सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (०२-०६-२०११)
हरी ॐ
(* प्रवचनाच्या आधी प.पू.बापूंनी प्रथमा व द्वितीया पंचशील परीक्षेचा निकाल व रामनाम बँकेची आतापर्यंतची एकुण जप संख्या सांगितली.)
खुप छान वाटले ना ऎकायला !! पण ह्यात आपलं किती हा महत्वाचा प्रश्न आहे? कधीही मी जास्त केले ह्याचा अभिमान नको किंवा माझ्याकडुन कमी झाले ह्याची घृणा पण नको. सतत प्रयास करत रहा.
इथे डोळ्यासमोर वाल्मीकी ऋषी असायला हवा. वाल्या कोळी म्हणुन जगताना त्याला आयुष्यभर भीती म्हणजे काय ? चांगले - वाईट, पाप- पुण्य म्हणजे काय ? हे माहितच नव्हते. नारदाच्या भेटीनंतर त्याने आपल्या आप्तांना प्रश्न केला की, त्याने जे कमावले त्यात घरातल्या सर्व व्यक्ती भागिदार आहेत का ? त्यावर त्याला, जे धन त्याने कमावले त्यात सगळे भागिदार व्हायला तयार होते,असे लक्षात आले पण त्याच्या पापात मात्र भागिदार व्हायला कोणीच तयार नव्हते. हे ऐकुन तो वाल्या कोळी एकटा पडला.त्याला सगळीकडे चुकच दिसु लागले. आतापर्यंत नक्की आपण काय केले हा प्रश्न पडला.व मी मोठ्या तोऱ्यात गेलो होतो पण पराभुत होवुन परत आलो हि गोष्ट त्याने नारदासमोर कबुल केली. वाल्याकोळी नंतर नारदाला पुर्णपणे शरण गेला व राम नाम घेत राहिला.
जे प्रत्यक्ष वाचतात त्यांना माहित आहे सध्या किरात रुद्र ह्याविषयी आपण सविस्तर जाणुन घेत आहोत. प्रत्येकाचे मन हे एक घनदाट जंगलच आहे ज्यात असंख्य चुका करणारा वाल्या कोळी राहत असतो, जो सुधारण्यासाठी तपश्चर्या करु पाहतो पण एखादी जरी मुंगी चावली की मात्र लगेच घाबरुन मागे येतो.
वाल्मीकी म्हणजे काय? तर मुंग्यांचे वारुळ. हे वारुळ बनायला आधी एक मुंगी चावावी लागते..म्हणजे नक्की काय ? ही मुंगी कुठली ? तर मनुष्याचे मन जे वाल्या कोळयाप्रमाणे असंख्य चुका करत असते, दरोडा घालत असते,व एका क्षणी मनुष्याला पाप- पुण्य काय ह्याची जाणीव होते , मग त्याचे सुधारण्यासाठी प्रयास सुरु होतात.हे प्रयास करत असतानाच त्याला सुधारण्यासाठी त्याची ताकद कमी पडते आहे ह्याची जाणीव होते.
माणसाच्या मनाला सर्वांत जास्त बोचणारी गोष्ट कोणती ? तर, मी सुधारु बघतोय, पण मला सुधारता येत नाही. इथे चुक झाल्याचे दु:ख आहे. मी चुकतोय हे कळतेय पण दुरुस्त करता येत नाही. माझी ताकद कमी पडतेय हे जेव्हा कळतं तेव्हा मुखात भगवंताचे नामस्मरण चालु ठेवले तर आपोआप त्याची ताकद मिळते. मानवी शक्ती कमी पडते ह्याची जेव्हा जाणीव होते , तेव्हा मुंगी चावते, अश्यावेळी राम नाम चालु राहीले पाहिजे , गुरु गुरु नाम घेत राहीले पाहिजे , तरच मुंग्यांचे वारुळ बनते. वाल्याचा कोळयाचा वाल्मीकी बनतो. नेहमी चांगल्या माणसांचे प्रयास थांबतात कुठे? तर जेव्हा तो आहे त्या परिस्थितीला शरण जातो . मी असाच आहे आणि आता असाच राहणार हे मान्य करतो तेव्हा.
जेव्हा कुठल्याही क्षणाला चांगल्या मनुष्याला असे वाटते की , माझी ताकद कमी पडते. तेव्हा एक लक्षात ठेवा की जरी मी वाल्मिकी झालो नसेन तरी वाल्या कोळ्यापासुन नक्कीच लांब आलो आहे आणि वाल्या कोळयापासुन जेव्हढा मी लांब तेव्हढी शांती माझ्या आयुष्यात असते.
