सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (१६-०६-२०११) प्रवचनाच्या आधी प.पू.बापुंनी पंचशील तृतीया परिक्षेचा निकाल सांगितला. हरी ॐ आता खरोखरच जोर जोरात टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट सांगणार आहे. मागच्या वेळेस रामनाम बँकेचे अकाऊंट सांगितले होते त्यामध्ये एक नाव सांगायचे राहुन गेले होते. ते म्हणजे आपल्यातल्याच एक भगिनी दक्षावीरा ह्यांच्या एकुण ११५१ वह्या आतापर्यंत पुर्ण झाल्या आहेत. साध्या गृहिणी प्रमाणे सगळे काम करत करतच त्यांनी ह्या वह्या लिहिल्या आहेत. आता इथल्या प्रत्येकाने ह्या ११५१ भागिले आपल्या वह्या असे गणित करायचे आणि जे उत्तर येईल ते स्वत:च्या घरात भिंतीवर लावून ठेवा, म्हणजे स्वप्नातसुद्धा रामनामाची वही येईल !!! आज प्रथम एक अतिशय महत्त्वाची सुचना आहे ती म्हणजे पुढच्या महिन्यात गुरुपौर्णिमा येतेय. कधी आहे? १५ जुलै शुक्रवारी, बरोबर आतापर्यंत भक्तांनी वेळोवेळी लिहिलेल्या चिठ्ठया मी ( प.पू.बापू) वाचतोय तेव्हा बर्याच जणांनी लिहिलेले होते की आम्हांला त्रिपुरारी पौर्णिमेला सुट्टी असते पण गुरुपौर्णिमेला सुट्टी नसते. मागे एकदा आपण हा उत्सव काही दिवस पुढे शिफ्ट केला होता. ह्यावेळी आपण एक दिवसाने पुढे शिफ्ट केला आहे म्हणजे १६ जुलैला, शनिवारी आपण गुरुपौर्णिमा इथेच साजरी करणार आहोत. ह्यावर्षीपासुन गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काही नवीन गोष्टी add करणार आहोत. त्याम्हणजे, १) दरवर्षी आपण गजर करत इष्टिका घेऊन प्रदक्षिणा घालतो तो मधला स्तंभ ह्या वेळेपासुन वेगळा बनवलेला असेल. ह्या स्तंभाला तीन बाजु असतील एका बाजुला डॉ. अनिरुद्धसिंह जोशी, दुसर्या बाजुला डॉ. नंदावीरा जोशी तर तिसर्या बाजुला डॉ. सुचितसिंह दत्तोपाध्ये ह्यांच्या प्रतिमा असतील व त्या स्तंभाच्या वर मध्यभागी कमळ असून त्यात माझ्या (प.पू.बापू) मूळ सद्गुरुंच्या पादुका असतील परंतु त्या बंदिस्त असतील त्याचं दर्शन कोणाला घेता येणार नाही आणि त्या पादुकांच्याच शेजारी एका बाजुला पुर्वा अवधुत (१ला कुंभ) व दुसर्या बाजुला अपुर्वा अवधुत(२४वा कुंभ) असतील. श्री वरदा चंडिका प्रसन्नोत्सवात जे volunteer कुंभ डोक्यावर घेऊन फिरले ते पाहुन भक्तांमधुन विचारणा झाली होती की, आम्हांला ह्याचा लाभ कधी मिळणार? तर आता ह्यापुढे दर गुरुपौर्णिमेला ह्या दोन्ही कुंभाभोवती प्रत्येक भक्तांस प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळणार आहे. पुर्वावधुत कुंभ (१ला कुंभ) व अपुर्वावधुत कुंभ (२४वा कुंभ) हे दोन्ही सर्वांत श्रेष्ठ असे सिद्ध केलेले कुंभ आहेत व त्यासोबत माझ्यासाठी (प.पू.बापू) श्रेष्ठ अश्या माझ्या गुरुंच्या पादुका ह्या दोन्हींचा लाभ प्रत्येक भक्तांस मिळणार आहे. २) ह्या वर्षीपासुन आमच्या घरातील (प.पू.