Latest News

Excerpts from Thursday Discourse dated 26 May 2011


सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (२६-०५-२०११)
हरी ॐ 
"जयन्ति मंगला काली भद्रकाली कपालिनी , 
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोsस्तु ते ॥"
गंगा प्रगटणार आहे इथपासुन बोलायला सुरुवात केली होती, नंतर उत्सव होणार हे सांगितले बघता बघता उत्सव संपन्न देखील झाला. ज्याने ज्याने ह्या प्रसन्नोत्सवात भाग घेतला त्या प्रत्येकाला जर विचारले की, "तुझ्या आयुष्यातील सर्वोच्च गोष्ट कोणती?" तर उत्तर एकच येईल , ते म्हणजे " श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सव." असं का? ह्या प्रश्नाचे उत्तर आज बघायचे आहे .
पुर्वी जेव्हा लहान मुल शाळेत जायला सुरुवात करायचे तेव्हा प्रथम त्याच्या हातात पाटी-पेन्सिल असायची. ह्या पाटीवर पेन्सिल ने काहीही लिहिले की, पुर्णपणे खोडता येते.नंतर ४ थीत गेल्यावर त्याच मुलाच्या हातात वही- शिसपेन्सिल येते. शिसपेन्सिलने लिहिल्यावर खोडायला रबर लागतो. जरी रबरने खोडले तरी ते पुर्ण जात नाही, त्याची थोडी खुण राहतेच. अजुन पुढच्या इयत्तेत गेल्यावर मुलांच्या हातात वही- पेन येते. पेनाने कुठलीही गोष्ट लिहिली की कितीही प्रयत्न केले तरी खोडता येत नाही. 
प्रत्येकाच्या जीवनात ह्या तीन अवस्था असतात. काही गोष्टी चुकल्या तर लगेच खोडता येतात, त्यांची खुण उरत नाही, काही गोष्टी खोडल्या तरी त्यांची खुण राहते तर काही गोष्टी कितीही प्रयत्न केले तरी खोडता येत नाहीत. 
आमचे जीवन ह्या तीन पैकी दोन प्रकारचे असायला हवे ते म्हणजे एक तर पहिल्या प्रकारचे म्हणजे चुक केली तर ती पुसल्यावर त्याची कुठलीच खुण असणार नाही असे वर्तन असावे किंवा तिसऱ्या प्रकारचे म्हणजे असे वर्तन असावे की, चुक होताच कामा नये. पण तिसऱ्या प्रकारचे आमचे जीवन होण्याइतपत आम्ही expert  नक्कीच नाही. म्हणुन आपले जीवन दगडी पाटी- पेन्सिल सारखे ठेवण्याचा प्रयास करावा. तयारी नसताना पेन वापरायला गेले की मग problems  सुरु होतात. यासाठीच नेहमी मौटेसरीत असावे. म्हणजे काहीही लिहिले तरी खोडता येते.
ह्या तीन अवस्थांची, क्रियांची, प्रत्येकाच्या जीवनातल्या कार्यांची स्वामिनी असते ती आदिमाता. 
 शिसपेन्सिलने लिहिल्यावर खोडताना रबर हे साधन म्हणजेच प्रयास लागतात. पण तरीही डाग राहतोच,पु र्ण खोडले जात नाही. तर दगडी पाटीवर पेन्सिलने लिहिलेले पुसले की कोरी पाटी राहते. आमचे जीवन असे कोऱ्या पाटी सारखे  असायला हवे. जेव्हा मनुष्य दत्तगुरु, आदिमाता व परमात्मा ह्या तिघांच्या पायी अविचल श्रद्धा ठेवुन प्रत्येक कार्य करतो तेव्हा त्याचे जीवन दगडी पाटी- पेन्सिल सारखे होते.कारण ती आदिमाता अश्या व्यक्तीसाठी चुक झाली तरी पाटी पुसुन कोरी करुन देत असते. 
जेव्हा आमच्यात ह्या तिघांच्या पायी श्रद्धा कामापुरती असते तेव्हा आमचे जीवन शिसपेन्सिल सारखे होते, चुका पुसण्याचा प्रयत्न केला तरी डाग राहतातच.व जेव्हा ह्या तिघांच्या पायी श्रद्धा डळमळीत असते मग वही- पेनासारखी अवस्था येते, चुका कितीही प्रयत्न केल्या तरी त्या पुसता येत नाहीत, तर  कायम राहतात.
