केस हा सार्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. केसांमुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारची ओळख मिळत असते. विशेषतः महिला वर्गाला ही ओळख जास्त महत्त्वाची असते.
स्त्रीसौंदर्याचा मुकूट म्हणजे केस. म्हणूनच केसांना अलंकाराचा दर्जा दिला जातो. लांबसडक केस सौंदर्यात भरच टाकतात. अशा सौंदर्यात भर टाकणा-या केसांची निगा राखण्यासाठी महिला खूप धडपड करत असतात.
- या केसांची निगा आणि कांही तक्रारी असल्यास त्या दूर करणे हे मोठे कामच होऊन बसते. अशा वेळी हे छोटे छोटे उपाय नक्कीच फायद्याचे ठरतात.
२. केस गळणे-आजकाल अगदी शालेय विद्याथ्यांपासून सर्वांनाच ही समस्या भेडसावते आहे. हवेतील प्रदूषण, शांपूचा अतिरिक्त वापर, आहारातील त्रुटी ही त्या मागची मुख्य कारणे असू शकतात. संत्रे अननसाचा रस रोज १ ग्लास या प्रमाणे १५ दिवस प्यायला असता केस गळती कमी होते.
३. चाई लागणे- हा एक प्रकारचा त्वचा रोग आहे पण त्यावर १०० टक्के खात्रीने औषधोपचारच्या साहय्याने इलाज करता येतो.
४. केसांची टोके दुभंगणे- केसांची टोके बरेचवेळा दुभंगलेली आढळतात. अशावेळी ही टोके थोडी कापावीत. डोक्याला केसांच्या मुळाशी आठवड्यातून किमान एकदा खोबरेल अथवा माका किवा आवळेल तेलाचा मसाज करून अर्धा तासानंतर केस धुवावेत. केस वाळवताना ड्रायरचा वापर शक्यतो करू नये. कोरड्या पंचाने केस पुसावेत.
- केसासाठी काय करायला हवं ??
- केस खूप खरखरीत होत असतील तर मेंदी लावणं कमी/ बंद करायला हवं. एकुणातच केमिकल्सचा वापर शक्यतो नको.. म्हणजे कलरींग, हायलाइटस, पर्मिंग इत्यादी.
- कंडिशनर लावून २ तास केसात तसंच ठेवून मग धूवून टाकायचे केस.. हे १५ दिवसातून एकदा तरी नक्की. आणि केस धुण्यापूर्वी तेल लावणे मस्ट.
- शक्यतो राउंड ब्रश वापरू नये त्याने केस जास्त तुटतात. फ्लॅट ब्रश ने जास्त चांगले रहातात.
- शॅम्पू+कंडिशनर रूटिन मधून अधेमधे शिकेकाई+इतर औषधी वनस्पतींची पावडर उकळून गाळून घेतलेले पाणी याने केस धुणे आणि जास्वंद जेल चे कंडिशनिंग केल्यास केसांचे पोषण होते.
No comments:
Post a Comment