बापू) नृसिंह सरस्वतींच्या मुळ पादुकांचे दर्शन प्रत्येक भक्तांस गुरुपौर्णिमा उत्सवस्थळी घेता येईल. ३) तसेच जो त्रिविक्रम इथे दर गुरुवारी असतो त्याचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुजन देणगी मूल्य भरुन प्रत्यक्ष पुजन करता येईल. देणगी मूल्य रुपये ५०१/- व रुपये १००१/- असे असणार आहे ज्याला जे जमेल ते पूजन श्रद्धावान करू शकतो. ४) आता ४ थी गोष्ट मांडायची आहे, जर तुम्हांला ही गोष्ट मनापासुन पसंद असेल तर हो म्हणा, तुम्ही हो म्हटलं तर हा ठराव मंजुर होणार आहे नाहीतर नाही आणि ही गोष्ट म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी (प.पू.बापू) मुंबईच्या बाहेर. ( सगळेजण नाही म्हणतात) . अरे, मी मुंबईच्या बाहेर जाणार नाही असे म्हणत होतो पण आता तुम्ही नाही म्हणालात म्हणजे मग मला आता जावे लागणार. !! काळजी करु नका, मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुंबईतच असणार आहे. बघा प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या ३ दिंड्या असतात तर ह्या ३ दिंड्यांचा उपयोग मी (प.पू.बापू) भक्तांच्या रांगेमधुन म्हणजेच भक्तीगंगेमधुन फिरवण्यासाठी करायचे ठरवले आहे. ह्या दिंड्या भक्तीगंगेमधुन फिरताना त्यांच्या सोबत पालखी असेल आणि त्या पालखीमध्ये पदचिन्हे असतील. त्या पदचिन्हांवर प्रत्येकाला डोके ठेवुन, हात ठेवुन नमस्कार करता येईल. ही पदचिन्हे direct पालखीतुन तुमच्या प्रत्येकाकडे पोचतील. फक्त तिथे (पदचिन्हांवर) फळ, फुल, पान, दगड, चिखल असलं काहीही वाहायला परवानगी नाही. वाहायचेच असेल तर फक्त तुमचे प्रेम वाहा वाटल्यास तुमचे पाप सुद्धा वाहा. मनापासुन तुम्ही तुमचे पाप इथे वाहिले ना, तर आपोआप माझे काम कमी होईल. ह्या पदचिन्हांवर डोक ठेवायची, नमस्कार करण्याची कोणालाही अजिबात जबरदस्ती नाही. आधी प्रत्येकाला हात लावुन, डोक ठेवुन नमस्कार करता यायचा पण आता वाढत्या गर्दीमुळे फक्त दुरुनच नमस्कार करायला मिळतो. पण आता ह्यापुढे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पदचिन्हाद्वारे direct नमस्कार करण्याचा आनंद प्रत्येक भक्ताला प्राप्त होणार आहे. ह्या पदचिन्हांशेजारीच श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे पाद्यपुजन करतानाचे जल म्हणजेच अभिषेक जलाचा गडू ठेवण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेला सकाळी आल्यावर प्रथम मी (प.पू.बापू), नंदाई, व सुचितदादा श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे गुरुगीतेची CD चालु असताना पुजन करु. ह्या पुजनाच्या वेळचे तीर्थ पदचिन्हांशेजारी असेल. कसा वाटतो हा ठराव? मंजुर आहे ना सगळ्यांना? (सगळे हो म्हणतात) मग कायद्यात रुपांतर केले तर चालेल ना? नक्की. ओके. तर आता आपल्याला पुढची बाधा बघायची आहे. कितवी बाधा? १० वी. ती म्हणजे वमन बाधा. वमन म्हणजे उलटी, vomiting. मग उलट्या होणे म्हणजे बाधा म्हणायची का? नाही. तर वमन बाधा ही एकंदर ६ प्रकारची आहे. आपण म्हणतो ना ह्याला ओकल्याशिवाय बरं वाटत नाही. त्याने गरळ ओकून मनातले विष बाहेर टाकले. ह्याचा अर्थ काय तर जे उलटी होण्याजोगे असे शरीरात किंवा मनात दाह निर्माण करणारे बाहेर टाकले जाते. अशी वमन बाधा म्हणजे जिथे राग, द्वेष, संताप व्यक्त व्हायला पाहिजे तिथे होत नाही व हा राग अयोग्य ठिकाणी