सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२८/०७/२०११)
हरि ॐ
‘ॐ मंत्राय नम:’ ह्या नामामध्ये ‘ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै सर्व बाधाप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्’ ह्यातील वम बाधा आपण बघत आहोत. आतापर्यंत चार वमन बाधा बघितल्या आज पाचवी बाधा बघायची आहे. आजची जी बाधा आहे ती actually मला झालेली बाधा आहे. प्रत्येकाला वाटत असतं की, ह्या बापूला काहीही कळत नाही. बापूचा guidance हवा असतो, मदत हवी असते, पण एक खात्री असते की, ह्याला काहीही कळत नाही. ही प्रत्येकाच्या मनातली भावना हीच मला (परमपूज्य बापू) झालेली बाधा.
बापूला काही कळत नाही, हा जो प्रत्येक मनातला भाव आहे, तसेच बापू शेवटी कुठे कुठे लक्ष घालणार, इथे एवढी माणसं आहेत, त्यात प्रत्येकाच्या मनात काय चाललंय, हे बापूला कसं समजणारं. हा मनातला भाव माणसाच्या मनातच राहतो, त्याचे वमन तो करत नाही. त्यामुळे ही बाधा मला (परमपूज्य बापू) होते, कारण त्या माणसासाठी मला जे करायचे आहे, त्याच्या आड ही बाधा येते.
बापूला काही कळत नाही, हा जो प्रत्येक मनातला भाव आहे, तसेच बापू शेवटी कुठे कुठे लक्ष घालणार, इथे एवढी माणसं आहेत, त्यात प्रत्येकाच्या मनात काय चाललंय, हे बापूला कसं समजणारं. हा मनातला भाव माणसाच्या मनातच राहतो, त्याचे वमन तो करत नाही. त्यामुळे ही बाधा मला (परमपूज्य बापू) होते, कारण त्या माणसासाठी मला जे करायचे आहे, त्याच्या आड ही बाधा येते.
मी कुठलाही चमत्कार करत नाही आणि कधीच करणारही नाही, मला उडता येत नाही, मला काही तीन डोळे किंवा चार हात नाहीत. पण माझ्या कामात ह्या बाधेमुळे अडचण निर्माण होते. ज्याप्रमाणात बापूला काही कळत नाही हा भाव मोठा त्याप्रमाणात मला (परमपूज्य बापू) झालेली बाधा मोठी.
ज्याप्रमाणात बापूला सगळं कळतं हा भाव त्या प्रमाणात माझ्यासाठी (परमपूज्य बापू) प्रश्न सोपा. माणसाच्या मनात प्रथम काय विचार येतो? की, जर काही चुकून बोललो आणि आपल्याला हाकलून काढलं तर, असा विचार हीच बाधा आहे. ज्या गोष्टीमुळे तुम्हांला वाटतं की, तुमचं नुकसान होईल actually त्याच गोष्टीमुळे तुमचं नुकसान व्हायचं टळतं. पण, त्यासाठी तुम्हांला त्याचं वमन करायला पाहिजे, ते उलटी करुन बाहेर काढायला पाहिजे.
ही वमन बाधा म्हणजे एक चिकित्साच (treatment) आहे. इथे बाधा माझी (परमपूज्य बापू) व औषध तुम्हांला घ्यायला हवे. उलटी होण्यासाठी omitic drug उलटी होण्यासाठी औषध द्यावे लागते, ते माझ्याकडे तयार असते. तुम्ही म्हणाल, बापू आम्हांला आधीच भरपूर ताप आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी मजेत रहा, आम्ही आमच्या घरी मजेत राहतो, हो ना? (सगळे नाही म्हणतात) ‘नाही’ हे उत्तर चांगले आहे.
पूर्वी घरातील मोठी मंडळी पोट साफ होण्यासाठी एरंडेल किंआ वमन द्रव्ये दयायची, अनेकांनी इथे घेतली असतील. मी (परमपूज्य बापू) कधीही असे वमनासाठी औषध घेतली नाही, कारण माझ्यात वमन करण्यासारखं काहीही नाही. ह्याला माझा अहंकार म्हणा की, आणि काही म्हणा. मी परमेश्वर नाही, तरी माझेच म्हणणे मी खरं करतो.