ह्या श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सवात माझी (प.पू.बापु) एक इच्छा होती ती म्हणजे जो कोणी अगदी २% का होईना पण दत्तगुरु, आदिमाता व परमात्मा ह्या तिघांवर मनापासुन प्रेम करतो त्याच्या हातातील वही काढुन घेवुन दगडी पाटी मला(प.पू.बापु) द्यायची होती. आणि आज मी (प.पू.बापु) सांगतो की,त्यात मी ९९.९% यशस्वी झालो. हा प्रसन्नोत्सव म्हणजे तुमची नाही तर माझी परिक्षा होती. ह्या परिक्षेचा पेपर माझ्या आईनेच काढला व सगळी तयारीही आईनेच करुन घेतली. 
ह्यात असलेला ०.०१% failure म्हणजे जे ह्या प्रसन्नोत्सवात सामील होऊनही मनामध्ये मात्र आईच्या अस्तित्वाविषयी, तिच्या रुपाविषयी विकल्प घेवुन वावरले अश्या व्यक्ती. ह्या ०.०१% failure चे मला(प.पू.बापु)  आजही खुप वाईट वाटतेय, पण आता वेळ टळून गेली आहे. पण माझ्या (प.पू.बापु) ९९.९% यशाबद्दल मला(प.पू.बापु) खुप आनंद आहे आणि तो आज तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवुन celebrate  केला म्हणुन बरं वाटले.
ह्या प्रसन्नोत्सवात ज्याने ज्याने म्हणुन मनापासुन सेवांमधुन भाग घेतला किंवा मनापासुन नुसते दर्शन जरी घेतले त्या प्रत्येकाच्या हातात मी दगडी पाटी देण्यात यशस्वी झालो.  हा प्रसन्नोत्सव संपला नाही तर जो stage वर प्रसन्नोत्सव होता तो आता आमच्या जीवनात सुरु झाला आहे.  
मग हा प्रसन्नोत्सव असाच सुरु राहण्यासाठी आम्ही काय करायला हवे ? तर रोज आन्हीक करणे, ग्रंथराज वाचणे, मात्रुवात्सल्यविंदनम मधील एक अध्याय वाचणे,  दादांनी(प.पू.सुचितदादा) सांगितलेली उपासना करणे, व तुम्हांला मी (प.पू.बापु) दिलेले (ग्रंथराज व मात्रुवात्सल्यविंदनम मधील)  तुम्हांला आवडणारे स्तोत्र maximum वेळा म्हणणे, ह्या गोष्टी रोज करणे आवश्यक आहे .तसेच दरवर्षी वटपोर्णिमा ते गुरुपोर्णिमा ह्या कालावधीतील कोणत्याही एका दिवशी १०८ वेळा हनुमान चलिसा म्हणणे कधीही चुकवु नका. ह्यासोबत श्रावण महिन्यात पुरुषांनी रणचंडिका प्रपत्ती व मकरसंक्रातीच्या दिवशी स्त्रियांनी मंगलचंडिका प्रपत्ती ही केलीच पाहिजे.
चुका सांभाळायला मी तयार आहे, कमीत कमी एवढ्या जरी गोष्टी नित्य नेमाने केल्या तरी ह्या उत्सवात मिळालेली दगडी पाटी ह्याच जन्मात नाही तर जन्मोजन्मी आमच्या सोबत कायम राहील. आणि चित्रगुप्ताने जरी त्याच्या वहीत तुमच्याविषयी काही लिहिले तरी ते कोणीतरी जाऊन पुसुन येईल. हा पुसणारा तुमच्या जीवनातल्या वाईट गोष्टी पुसण्याचे काम नक्की करेल,आणि एक आज सांगतो की, तुम्ही जर ह्या गोष्टी प्रेमाने केल्या तर त्या चित्रगुप्ताच्या हातात वही नसून दगडी पाटीच असेल जिच्यावरचे पुसले तर कुठलीही खुण राहत नाही. 
दिशेविषयी मागे मी(प.पू.बापु) एक गोष्ट सांगितली होती, की स्वत:च्या घरात दक्षिणेकडे पाय करुन झोपायचे नाही. घराच्या बाहेर हा नियम लागु नाही. घरातही चुकुन झोपलात तर एखादवेळेस चालेल पण बापुची परिक्षा  घेण्यासाठी मुद्दामहुन करु नका. 