श्री वरदा चंण्डिका प्रसन्नोत्सवाचे सर्वांत मोठे फलित काय? तर मी १० फुट वाल्याकोळ्या पासुन लांब येतो व परत कधीही आता माझा प्रवास उलटा वाल्या कोळ्याच्या दिशेने होऊ शकत नाही. ह्यापुढे माझा प्रवास फक्त वाल्मिकीच्याच दिशेने होईल. वाट्टेल ते घडो पण आता कधीही माझा प्रवास १ मि.मी किंवा ०.००००१ मि.मी.सुद्धा वाल्या कोळ्याच्या दिशेने होणार नाही. ह्यासारखी प्रसन्नता दुसरी काही नाही...ह्यासारखा दुसरा वर नाही. ही फलश्रुती सगळ्यात महत्त्वाची आहे. गेल्यावेळी मी(प.पू.बापू) कोऱ्या पाटी बद्दल सांगितले होते. ही कोरी पाटी म्हणजे वाल्या कोळयाचा वाल्मिकीच्या दिशेने प्रवासाची सुरुवात .
जो कोणी माझ्या आईच्या उत्सवात प्रेमाने सामील झाला आहे, त्याचा १ मि.मी प्रवास सुद्धा मी(प.पू.बापू) वाल्या कोळ्याच्या दिशेने होऊ देणार नाही. आणि जरी एखाद्या व्यक्तीचे माझ्यावर प्रेम नसेल पण माझ्या आईच्या उत्सवात ती व्यक्ती प्रेमाने सामील झाली असेल तरी मी (प.पू.बापू) त्याच्यासाठीही हेच करेन.(त्याचा १ मि.मी प्रवास सुद्धा मी वाल्या कोळ्याच्या दिशेने होऊ देणार नाही.)
आमची नेहमी आयुष्यात शांती, प्रसन्नता येण्यासाठी धडपड असते. पण ही शांतता,प्रसन्नता तुमच्या आयुष्यात कशी येत असते? तर ज्याप्रमाणात तुमच्याकडुन इतरांना शांती व प्रसन्नता प्राप्त होते त्याच प्रमाणात, तुमच्या आयुष्यात शांती व प्रसन्नता येते. आमच्यामुळे इतरांच्या जीवनात शांती व प्रसन्नता कधी येईल? तर जेव्हा आम्ही रामनाम वही,अंजनामाता वही लिहत असु तेव्हाच.. गुरुक्षेत्रम मंत्रामध्ये आपण बाधा बघितल्या, अजुन त्यातल्या काही बाकी आहेत. ह्या गुरुक्षेत्रम मंत्रामुळे जे आम्ही न कळत इतरांशी चुकीचे वागतो त्याचे परिणाम कमी होतात. मनुष्याला नेहमी इतरांच्या चुकांवर आकांड-तांडव करण्याची सवय असते. पण इतरांच्या चुकांवर आकांड-तांडव करण्याआधी आपण स्वत:ही एक मानवच आहोत हे कधीही विसरु नका.
इतरांच्या चुकांवर आकांड-तांडव करताना आपण नेहमी स्वत:च्या चुका दृष्टी आड करत असतो. स्वत:च्या चुकांवर पांघरुण घालतो. मला सांगा. तुम्ही मानवत्वाच्या वर गेला आहात का? तुम्हांला कोणी आधिकार दिला आहे का कोणालाही शाप किंवा वर देण्याचा ? नाही. म्हणजे तुम्ही मानवच आहात. हे कायम लक्षात ठेवा.
गुरुक्षेत्रम मंत्र, रामनाम वही. मातृवात्स्ल्याविन्दानम मधील एक अध्याय, ग्रंथराजचे एक पान ही नित्य उपासना मी (प.पू.बापू) तुम्हांला सांगितली आहे. प्रत्येकाने एक नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की मी एक सामान्य मानवच आहे. व माझ्यात कितीही सदगुण असले तरी माझे सदगुण इतरांसाठी त्रासदायक देखील ठरु शकतात. म्हणुन स्वत:मध्ये दुर्गुण आहेत हे आधी ओळखा व त्याप्रमाणे सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करा.
तुम्ही सगळे प्रसन्नोत्सवात सामील झाला आहात म्हणजे आता ह्यापुढे परत कधीही तुमचा प्रवास वाल्याकोळ्याच्या दिशेने होणार नाही ह्याची गेंरेंटी (खात्री) आहे. आणि ही गेंरेंटी ( खात्री) १ किंवा २ वर्षासाठी नसुन तुमच्या पुढच्या प्रत्येक जन्मासाठी आहे हे लक्षात ठेवा.
तुमच्या मनामध्ये जे काही चालते त्याचे मालक तुम्हीच असता . मी आधीही अनेकवेळा सांगितले आहे की फक्त वयाच्या १४ वर्षापर्यंतच आपल्या मनावर इतरांच्या संस्काराचे परिणाम असतात. १४ वर्षापर्यंत मेंदु प्रगल्भ होतो. प्रत्येक मानवाकडे एव्हढी ताकद असते की तो आधीचे (१४ वर्षापर्यंत) जे काही घडले आहे ते सगळे पुसुन टाकु शकतो, नष्ट करु शकतो.
