरण कसे आहे हे विचारल्यावर कळले की, त्या घरात ३ नणंदा, सासु, आत्या मिळुन एकूण ८ बायका होत्या. त्या सगळ्या ह्या नवीन नवरीला सतत टोमणे मारु लागल्या. तिच्या मनाला ही गोष्ट लागत राहीली. मी (प.पु.बापू) तिला सांगितले आता त्या काहीही बोलल्या तर आनंद व्यक्त कर, त्यांना टाळी दे. तिने तसे वागायला सुरुवात केल्यावर १-१/२ महिन्यात एक नणंद वेडी झाली, दुसरी नणंद लग्न करुन पळुन गेली तर तिसरीने तिच्याशी जुळवुन घेतले. कारण हिने प्रत्येक गोष्टीत आनंद व्यक्त केल्यावर घरातल्या बाकीच्या बायकांना हिला त्रास दिल्याचा आनंद मिळणे बंद झाले. म्हणजे जीवनात आनंद आणणे ही गोष्ट पुर्णपणे त्या नवीन नवरीच्या मनावर अवलंबुन होती.
कोणी कितीही त्रास दिला तरी मी त्रास करुन घ्यायचा की नाही हे माझ्या मनावर अवलंबुन असते. तुमचा aura बळकट असेल तर तुमच्याशी माणसे कृतज्ञच वागतात.ते कृतघ्न वागु शकत नाहीत.तेच जर aura कमकुवत असेल तर मग कितीही आपण चांगले वागलो तरी आपल्याला वाईट अनुभव येतात.
असे का घडते? तर जर माझे प्रभामंडल weak असेल तर माझ्या मेंदुतील चार केंद्रेही weak होतात. जर ही चार केंद्रे बळकट करण्याचा प्रयत्न केला तर आपण ही स्वमन बाधा टाळु शकतो .
जर तुमच्या मनाला पटले की आपण चुकीच्या मार्गाने pleasure मिळवतो आहोत, की आपोआप तुमचे मन मग चांगल्या मार्गाने pleasure मिळवण्याचे काम करु लागते .
जर मी (प.पु.बापू) म्हटलेले लाथ घालीन कंबरड्यात हे जर समोरच्या व्यक्तीला pleaure वाटले तर त्याचे pleasure centre वाढेल पण तीच जर समोरच्या व्यक्तीला शिक्षा वाटली तर त्याचे punishment centre वाढेल .
जो मनुष्य प्रत्येक सजा / अडचण ही सुधारण्याची संधी समजतो त्याचे pleasure centre वाढत जाते. आणि pleasure centre वाढणे म्हणजे मनुष्याकडुन चुक न होणे. ज्याचे pleasure व reward centre मोठे त्याच्यावर कोणी अन्याय करु शकत नाही, त्याच्या आयुष्यात कधी दु;ख येऊ शकत नाही.
म्हणुन ही pleasure व reward ही दोन केंद्रे वाढवण्यासाठी प्रयत्न करा. ह्यासाठी लहान-सहान गोष्टीतही आनंद साजरा करण्याची सवय करा.
कोणी विरोध केला तर आनंद माना, चार माणसे भेटली तर गप्पा मारा, जी माणसे कोणी भेटले तर नुसती गप्प राहतात त्यांचे displeasure centre वाढते. म्हणून स्वत:च्या तसेच दुसर्याच्याही छोट्या छोट्या चांगल्या गोष्टीत आनंद मानायला शिका.
काही दिवसापुर्वी एक पिक्चर घरी बघितला, घरातल्या सर्व स्त्री वर्गाने त्या पिक्चरला नावे ठेवली कारण त्या पिक्चरमध्ये कशाचा कशाला संबंध नव्हता की त्याला काहीही story नव्हती. तरी मला तो पिक्चर अतिशय आवडला. पिक्चरमध्ये काहीही घडले तरी आपल्याला काही त्याचा फरक पडतो का? नाही. पिक्चर कितीही बेकार असला तरी तो परिवारासोबत एकत्र बघताना आनंद व्यक्त करता आला पाहिजे.
बरेच जण मी बघतो राणीच्या बागेत गेल्यावर किती घाण वास येतो म्हणतात, आता तिथे जनावरे आहेत म्हणजे वास येणारच. त्या खराब वासामुळे चि्डचिड करत तुम्ही तुमचा का आनंद घालवता?
जर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत आनंद मानला नाही तर pleasure centre वाढणार कसे?