 प्रसन्नोत्सवात केलेल्या महापुजनाचे फोटो ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ते जपुन ठेवा, स्वत:च्या घरामध्ये लावा. जर एकापेक्षा जास्त फोटो असतील तर घरातील सगळ्या खोल्यात भिंतीवर लावा, तसेच जर जास्त फोटो आहेत आणि ज्यांना दुसर्यांना द्यायची इच्छा आहे ते फोटो ज्या आप्तांवर त्यांचे मनापासुन प्रेम आहे त्यांना दिले तरी चालतील . 
ज्यांनी महापुजन केले नाही पण मी(प.पू.बापु) आधी सांगितल्याप्रमाणे १०८ वेळा गुरुमंत्राचा जप केला आहे त्यांना सुद्धा महापुजनाचे फळ मिळालेच आहे. अश्यांसाठी प्रसन्नोत्सवातील फोटो विक्रीला उपलब्ध आहेत. ते एक किंवा जास्त फोटॊ घेवुन घरात लावु शकतात. 
ह्या फोटोमध्ये मध्यभागी आहे ती महालक्ष्मी व तिच्या डाव्या बाजुला आहे ती महाकाली. ह्या महाकालीच्या रुपाला कधीच घाबरु नका. महाकाली ही अज्ञात प्रदेशाची स्वामिनी आहे. अज्ञात  म्हणजे जे माहीत नाही ते. तुम्ही रोजच्या जीवनात किती लोकांना ओळखता? जास्तीत जास्त १०० ते ५००.. भारताची लोकसंख्या करोडो आहे पण तेव्हढ्या लोकांना आपण ओळ्खतो का ? नाही.कितीतरी माणसे आपल्या आजुबाजुला असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नसते. म्हणजे हा आमच्यासाठी अज्ञात प्रदेश आहे. अश्या तुमच्या अज्ञात  प्रदेशाची काळजी घेणारी असते ती महाकाली.
काळोखात कुठली स्पष्ट दिसु शकेल जी काळोखापेक्षा हजारो पट काळी आहे तीच दिसु शकेल. 
काळ प्रदेश म्हणजे अज्ञात  प्रदेश अश्या प्रदेशाची स्वामिनी असणारी ही महाकाली प्रगटली ती विश्वाच्या उत्पत्तीच्याही आधी. तिला दश दिशा मोकळ्या होत्या म्हणुन तिला दहा हात व पाय आहेत.तिच्या हातातल्या राक्षसाच्या मुंडक्यातुन रक्ताचे थेंबही गळताना दिसत होते हे मुर्तीकाराचे कौशल्य होते. अशी ही महाकाली आमच्या अज्ञात  प्रदेशाची स्वामिनी आहे.आपल्यासाठी जो अंध:कार तो तिला ज्ञात आहे, तिला माहित नाही असे काहीच नाही.
महालक्ष्मीच्या उजव्या बाजुला आहे ती महासरस्वती, अत्यंत शांत, सौम्य रुप !! तिच्या आठ हातात शस्त्र असुनही अतिशय शांत असे तिचे रुप आहे. ह्या महासरस्वतीचे ८ हात व महाकालीचे १० हात ह्या दोघींचे एकत्रीकरण केले की मधल्या १८ हातांच्या महिषासुरमर्दिनीचे रुप बनते. महासरस्वती व महाकाली ह्या दोन्ही मुर्तींचे वस्तुमान व आकारमान  एकत्र करुन बनली होती ती महिषासुरमर्दिनीची मुर्ती. हे मुद्दामहुन ठरवुन घडले नाही तर हे असेच असते म्हणुन घडले. 
तिचे मूळ नाव ब्रम्हत्रिपुरसुंदरी..तिलाच अर्धमाता असेही म्हणतात. कारण तुम्हांला ती कितीही समजली तरी तिला तुम्ही अर्धीच समजु शकता. गुरुक्षेत्रम मध्ये देखील ती अर्धीच ज्ञात आहे. पण ह्या उत्सवाच्या १० दिवसात मात्र इथे ती अख्खी उभी होती...अख्खीच्या अख्खी तुम्हां सर्वांची होण्यासाठी ती आली होती. 