पूर्वी घरातील मोठी मंडळी पोट साफ होण्यासाठी एरंडेल किंआ वमन द्रव्ये दयायची, अनेकांनी इथे घेतली असतील. मी (परमपूज्य बापू) कधीही असे वमनासाठी औषध घेतली नाही, कारण माझ्यात वमन करण्यासारखं काहीही नाही. ह्याला माझा अहंकार म्हणा की, आणि काही म्हणा. मी परमेश्वर नाही, तरी माझेच म्हणणे मी खरं करतो.
माझं मन हे चित्तरुपाने कायम (मी कुठेही असलो तरी) माझ्या (परमपूज्य बापू) आई चण्डिकेच्या गर्भातच असते. त्यामुळे तिचे नियम आपोआप मलाही लागू होतात. तुम्हांला प्रत्येकाला काही मिळविण्यासाठी प्रयास करावे लागतात पण मला असे प्रयास करावे लागत नाहीत. मी (परमपूज्य बापू) किती आळशी आहे ते माझ्या आई चण्डिकेला माहित आहे. त्यामुळे तिने कायम मला तिच्या गर्भातच ठेवले आहे. म्हणून आपोआप तिचे जे जे नियम आहेत, ते नियम मलाही लागू होतात.
जोपर्यंत तुमच्याकडून वमन घडत नाही. तोपर्यंत वारंवार मी तुमच्यासमोर औषध घेऊन येत असतो. उलटी होण्यासाठी काय करावे लागते? समजा चूकून पाल खाल्ली गेली तर आपण काय करतो? मिठाचे पाणी पितो, त्यामुळे उलटी होते हेच मीठ जर अन्नात कमी असले तरी मळमळते, म्हणजे उलटी होत आहे, असे वाटते.
मीठ हे basically समुद्रात बनणारे आहे. पृथ्वीचा ७०% भाग समुद्र आहे. आपण बघतो पाऊस पडतो ते पाणी गोड असते, नदयांचे पाणी मोठं गोडं असते. हे सगळॆ गोडं पाणी शेवटी समुद्रात जाते. असे किती वर्षे चालू आहे? २००० वर्षे, तर शालिवाहन शकेनुसार ४००० वर्षे. इतकी वर्षे एवढं गोडं पाणी समुद्रात जाऊनही शेवटी समुद्र खारा तो खाराच. पूर्वी मुंबईत ठिकठिकाणी मिठागरे दिसायची. आता क्वचित दिसतात. मग आज आम्हांला मीठ कुठून मिळते? आज आम्ही जे मीठ खातो ते सामुद्री मीठ नसते. आज आपण chemical sythetic मीठ रोज वापरतो.
मीठ हे अन्नाचा तसेच औषधाचाही अपरिहार्य भाग आहे. हेच मीठ पोटातली अन्नाची घाण बाहेर काढण्यासाठी देखील. म्हणजेच वमनासाठी उपयोगी आहे. ह्याच मीठाशी आपला ‘इमान’ जोडलेला असतो. म्हणून आपण म्हणतो ‘तो माझ्या मिठाला जागला नाही’ किंवा ‘तो नमकहराम’ निघाला.
जेव्हा मनुष्याच्या मनात सद्गुरुंना काही कळत नाही, असा भाव येतो, तेव्हा तो सद्गुरुंच्या फोटोसमोर ५०% फक्त खरं बोलतो. तुम्हांला काय वाटतं, त्या फोटोला काही ऐकू येत नाही, फोटोला काहीही दिसतं नाही. आता म्हणाल असे असेल तर बापू फोटो घरात न ठेवलेला बरा.
समजा तुम्ही घरातले सगळे फोटो जरी बुडविले तरीदेखील तुमचा सद्गुरु जर खरा असेल तर त्याने तुमच्या मेंदूत एक केंद्र बनवलेलं असतं. जर तुमचा गुरु ढोंगी असेल तर तो तुमच्या मेंदूत केंद्र बनवू शकत नाही. ढोंगी गुरु हे कलिचे दूत असतात हे आपण मातृवात्स्यल्यविन्दानम् मध्ये वाचतो. जर तुम्ही चांगल्या गुरुकडे गेलात, तर तो सद्गुरु त्याच्या फोटोतूनही तुमच्याकडे पाहतो. तुमच्या मनात तुमच्या गुरुप्रती थोडा जरी भाव असेल तरी तो तुमच्या मनात त्याचं केंद्र तयार करतो.