बायकोला नवर्याने आणलेल्या साडीपेक्षा जावेची साडी जास्त आवडते, अशी तुलना करत राहिल्यावर pleasure centre कसे वाढू शकेल?
एक मध्यमवयीन जोडपे मला सांगत होते आमची आई पटकन गेली पण तीच जेव्हा त्यांचे म्हातारे वडील १ -१/२ महिना बिछान्याला खिळले तेव्हा ह्याच जोडप्याला मनात विचार असायचा की अजुन किती दिवस राहणार?
म्हणजे माणसाला नक्की काय हवे आहे?
अश्या वृत्ती मुळे आमची ही pleasure व reward ही दोन केंद्रे वाढु शकत नाहीत. ह्यासाठी आमची सुखाची वृत्ती व शिस्त वाढवली पाहिजे. व चांगल्या गोष्टींना शिक्षा मानणे ही वृत्ती व दु:खाची वृत्ती कमी केली पाहिजे.
आणि ह्यासाठी लागणारी ताकद येते कुठुन तर गुरुमंत्रातुन. आपल्या सगळ्यांचा एकच गुरुमंत्र तो म्हणजे गुरुक्षेत्रम मंत्र. तुमच्या aura मध्ये हस्तक्षेप करण्याचा, तुमचे प्रभामंडल बदलण्याचा अधिकार फक्त गुरुक्षेत्रममंत्रालच आहे.
आनंदी वृत्ती वाढवायची असेल तर सद्गुरुला शरण जा. गुरुची आज्ञा पाळायला शिका. गुरुने लाथ घातली शिवी घातली तर त्याचा ज्याला आनंद वाटतो, गुरुची शिवी हा अशिर्वादच आहे अशी ज्याची खात्री असते त्याचेच pleasure centre वाढते जाते.
बापु ओरडले तर राग येणारच असे किती जणांना वाटते (सगळे नाही म्हणतात). अरे हो म्हणा काही जणांचे हो तर काही जणांचे नाही ऐकु आले, दोघांच्या भावना योग्यच आहेत, त्यामुळे हो आणि नाही म्हणणार्या सगळ्यांना " I Love You " . बापु ओरडले म्हणुन दु:ख नको तर मी चुकलो म्हणुन बापु ओरडले ही जेव्हा जाणीव असेल तेव्हा pleasure centre वाढत जाईल.
आपल्या मेंदुतील ह्या चार केंद्रातील स्वमन बाधा दुर करण्याची क्षमता ह्या गुरुमंत्रामध्ये आहे .
" एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरु ऐसा "
" सर्वबाधा प्रशमनं श्री गुरुक्षेत्रम" स्वमन बाधा ही जन्मापासुन मृत्युपर्यंत जीवनाला व्यापुन उरणारी बाधा आहे. जे करायचे असते नेमके त्याच्या उलटेच होत असते. ही बाधा टळण्यासाठी नित्य स्वत: जागृत राहुन गुरुच्या चरणांशी शरणागत राहायला हवे.
एक गोष्ट इथे आठवते स्वामींनी (स्वामी समर्थ) माझ्या (प.पु.बापू) खापर पणजोबांना एका शारीरिक व्याधीसाठी हत्तीची विष्ठा लावायला सांगितली त्यांनी पुर्ण विश्वास ठेवुन ती नियमित लावली व त्यामुळे अनेक औषधांनी सुद्धा बरे न झालेले दुखणे कायमचे बरे झाले. ह्यावरुन लक्षात येईल की गुरुच्या शब्दांची काय ताकद असते. जेव्हा गुरुवर संपुर्णपणे विश्वास असतो तेव्हाच गुरुची कृपा प्राप्त होत असते, गुरुवर जर विश्वास नसेल तर गुरुचे सामर्थ्य, त्यांची कृपा प्राप्त होऊ शकत नाही. आज आपण स्वमन बाधा शिकलो.
गुरुचा शब्द, गुरुचे चरण, व गुरुने दिलेला मंत्र ह्या तीनही गोष्टी जर घट्ट आयुष्यात धरुन ठेवल्या तर प्राण जाण्याची कधी वेळ येणार नाही, मुख्य म्हणजे प्राण जाणारच नाही. कारण ह्या तिन्ही गोष्टींपुढे यमाचीही ताकत चालत नाही. मग स्वमन बाधा तर त्याच्यापुढे खुपच छोटी आहे.
हरी ॐ
(Courtesy: http://www. manasamarthyadata.com/)
No comments:
Post a Comment