Latest News

अध्यात्म आणि विज्ञान ..जे जे पिंडी ते ते ब्रम्हांडी

 
परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१५.०८.२०१३)

॥ हरि ॐ ॥ 
आज आपल्याला छान गो़ष्ट बघायची आहे. ॐ मन्त्राय नम: मध्ये आपण गुरुक्षेत्रम मंत्र बघत आहोत.

एक algorithm बघतोय π. गेल्या वेळेला π = २२/७ ही निसर्गातली रचना/ नियम आहे आणि mathematics मधलं assumption. बर्‍याचजणांना प्रश्न पडले. π   =   सूक्ष्म पातळीवर real value = स्थिरांक आणि स्थूल पातळीवर π  च्या जवळ नेणारी संख्या. 

π =२२/७= वर्तुळाचा परीघ / वर्तुळाचा व्यास

वर्तुळाचा परीघ = हनुमंत = ब्रम्हांडाभोवती वेढे वज्रपुच्छे करू शके

वर्तुळाचा व्यास = हरि + हर = शौर्य + क्षमा = त्रिविक्रम

π = ratio = त्रिविक्रमाचा प्रभाव / सत्ता

आपण π च्या निरनिराळ्या भूमिका पहिल्या. आज आपल्याला आपल्या सगळ्यात जवळची आपल्या शरीरात असलेली π ची, त्रिपुरारी त्रिविक्रमाची सत्ता बघायची आहे.


जेव्हा anatomy मध्ये medical ला Dissection करतो, तेव्हा Head मधून Brain Disect  करताना सगळ्यात मोठी कठीण गोष्ट असते circle of willis सांभाळणे. त्या मेंदूतच मोठे रह्स्य लपलेले असते. ते म्हणजे हे circle of willis, this is a station of π.

मेंदूमध्ये लहान व मोठा मेंदू असतो. मेंदूच्या खाली Brain stem (मेंदूचा देठ) असतो. येथे दोन मुख्य रक्तवाहिन्या (arteries) शुद्ध रक्ताचा पुरवठा मेंदूला करतात. मेंदूचा देठ जेथे मेंदूला मिळतो तेथे रक्तवाहिन्यांचं जाळं तयार होतं. तेथे या रक्तवाहिन्यांमुळे एक circle बनतं तेच circle of willis असते. येथे महत्त्वाच्या क्रिया होत असतात. तुमचा रक्तपुरवठा maintain करण्याचे, रक्तदाब maintain करण्याचे कार्य करतात. इथून शुध्द रक्तवाहिन्या मेंदूला रक्तप्रवाह supply करतात. 


Circle of willis, P.P. Bapu  said this site coincides with the Aadnya chakra of our body.
This is the site of Pi in our body. The site of trivikram...


दोन अत्यंत मह्त्त्वाच्या रक्तवाहिन्या इथे एकत्र येतात व इथे एक circle बनते. येथे एक जरी रक्तवाहिनी हळूहळू अकार्यक्षम झाली तरी त्याच्याशी संबंधित मेंदूचा भाग मरत नाही. circle of willis मुळे तिथे रक्तपुरवठा सुरूच राहतो. Circle of willis is the station of -π in our body.

त्रिविक्रमा़च्या प्रभावाचं receiving station म्हणजे हे circle of willis. कुठल्याही गो़ष्टीला कशाही प्रकारे घडवून आणण्याची प्रक्रिया ह्या circle of willis मध्ये आहे. हे केंद्र आहे त्रिविक्रमाचा प्रभाव ग्रहण करण्याचे. हे स्थान आज्ञाचक्राचे आहे. ह्या चक्राचा स्वामी आहे हनुमंत. हे आज्ञाचक्र जोडले गेले आहे ह्या circle  of willis सोबत.


त्रिविक्रम म्हणजे रामासहित जोडलेला हनुमंत.


म्हणून आपलं आज्ञाचक्र जपायचं. ह्यासाठी कुठेही कुणाच्याही पाया पडायचे नाही. कारण हे आज्ञाचक्र जसे पवित्र स्पंदने स्वीकारण्याचे स्थान तसेच अपवित्र स्पंदने स्वीकारण्याचे स्थान आहे. हे आज्ञाचक्र circle of willis सोबत कसे जोडले आहे? तर हे मेंदूच्या प्रत्येक कृतीशी जोडलेले आहे. आम्हाला स्वतःला बदलण्याची क्षमता ही ह्या मेंदूमध्ये असते. ज्या प्रमाणात भक्ती त्या प्रमाणात पवित्र किंवा अपवित्र स्पंदने स्वीकारण्याची क्षमता असते. आम्ही सामान्य माणसे. त्यामुळे चुकीच्या भावना स्पंदने असणारच. आम्ही कसेही असलो तरी आमच्या बापूला आवडतो हे महत्वाचं.