तुम्ही म्हणाल मग बापू, सद्गुरु मानतच नाही त्यांच काय? तर जे त्याला सद्गुरु मानतात त्यांच्या मनात तो आपलं केंद्र निर्माण करतो, तर जे मानत नाहीत त्यांच्या बुद्धीत तो केंद्र निर्माण करतो. मानवात बुद्धीपेक्षा मन मोठे असते. शरीरातून जेव्हा लिंग देह बाहेर तेव्हा त्यासोबत प्राण व मन असते, बुद्धी नाही. बुद्धी ही कर्मस्वातंत्र्यासाठी मानवाला दिली आहे.
जेव्हा गुरुची काय गरज? गुरु काय करणार आहे? असे जेव्हा मनुष्य बोलतो, तेव्हा तो फक्त बुद्धीचा वापर करतो. बुद्धीने प्रेम करता येत नाही.
कुठलीही गुढ भाषा मला कळत नाही, मला (परमपूज्य बापू) फक्त प्रेमाची भाषा कळते. द्वेषाची भाषा मला येतच नाही.
मनाने प्रेम केल्याशिवाय बुद्धीने भक्ती करता येत नाही सबुरी ठेवता येत नाही. हे मनामधलं प्रेम टिकून राहिलं पाहिजे, म्हणून फक्त श्रद्धावानांच्या मनात सद्गुरु त्यांचे केंद्र निर्माण करतो. मग त्या श्रद्धावानांच्या मनात तो तीन पावलं टाकत चालतो व कायम चालत राहतो, असे करता करता तो मनाचा भाग चित्तात रुपांतर करतो. मग बुद्धीचा रोलच कुठे उरत नाही. बुद्धीत तो कधीही तीन पावले टाकत नाही.
बुद्धी म्हणजे (reflex) प्रतिक्षिप्त क्रियेचा वर जाऊन विचार करण्याची शक्ती.
बघा, एखाद्या वेळेस गरम पाणी किंवा तेल हातावर पडले तर आपण लगेच हात मागे घेतो. पण समजा निरांजनात दिप लावलेला असताना ते खाली पडत असेल आणि एका आईचा हात खाली असेल, त्या हाताखाली तिचे बाळ असेल, तर निरांजनातले गरम तेल हातावर पडले तरी त्या आईचा हात बाजूला जाणार नाही, ती ते गरम तेल स्वत:च्या हातात धरेल, बाळाला इजा होऊ नये म्हणून.
म्हणजेच कुठलीही क्रिया घडताना नेहमी आधी प्रेमाची जाणीव बुद्धीला होते व त्यानुसार क्रिया घडते.
तुम्ही सद्गुरुला माना अथवा मानू नका, फक्त त्याला सगळं कळतं हा भाव तुमच्या मनामध्ये जेव्हा कायम असतो तेव्हा तो तुम्हांला उलटी करायला भाग पाडतो. तुमचा सद्गुरुप्रती भाव बुद्धीपुरता मर्यादित असेल तर तो उलटी करायला भाग पाडत नाही.
बघा, चूक एखादी करता करता पटकन मनात सद्गुरुचे वाक्य आठवतं, चूक घडल्यावर त्याचा फोटो दिसतो, मग नकळत (हात जोडून) sorry म्हटले जाते. ही चुकीची कबुली देणे, त्याला सगळं कळतं हा विश्वास ठेवून sorry म्हणणे म्हणजे उलटी करणं.
रात्री भयग्रस्त स्वप्न पडतात. का? तर सद्गुरुंची कृपा तुमच्या जीवनात येते म्हणून. जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटायला हवी. तेव्हा तुमच्या व्यावहारिक जीवनात घडणारी वाईट गोष्ट स्वप्नात देऊन सद्गुरु वमन घडवून आणतो. श्रद्धावानांच्या मनात उभा राहून तो वमन क्रिया घडवून आणतो.