तुमच्या जीवनात मातृवात्स्ल्याविन्दानम कधीच हातातुन सोडु नका. तसेच ज्या क्षणी तुम्हांला वाटेल आपले मन दुबळे, कमकुवत होते आहे असे वाटेल त्या क्षणी अंजना मातेच्या कुशीत शिरा. ह्या अंजना मातेच्या वहीची नोंद रामनाम बँकेतच  होणार आहे. जेव्हा जेव्हा तुमचे मन कमकुवत वाटत असेल, भयग्रस्त वाटत असेल तेव्हा शांतपणे अंजना मातेची वही काढुन लिहायला लागा. मनातील भीती घालवण्यासाठी ह्यासारखा दुसरा उपाय नाही. रोज एक पान जर लिहिले तर अधिकच चांगले.
जेव्हा मी(प.पू.बापु)  अंजना मातेच्या वहीबद्दल सांगितले तेव्हा वामलतेबद्दल सांगितले होते. वामलता म्हणजे तुमच्या जीवनातील शनीचा व कलीचा प्रभाव. ही वामलता कापता येते ती "ॐ हरिमर्कट मर्कट.." ह्या मंत्रामुळे. म्हणजेच वामलतेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी हनुमंताच्या डाव्या पायाखाली येणे हाच एकमेव उपाय आहे. अंजना मातेच्या वहीमध्ये हनुमंताच्या डाव्या पायाखाली ॐ हरीमर्कटाय स्वाहा हा जप लिहायचा आहे.
अंजना मातेची वही ही उत्सवाच्या पहिल्या दिवशी येणे महत्त्वाची होती. थोड्या घाईतच दोन दिवसात ह्या वहीच्या आवृत्ती काढल्या गेल्या .त्यामुळे ह्या आवृत्तीत english मध्ये जप लिहिताना थोडी जागा कमी पडत आहे, पण पुढच्या आवृत्तीपासुन english मध्ये जप लिहिण्यासाठी जास्त जागा असेल. 
आधीच रामनामाची वही लिहायची आहे मग ही वही कधी लिहायची ? तर जेव्हा सुनेला वाटेल सासु त्रास देते आहे किंवा सासुला वाटेल सुन त्रास देते आहे तेव्हा ही वही लिहायला लागा.किंवा पतीमधले दुर्गुण कमी व्हावे असे वाटत असेल तर पत्नीने ही वही लिहायला घ्यावी तसेच पतीला जर  पत्नीने सुधारावे असे वाटत असेल तर पतीने ही वही लिहायला घ्यावी. 

मनोरमा (आवडीचा) पती किंवा पत्नी होण्यासाठी ही वही लिहायला सुरुवात करा. पती किंवा पत्नी मधले स्वभाव दोष- दुर्गुण दुर करण्याची, कमी करण्याची ताकद ह्या वहीमध्ये आहे. मी ही वही भरपुर लिहिली व मला जे Best (प.पू.नंदाई) आहे ते मिळाले. असेच तुमच्या जीवनात तुमच्यासाठी जे Best  आहे ते तुम्हांला मिळावे अशी माझी इच्छा आहे. 

पती- पत्नी मधील दोष कमी करणारी, पती- पत्नीमध्ये सुसंवाद निर्माण करणारी ही वही आहे. कारण हनुमंत हा आदर्श सेतु बांधणारा होता. राम-जानकीचा जो वियोग दुर करु शकतो तो तुमचा का नाही करणार ? तुम्हांला संसार चांगला सुखाचा करायचा असेल तर ही वही जरुर लिहा. समजा दोघांपैकी एखादी व्यक्ती (पती किंवा पत्नी) वारली असेल, तसेच जर एखाद्या व्यक्तीचे लग्न झालेले नाही, तरीही ही वही लिहावी कारण ह्या वहीमुळे कधीही त्यांच्या जीवनात परावलंबी बनुन आयुष्य जगण्याची परिस्थिती येणार नाही. अशी ही अंजनामाता वही ..
 ज्यांनी कोणी अजुन ही अंजनामाता वही लिहायला सुरुवात केली नसेल त्यांना माझे एक  friendly suggestion आहे की, ह्या त्रिपुरारी पोर्णिमेच्या आधी कमीत कमी ह्या अंजनामाता वहीचे एक पान तरी लिहा. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी माझी पुढची परिक्षा सोपी कराल.मग एव्हढी एक मदत करायला तयार आहात का तुम्ही ?
हरी ॐ

1 comment:

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.