ज्या प्रमाणात आज्ञाचक्र powerful  त्या प्रमाणात आमची ताकद जास्त. रोगप्रतिकारक शक्ती जास्त. त्याने सगळ्यांना सारखे दिले आहे. पण ते वापरायचे कसे ह्याची मुभा त्याने सगळ्यांना दिली आहे. हेच कर्मस्वातंत्र्य. गुरूची आज्ञा हीच गुरूची मूळ शक्ती असते. आपल्याकडून जेवढे जमेल तेवढे पालन करण्याचे प्रयत्न करावे. त्या परमात्म्याबरोबर आम्ही दररोज चालत राहिले पाहिजे. दररोज तरी आम्हाला थोडा वेळ तरी वाटले पाहिजे. देव माझ्याकडे पाहतोच, मी देवाकडे पाहतोय.


१९ व्या अध्यायात बाबा देशमुखीणबाईस म्हणतात. तू माझ्याकडे अनन्यपणे पहा मी पण तसेच पाहीन हेच माझ्या गुरूने शिकवले. 

तुम्ही जिथे पाहता तिथे देवाचे तेजोवलय (aura) बाबा इथे मोठे π चे रहस्य सांगत आहेत. मीही तुझ्याकडे तसाच पाहीन म्हणजे म्हणजे तुझ्या तेजोवलयाकडे पाहीन, तुझे शरीराचे तेज किती विकृत झाले आहे, ते पाहीन. जी जी चुकीची दुरुस्ती आवश्यक आहे ती ती मी तेव्हा करतो म्हणून ध्यान आवश्यक आहे.


न करिता सुगुणाचे ध्याना 

भक्तिभाव कदा प्रकटेना’

सगळ्यात श्रेष्ठ promise आहे. इथे बाबा Doctor च्या भूमिकेत पाहत आहेत. आमच्यातील विकृती दूर करण्यासाठी. आमच्या aura मधला Defeet दूर करण्यासाठी बाबा सांगतात मी माझा π वापरेन. आम्ही भोवर्‍य़ात फिरत राह्तो. जिथून प्रवाह सुरू होतो तिथेच जाण्यासाठी आमची π ची value बरोबर असावी लागते.


आज आपण बघतो आमच्या शरीरात सगळे तसेच आहे. हे बाहेर आहे ते एक station आहे. त्या जगदंबेने मदत पाठवली पण तुमच्या station वरून ती वितरीत झाली नाहीत तर काय उपयोग कारण आमच्या पेशींना विचारांना लागणारी सत्य-प्रेम-आनंदाची ताकद वाहून नेता येत नाही. 

असा विचार करा आमच्या हातावर त्यांचे चरण आहे. त्या चरणांवर डोके ठेवा.


समजा माझ्याकडे काहीच नाही. ज्याची श्रध्दा आहे. त्याच्यासाठी त्याच्या उजव्या हातावर परमात्मा, आल्हादिनी व शेष सदैव निवास करत असतात. त्यांचे चरण तिथेच असतात. त्या चरणांवर आपण आज्ञाचक्र ठेवले पाहिजे.


हे circle of willis तो सांभाळतो. आपल्या मेंदूत लाखो घडामोडी घडत असतात. काही पैसे न मोजता देवाने हा मेंदू दिला आहे. त्याचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून इथे टिळा लावायचा. ह्या आज्ञाचक्राच्या भागाला दररोज पवित्र गोष्टी दिल्या पाहिजेत. म्हणून उदी, गंध लावावे. वाईट विचार कुठूनही आला तरी माझी काळजी घॆणारी माय चण्डिका आहे. ह्या विश्वासाने पुढे जा. पूर्वीच्या काळी विधवा स्त्रीला गंध लावायची परवानगी नव्ह्ती तेव्हा त्यांना अष्टगंध लावायची permission होती.


जुनी माणसे तीर्थप्रसाद घेतल्यावर हात डोळे, कपाळाला व डोक्याच्या मागे (circle of willis) ला पुसतात. देवाच्या चरणांना हात लावलेला डोकयाच्या मागे (circle of willis) ला व कपाळावर आज्ञाचक्राला लावा. तुमची श्रध्दाच कामी येत असते. रावणाने शिवाची पूजा केली व पार्वतीला पळवली हे चुकीचे आहे. देवाला प्रार्थना करा देवा माझं आज्ञाचक्र ताब्यात घे. हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ म्हणा.