तुम्ही म्हणाल, बापू मग आम्हांला त्याचा त्रास होतो का? तर - १)जे त्याला सद्गुरु मानत नाहीत, त्यांना काहीही त्रास होत नाही व २)जे त्याला सद्गुरु मानतात पण मनात मात्र त्यास काही कळत नाही अशी भावना असते, त्यांना तो वारंवार उलट्या करायला लावतो. जेवढे विष (वाईट भाग) तुम्ही पेलू शकता, तेवढेच विष तो तुमच्या देहात ठेवतो, बाकीचे ओकायला भाग पाडतो. म्हणून त्याला कळत नाही असे काहीच नाही हा विश्वास आपला असला पाहिजे. उरलेले देहातले विष ओकून काढणे हा मनुष्याचा स्वत:चा पुरुषार्थ असतो.
फार वर्षापूर्वी मी म्हणजे डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणून अनुभवलेली एक गोष्ट सांगतो. कॉलेज चालू असतानाच्या काळात एकदा मी (परमपूज्य बापू)
मित्रमंडळीं बरोबर जंगलात फिरायला गेलो होतो. तिथे एका गावात संध्याकाळी एका घरी थांबलो. आम्ही जिथे होतो तिथे येऊन त्या घरातल्या पुरुषाने आम्हांला सांगितले, "आमचे वारकरी बुवा इथे येणार आहेत, त्यांच्यासाठी ही जागा सारवून ठेवली आहे. आम्ही मग उठून दुसरीकडे बसलो. ह्या घरातील मनुष्य अतिशय साधा, भोळा भाविक होता. थोड्या वेळाने वारकरी बुवा आले. ते ही असेच साधे-भोळे होते, ह्या बुवांना हा मनुष्य गुरु मानायचा, पण बुवा त्यावर म्हणायचे, "मी काही सद्गुरु नाही, आपला सद्गुरु एकच ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज”.
इथे गुरुने स्पष्टपणे सांगितले की, आपला खरा सद्गुरु कोण? त्या बुवांनी कुठलाही मोठेपणा स्वत:कडे घेतला नाही. म्हणूनच, त्या मनुष्याने ह्या बुवांना प्रेमाने केलेला नमस्कार पोहचतो कोणाला? तर त्या ज्ञानेश्वर महाराजांनाच!! वारकरी बुवा निघताना हा मनुष्य त्यांना सोडायला जातो, कुंपणापर्यंत आल्यावर त्यांना आठवते, आपली हिरवी पिशवी सोबत नाही, तेव्हा शोधत असताना तो मनुष्य म्हणतो, इथे नाही चिमणाबाईच्या घरी भजनाला गेला होता तिथे राहिली असेल. घरात येऊन बुवा बघतात तर घरात एक चिमणीचे घरटे होते, तिथेच खुंटीवर त्यांना त्यांची हिरवी पिशवी सापडते. ह्यात कागद असतो, ज्यावर लिहिलेले असते मुक्काम पोस्ट अमुक, क्षेत्र -आळंदी. आळंदी म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांचे स्थान. इथे गुरु साधा व भक्तही साधा. त्यामुळे त्यांचा भाव पोहचतो तो खर्या सद्गुरु तत्त्वाला म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांना.
इथे गुरुने स्पष्टपणे सांगितले की, आपला खरा सद्गुरु कोण? त्या बुवांनी कुठलाही मोठेपणा स्वत:कडे घेतला नाही. म्हणूनच, त्या मनुष्याने ह्या बुवांना प्रेमाने केलेला नमस्कार पोहचतो कोणाला? तर त्या ज्ञानेश्वर महाराजांनाच!! वारकरी बुवा निघताना हा मनुष्य त्यांना सोडायला जातो, कुंपणापर्यंत आल्यावर त्यांना आठवते, आपली हिरवी पिशवी सोबत नाही, तेव्हा शोधत असताना तो मनुष्य म्हणतो, इथे नाही चिमणाबाईच्या घरी भजनाला गेला होता तिथे राहिली असेल. घरात येऊन बुवा बघतात तर घरात एक चिमणीचे घरटे होते, तिथेच खुंटीवर त्यांना त्यांची हिरवी पिशवी सापडते. ह्यात कागद असतो, ज्यावर लिहिलेले असते मुक्काम पोस्ट अमुक, क्षेत्र -आळंदी. आळंदी म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांचे स्थान. इथे गुरु साधा व भक्तही साधा. त्यामुळे त्यांचा भाव पोहचतो तो खर्या सद्गुरु तत्त्वाला म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांना.
