लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला.लोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती सनातन हिंदू धर्म व धर्मग्रंथ आणि भारताचा गौरवशाली इतिहास व परंपरा हे हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख आधार होत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाचे ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ असेही वर्णन केले जाते.
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर टिळकांनी कॉंग्रेसच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लोक जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. .गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले.या सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यायोगे त्यांच्यात राष्ट्रवादी विचार व भावना यांचे बीजारोपण करता येईल, अशी त्यांची धारणा होती.
स्वराज्याची कल्पना गणेशोत्सवात हिरीरीने मांडली जाऊ लागली. लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या ‘चतुःसूत्री’ कार्यक्रमाचा ह्या उत्सवाच्या माध्यमातून पुरस्कार केला .
पण टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सार्वजनिक केला तो उद्देश आता राहिला नाही ..
दरवर्षी गणेश उत्सव आला की सगळीकडे गणेश स्पर्धा विषयी फक्त जाहिराती दिसु लागतात..ह्या स्पर्धा कश्यासाठी हा एक मोठाच प्रश्न मला पडतो . इथे निकष गणपतीच्या प्रसिद्धी वरती ठरवले जातात. हा नवसाचा गणपती हा अमुक गणपती तो तमुक गणपती ही विशेषणे कोणी निर्माण केली ? हयाचा विचार करायची तसदी आम्ही कधीच घेत नाही.
गणपती जो विध्नहर्ता,
बुध्दीदेवता आहे तो काय एका गल्लीतल्या भक्ताना पावणार आणी दुसर्या
गल्लीतल्या भक्तांना पावणार नाही असे होऊ शकेल का ?
ह्या गणेश स्पर्धां मध्ये का नाही
कधी जास्त वृक्षारोपण करणार्या किंवा स्वदेशी
वापरण्याचा प्रसार करणार्या मंडळाला बक्षीस
ठरवले जात ? आज सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये किती मंडळे पर्यावरणाचा विचार करून इको फ्रेंडली मूर्ती बनवणे हे आपले प्रथम कर्तव्य मानतात ?
लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असलेला गणपती उत्सव आणि सध्या सुरु असलेला उत्सव यात खूपच तफावत दिसून येते .
आज गणेश उत्सव हा सेलेब्रिटी उत्सव म्हणून जास्त साजरा केला जाताना दिसतो.. कारण गणपती कमी आणि सेलेब्रिटीचे फोटोच जास्त बघायाला मिळतात.
आज गणेश उत्सव हा सेलेब्रिटी उत्सव म्हणून जास्त साजरा केला जाताना दिसतो.. कारण गणपती कमी आणि सेलेब्रिटीचे फोटोच जास्त बघायाला मिळतात.
चुकीच्या दिशेने जाणार्या गणेशोत्सवाला विधायक वळण देण्यासाठी समाजातल्या विचारवंतांनी या उत्सवापासून दूर न राहता त्यात सामील होऊन चुकीची दुरुस्ती करण्याचे काम केले तर ते अधिक मोलाचे ठरेल.
लोकमान्य टिळकांनी दिलेला हा वारसा प्राणपणाने जपण्याची गरज आहे. या उत्सवामागचे हेतू बदलले असले तरी उत्सवाचे स्वरुप प्रबोधनात्मकच असावे असे वाटते.
‘उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख, ऋद्धीसिद्धीचा
नायक सुखदायक भक्तांसी !!
No comments:
Post a Comment