आपलं गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणताना ॐ रामवरदायिनी ह्या पदामध्ये तुमचे आज्ञाचक्र व circle of willis ह्यांना जोडणारा प्राणमय मार्ग आपोआप संपूर्ण मोकळा होतो कितीही ख्रराब झाला असला/ घाण असला तरीही, पुन्हा चांगला केला जातो.


म्हणून दररोज गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणा. कमीत कमी अंकुर मंत्र म्हणा. गुरुक्षेत्रम्‌ मंत्र एकदा- अंकुर मंत्र १०८ वेळा - गुरुक्षेत्रम्‌ मंत्र एकदा असे म्हटलेत तर कोणत्याही भोवर्‍यात सापडलेलो असो तो आपल्याला त्यातून बाहेर काढतोच काढतो.


कोनाची आकृती पाहिली तर आपल्याला चार प्रमुख गोष्टी कळतात circle, parabola, hyperbola, ellipse. आदिमाता बिंदुस्वरूप आणि तिच्यातून संपूर्ण विश्व हे universe विस्तारत गेलंय. ह्या कोनाचा best section एक वर्तुळ आणि parabola. आपण नाम काढतो तो parabola.




ह्याच्या मध्यबिंदुतून जी रेषा जाते (axis of symmetry) तिच्या दोन्ही बाजूला mirror image तयार होते. इथे Geometry मधली महत्त्वाची गोष्ट येते directrix ( दिग्दर्शिका). parabola वरील कोणताही बिंदू (locus) त्या locus चं focus पर्यंत distance आणि directrix पर्यंत distance हे same असतं.


आदिमाता आणि तिचा पुत्र ह्यांचे एकत्रित चिन्ह म्हणजे नाम. ह्यात आपण आपले आज्ञाचक्र lock करतो. हे तुमचंच देवा. Totally surrendered to you. तुमचा focus कुठेही असो, तुम्ही कितीही स्वैर झालात, focus बदलला तरी तुमचं त्याच्यापासूनचं distance बदलत नाही. आमच्या जीवनाचा parabola आम्ही कपाळावर काढतो ते नाम म्हणून आमच्या जीवनातलं कार्य सुरळीत चालावं म्हणून. आज्ञाचक्राचे ultimate कवच. अध्यात्म आणि science कधीच एकमेकांच्या विरोधात असू शकत नाही.


ज्ञानानाम्‌ चिन्मयातीता । शून्यानाम्‌ शून्यसाक्षिणी ।

नाम हा ultimate parabola. आमची सर्व भूमिती नीट कार्यान्वित / नियंत्रित केली जाते.

यातून शिकलो काय? तुम्ही त्याच्याकडे पहाल तसाच तो तुमच्याकडे पाहतो. तो व्देषाने कुणाकडे बघतच नाही. त्याचा aura (π) आमच्या aura (π) वर काम करतो.


कपाळावर हरिद्रा, उदी लावणे, कुंकू लावणे का आवश्यक आहे? ही हरिद्रा साक्षात रेणुकामातेने सती जाताना स्वत:च्या हाताने कपाळावरून काढून परशुरामास दिली ती ही हरिद्रा आज आपल्याकडे आहे. मी अंबज्ञ आहे. मी भाग्यवान आहे. आज्ञाचक्र, circle of willis आमचे भाग्य आहे. कारण माझं circle of willis हे त्याच्या ताब्यात आहे. आमचे ग्रहण करणारे station आम्हाला नीट राखायचे आहे. उदी लावायची गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणायचा. आमच्या मेंदूत त्या (π) ची किती सत्ता आहे ते आपण बघितले.


π चाच parabola बनतो हे लक्षात घ्या. देव त्याची तत्त्वे कधीच बदलत नाही मग आपण या जन्म-मरणाच्या भोवर्‍यात अडकायचे काय?

आपण कायम तीन इच्छा मनी बाळगायच्या :

१) माझा प्रत्येक जन्म त्याच्या इच्छेने व्हावा.

२) त्याच्या कार्यासाठी व्हावा

३) तो जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा मी असलंच पाहिजे.


नाम जेव्हा काढतो तेव्हा आम्हाला कळले पाहिजे आमचे आज्ञाचक्र lock झाले आहे. रोज पाण्याने / उदीने नाम काढू शकतो. असे जेव्हा आज्ञाचक्र lock होणार तेव्हा ते अधिकाधिक चांगल्या गोष्टी स्वीकारणार आहे.

Source  : http://www.manasamarthyadata.com

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.