अशीच एक स्वामी समर्थांची गोष्ट. ज्यांनी इथे स्वामी समर्थांची बखर वाचली असेल त्यांना माहिती असेल की ते किती solid जहाल होते.
स्वामींना त्याने पाहिले, तेव्हा ते होते दिगंबर अवस्थेत, उकीरड्यावर खायला बसले होते, मध्येच आपल्या ताटातले कुत्र्याला खाऊ घालत. असे त्यांचे रुप बघून ह्या मनुष्यास वाटले हे काय आपली भीती घालवणार? तेवढ्यात एक कुत्रा आला, तेव्हा स्वामी म्हणाले, "चोळ्या पळ, माझा स्वभाव आधीच भित्रा.”
हे दृश्य पाहून तो मनुष्य परत गंगाधरपंतांकडे आला व त्याने सांगितले, ‘तुमचे गुरु असे कसे?’ गंगाधरपंतांनी सर्व ऐकून घेतल्यावर म्हणाले, ‘इथे स्वामींकडे फक्त निखळ सत्य आहे. जे तुझ्या मनात तेच सद्गुरु म्हणतो की माझ्या मनात आहे.’
साईसच्चरितात अमीर शक्करच्या कथेत बाबा काय म्हणतात? ‘जे भक्तांच्या उशाशी तेच माझ्या उशाशी’ तुझ जे जीवन भितीने भरलेलं होते ते स्वामीनीं ओढून घेतले स्वत:कडे असे गंगाधरपंत त्या मनुष्यास सांगतात.
ह्या मनुष्याला ही गोष्ट पटत नाही. तो टांगा करुन परत अक्कलकोटला जायला निघतो, मध्येच दत्ताच्या मूळ स्थानी गाणगापूरला जाण्याचा विचार मनात येतो पण टांगावाला तयार होत नाही, म्हणून त्या टांगेवाल्याच्या कृपेने ह्या मनुष्यास परत अक्कलकोटास यावे लागते. तिथे रात्री एका घरात मुक्कामाला थांबतो, तेव्हा घरातला मुख्य पुरुष त्यास सांगतो आमची मावळ (आत्या) वारली आहे, त्यामुळे आम्ही सगळे तिथे जातोय, तुम्ही इथे निवांतपणे आराम करा. त्याची सर्व योग्य व्यवस्था करुन त्या घरातील सर्व मंडळी निघून जातात. घरात कुणी नाही, रात्रीची वेळ हा मनुष्य एकटा तरीही हा शांतपणे विडी फुंकतो. पाणी पितो, तेवढ्यात आवाज येतो, म्हणून बघायला जातो तर मांजराच्या धक्क्याने मडकी पडलेली असतात, काळे मांजर तिथून जाताना दिसते, तेवढ्यात जवळच त्याला साप दिसतो, तो काठीने त्या सापावर प्रहार करुन मारतो. तेव्हा त्याच्या मनात अचानक विचार येतात, हे मी काय केले? मी रात्री एकटा राहिलो, काळी मांजर आली, साप दिसला त्याला मारले! असे कसे झाले? माझी भीती गेली कुठे?
तेव्हा त्याला गंगाधरपंतांचे वाक्य आठवते. तो धावत येऊन गंगाधरपंतांचे पाय धरतो. गंगाधरपंतांकडे स्वामींविषयी मनात आलेल्या चुकीच्या घाणेरड्या गोष्टींविषयी कबुली त्याने दिली. म्हणजेच त्याने वमन केले कोणाकडे? तर गुरुकडे आणणार्या व्यक्तीकडे. तेव्हा त्याला शब्द ऐकू येतात, ‘हात् रांडेच्या’ मागे वळून बघतो तर स्वामी उभे असतात त्या मनुष्याच्या मनात प्रेमभाव दाटून येतो. तो स्वामींचे पाय धरतो स्वामी म्हणतात, ‘हटाव इसको’ असे बोलून त्याला लाथ मारतात. तरी हा पाय सोडत नाही. स्वामी लाथ मारतात तरी परत परत हा त्यांचे पाय घट्ट पकडायला बघतो, असेच हे रस्त्याने चालत जातात.