रामनाम बँकेचा अकाऊंट आज आपण बघितला, पण त्याचा मला फायदा किती? तर जेव्हढ्या प्रमाणात माझा त्यात सहभाग, माझा प्रयास, तेव्हढ्या प्रमाणातच. जे लिहीतात ते लिहु दे,मी एकच वही लिहीन आणि बँकेचे फायदे घेईन, ही लबाडी इथे नाही चालणार.
इथे ज्याची capacity जशी त्यानुसार फळ मिळणार. म्हणजे माझी capacity १००% आहे आणि मी फक्त १०% प्रयास करत असेन तर मला फळही १०% मिळणार. चमचा, पेला आणि पिंप हे उदाहरण मी (प.पू.बापू) नेहमी सांगतो. (चमचा जर पुर्ण भरला असेल, व पेला आणि पिंप जर अर्धे भरले असेल तर ह्यामध्ये चमचा श्रेष्ठ असतो कारण तो त्याची capacity पुर्ण वापरतो.)
रामनामाच्या बँकेचे जे आतापर्यंत यश आहे त्याचे फळ प्रत्येकाला प्राप्त होणार आहे. पण हा नियम अपयशाला मात्र लागू होत नाही (म्हणजेच मी जर वह्या कमी लिहिल्या तर ते माझे अपयश झाले पण ह्याचा परिणाम इतर सभासदांवर होऊ शकणार नाही.) कारण ह्या रामनाम बँकेची currancy ही त्या हनुमंताकडुन सतत घेतल्या जाणाऱ्या रामनामावर अवलंबुन आहे, तुमच्यावर नाही.
आज एक खुप सुंदर गोष्ट सांगायची आहे ...अतिशय लवकरच माझ्या आदिमातेची एक अशीच currancy मी (प.पू.बापू) निर्माण करणार आहे. जी virtual Currancy असेल म्हणजे उदाहरण जसे computar games असतात ज्यामध्ये अमुक केले की अमुक points असे ठरलेले असते व ह्या points नुसार मग winner ठरत असतो . त्याचप्रमाणे अमुक सेवा केली की अमुक points, अमुक नामस्मरण केले की ठराविक points अश्या प्रकारची एक currancy मी लवकरच develop करतोय. ह्यात तुम्ही अमुक वेळ सेवा केली किंवा किती रामनाम वह्या लिहिल्या ह्यावर त्याचे किती points हे ठरलेले असेल. आणि शेवटी ३० points हे वेगळे असतील.. ते वेगळाच कोणीतरी देईल, तुम्ही ह्या game मध्ये किती खरं बोललात आणि किती खोटे ह्यावर हे ३० points पैकी points मिळतील. म्हणजे प्रत्येक वर्षाअखेर आता तुमच्या पाप-पुण्याचा हिशोब तुमच्यासमोर असेल. हा हिशोब म्रुत्युनंतर नाही तर आधीच कळला पाहिजे .चित्रगुप्ताला मी तुमच्या आयुष्यातुन ह्यापुढे कटाप केले आहे.
ह्या प्रोग्रामचे एक softwear असेल. मी(प.पू.बापू) already कामाला सुरुवात केली आहे. ह्या प्रोग्रामचे नावही अतिशय सुंदर आहे पण ते मी आता सांगणार नाही. हा जो प्रोग्राम आहे तो मी स्वत: केला आहे व त्यात कुठलाही मानवी हात नसेल म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ह्या softwear programme मध्ये fix असेल(अमुक गोष्टीला अमुक points) ती कोणीही manually बदलु शकणार नाही. त्यामुळे अमुक व्यक्तीने असे केले म्हणुन माझ्यावर अन्याय झाला, असा प्रकार इथे घडणार नाही.
अशी virtual Currancy आपल्या संस्थेची लवकरच develop होते आहे व ती वापरायची कशी हे ही तुम्हांला हळुहळु शिकवले जाईल.
--------------------------------------------
** प्रवचनानंतर व सत्संगाआधी प.पू.बापूंनी virtual Currancy ह्या बद्दल अधिक माहीती सांगितली ---
"सगळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे असं माझ्या (प.पू.बापू) कानावर आले, म्हणुन सांगतो की ही virtual Currancy फक्त volunteer साठीच compulsory आहे आणि ज्या भक्तांना ती हवी आहे त्यांनाच ती मिळेल. सगळ्यांना compulsory नाही. त्यामुळे घाबरण्याचे अजिबात कारण नाही. ज्यांना ही वापरायची आहे त्यांनाच ती compulsory आहे. त्यामुळे कोणीही मनात भीती बाळगण्याची आवश्यकता नाही.
पण ज्यांना ही वापरायची आहे त्यांना एवढेच सांगायचे आहे की, ह्या Currancy चा व्यवहार एवढेच सुंदर असेल की, तुमच्या आयुष्यभर ह्यापुढे फक्त प्रसन्नताच असेल, शांतीच असेल. अशांती व अप्रसन्नता औषधालाही नसेल."
No comments:
Post a Comment