स्वामी पुढे हा मनुष्य पाय धरतो, आणि स्वामी लाथ मारतात. ह्या दोघांच्या मागे गंगाधरपंत धावत असतात, स्वामींना विनंती करतात,"त्या मनुष्यास क्षमा करा” स्वामी तरीही थांबत नाही. एव्हाना एवढा आवाज ऐकून गावातली कुत्री मागे लागतात. स्वामींचे सेवेकरी मागे त्यांच्या धावू लागतात. तरी ते थांबत नाहीत. त्याच गावात एक कानफाट्या म्हणून माणूस राहत असतो, हा कुणी ओरडायला लागले की त्याच्या डोक्यात काठी घालायचा हा सगळा आवाज ऐकून तो कानफाट्या ह्यांच्या मागे धावत येतो, सर्वांत पाठी गंगाधरपंत ‘स्वामी’ म्हणत ओरडत जात असतात, त्यांच्या डोक्यात हा कानफाट्या काठी मारणार, एवढ्यात तो मनुष्य स्वामींचे पाय सोडून गंगाधरपंतांवर आडवा होतो त्या काठीचा घाव झेलण्यासाठी तेवढ्यात काठीही थांबते, स्वामीही थांबतात. त्या मनुष्यास म्हणतात, "माझे पाय पाहिजे ना हवे तेवढे घे” हे ऐकल्यावर तो मनुष्य स्वामींच्या पायांचे मनोसोक्त चुंबन घेतो व पुढे त्यांचा निस्सिम भक्त बनतो.
स्वामी पुढे हा मनुष्य पाय धरतो, आणि स्वामी लाथ मारतात. ह्या दोघांच्या मागे गंगाधरपंत धावत असतात, स्वामींना विनंती करतात,"त्या मनुष्यास क्षमा करा” स्वामी तरीही थांबत नाही. एव्हाना एवढा आवाज ऐकून गावातली कुत्री मागे लागतात. स्वामींचे सेवेकरी मागे त्यांच्या धावू लागतात. तरी ते थांबत नाहीत. त्याच गावात एक कानफाट्या म्हणून माणूस राहत असतो, हा कुणी ओरडायला लागले की त्याच्या डोक्यात काठी घालायचा हा सगळा आवाज ऐकून तो कानफाट्या ह्यांच्या मागे धावत येतो, सर्वांत पाठी गंगाधरपंत ‘स्वामी’ म्हणत ओरडत जात असतात, त्यांच्या डोक्यात हा कानफाट्या काठी मारणार, एवढ्यात तो मनुष्य स्वामींचे पाय सोडून गंगाधरपंतांवर आडवा होतो त्या काठीचा घाव झेलण्यासाठी तेवढ्यात काठीही थांबते, स्वामीही थांबतात. त्या मनुष्यास म्हणतात, "माझे पाय पाहिजे ना हवे तेवढे घे” हे ऐकल्यावर तो मनुष्य स्वामींच्या पायांचे मनोसोक्त चुंबन घेतो व पुढे त्यांचा निस्सिम भक्त बनतो.
म्हणूनच आम्हांला माझ्या सद्गुरुंना काही कळत नाही, ह्या बाधेचे वमन करायला शिकले पाहिजे. सद्गुरुतत्त्वाविषयीची ही भावना (त्याला काही कळत नाही) ही तुमच्या आयुष्यातील सर्वांत मोठी बाधा असते, म्हणून ह्याचे वमन होणे आवश्यक असते.
यासाठीच, इथे त्रिविक्रमासमोर सदैव मोकळे रहा, तुम्ही जसे आहात तसे. नाहीतर गैरसमज होतो त्या माणसासारखा. त्या व्यक्तिचे उद्गार "हा तर माझ्यासारखाच वेडा, भित्रा” म्हणजे नदीपाशी जायचे आणि तिला मृगजळ समजून परत वाळवंटापशी यायचे हीच सर्वांत मोठी बाधा आहे. ही बाधा दूर करायची असेल तर, ‘त्याला सगळं माहितच असतं’ ही एकच दृढ धारणा असायला हवी.
आज तुम्हांला एक गोष्ट मनापासून सांगतो. मला (परमपूज्य बापू) दुष्ट म्हणा. राक्षस म्हणा मला चालेल पण सद्गुरु ह्या शब्दाविषयी मनात प्रचंड श्रद्धा, प्रेम ठेवा. अगदी वाटेमधल्या दगडाला जरी मनापासून तुम्ही श्रद्धेने गुरु मानले तरी तो दगडसुद्धा तुमच्या मूळ सद्गुरुतत्त्वाची window बनलेला असेल.
एकदा का खात्री झाली गुरुची की परत उलटे फिरु नका. ह्या मनुष्याची एवढे सगळे स्वामींविषयी अनुभव ऐकूनही बुद्धी भ्रष्ट झाली. तशी होऊ देऊ नका.
एकच प्रार्थना करा "मी कधीही नदीला मृगजळ समजणार नाही, की तुमचे सगळॆ प्रश्न सुटले! हे मी तुम्हाला सांगू शकतो, कारण मी हे जन्मोजन्मी अनुभवले आहे. तो एकमेव अमर्यादित आहे. ते तत्त्व निर्गुण, निराकार पूर्ण चैत्यन्यमय आहे. त्याच्याएवढे कुणीच प्रेम करु शकत नाही.
गुरुपौर्णिमा नुकतीच झाली आता श्रावण महिना येईल. ज्यांना घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठणासाठी दादरला जाणे जमत नाही, त्यांनी घरी म्हणा. किती वेळ लागतो १०८ वेळा म्हणायला? जास्तीत जास्त २ १/२ तास. ह्यात एकदा जरी मनापासून म्हटलं तरी ते दत्तगुरुपर्यंत पोहचतो. नुसता वाचिक जप झाला तरी चालेल पण एकदा तरी करा.
त्या महाचण्डिकेने डाव्या कानाकडे शंख लावला आहे परशुरामाची हाक ऐकण्यासाठी, त्याच्यावर प्रेम करणार्या भक्तांची हाक ऐकण्यासाठी.
श्रावणात पुरुष प्रपत्ती करणार आहोत. चार पैकी एक जरी सोमवार केला तरी चालेल, चारही केले तर उत्तमच.
स्त्रियांनी प्रपत्तीच्या वेळी एवढे प्रश्न विचारुन मला हैराण केले होते, पण स्त्रियांनी ज्या भावाने प्रपत्ती केली होती त्यामुळे त्यांना ९०% मार्कस् मिळाले तर पुरुषांनी ५० ते ७५ % मार्कस् मिळवले.
पुरुषांनी सगळ्यांनी श्रीराम म्हणा कारण ह्यापुढे आता १००% मार्क मिळाले पाहिजेत.
लक्षात ठेवा, माझ्याकडे भरपूर मेकअप-मन आहेत, मी कुठलेही रुप घेऊन त्यामुळे फिरतो. त्यामुळे विचार करा ही आपत्ती (मी परमपूज्य बापू) हवी की प्रपत्ती हवी. आपत्ती मधली ‘ति’ पहिली असेल तर काय असते, त्याचा अर्थ शोधा.
ह्या शनिवारी काय आहे? दीप अमवास्या, तुमच्या आईचा वाढदिवस. अतिशय पवित्र तिथी आहे. अनेकांनी प्रश्न विचारले होते, "बापू आम्ही काय करु शकतो, ह्या दिवशी?”
तर ह्या दिवशी रात्री १० नंतर घरामध्ये पणती पासून समईपर्यंत कुठलाही एक दिवा प्रज्वलित करा, घरात आरास करा, रांगोळी काढा. जशी इच्छा असेल तसे सजवा. शांतपणे त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघत रहा. त्या ज्योतीकडे बघत आई, आई, आई (३ वेळा) म्हणा.
एरव्ही आपण फुलाने दिवा शांत करतो. पण हा दिवा शांत करायचा नाही. ही ज्योत म्हणजे तुमच्या आईचे आगमन असेल, ह्याची खात्री मी देतो त्या दिव्याकडे बघता बघता म्हणायचे, Happy Birthday To You..... कुठल्याही भाषेत म्हणा जेव्हा आई, आई.... म्हणाल, तेव्हा आई आलेलीच असेल नक्की.
!! हरि ॐ!!
Hari Om, Shri Ram
ReplyDelete