अयोग्य मात्रेत बाहेर टाकला जातो. ह्यालाच १ ला प्रकार म्हणतात - क्रोध वमन बाधा. उलटी करताना जर मनुष्य शुद्धीवर नसेल तर अश्यावेळी अन्ननलिकेतुन बाहेर टाकायची गोष्ट श्वास नलिकेतुन आत जाण्याची शक्यता असते म्हणजेच Aspiration pneumonia होऊ शकतो. म्हणुन स्वत:च्या शरीराला त्रासदायक गोष्ट योग्य प्रकारे बाहेर टाकणे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा अपचनाचा त्रास होतो तेव्हा घशात बोटे घालुन पोटातील घाण उलटी करुन बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करतो. जोपर्यंत अशी त्रासदायक घाण बाहेर टाकली जात नाही तोपर्यंत पोटाला शांतता मिळणार नाही. ही घाण बाहेर न पडणे म्हणजे वमन बाधा. म्हणजे मनुष्याचे चांगले गुण express न होणे म्हणजे वमन बाधा. आपण इथे कपटी माणसांचा नाही तर सर्व सामान्य चांगल्या माणसांचा विचार करतो आहोत. उलटी मध्ये काय होते तर जठर आकुंचन पावते व त्यामुळे नको ते अन्न वरच्या दिशेने ढकलले जाऊन अन्न नलिकेतुन बाहेर टाकले जाते. परंतु ही गोष्ट फक्त स्थानिक (local) भागापुरता मर्यादित नाही तर आपल्या मेंदुशी देखील संबंधीत आहे. आपल्या मेंदुत एक vomiting center असते. तुम्ही बघितले असेल मांजरी किंवा कुत्री पोट बिघडले असेल तर एक विशिष्ट गवत खातात त्यामुळे ताबडतोब उलटी होते व पोट साफ होते. प्राण्यांकडे वासाचे केंद्र strong असते. त्यामुळे ते गवत वासावरुन ओळखु शकतात. पण माणसाचे तसे नसते. मनुष्याकडे काय आहे तर एक वमन केंद्राप्रमाणे एक खोकल्याचेही केंद्र मेंदुत आहे. आपल्या मेंदुतुन १२ nerves निघत असतात त्यांना cranial nerves म्हणतात. त्यापैकी १० वी nerve ही सगळ्यात मोठी व लांब असते तिला vagus nerve म्हणतात. ही नस हृदयापर्यंत तसेच ह्रदय व पोट ह्यांना seperate करणारा पडदा पार करत पुढे पोटापर्यंत जाते. ही नस अशी आहे कि ज्यात ज्ञान केंद्रे पण असतात. अतिशय विलक्षण अशी ही नस पोटाच्या वरती शमन करण्याचे काम करते तर पोटाच्या पडद्याच्या खाली दमन करण्याचे acidity secretion आम्ल वाढवण्याचे काम करते. आपल्या शरीरातील हे vagaus center शरीरातील सर्व प्रमुख क्रिया म्हणजेच खोकला, उलटी, ह्रदयाचे ठोके, आम्ल वृद्धी अश्या सर्व क्रिया manage करते. हे केंद्र उलटीच्या केंद्राशी सर्वांत जास्तपणे जोडलेले असते. आपल्या शरीरात दोन संस्था असतात त्या म्हणजे central nervous syatem आणि autonomic nervous system. ह्यात autonomic nervous system चे दोन subdivison आहेत ते म्हणजे Sympathetic nervous system व Parasympathetic nervous system. Vagus nerve (नस) ही parasympathetic nervous system मधली main nerve आहे. ही नस माणसाच्या मेंदुमधल्या निरनिराळ्या भावनांच्या केंद्राशी जोडलेली असते. सगळयात जास्त क्रोधाच्या केंद्राशी हीचा अतिशय जवळचा संबंध असतो. ह्यांचा संबंध २ way असतो म्हणजे Vagus nerve चे कार्य वाढले की क्रोध वाढतो व क्रोध वाढला की Vagus nerve चे कार्य वाढते. वमन होण्यासाठी ह्या Vagus nerve व cough centre चे एकत्रित कार्य होणे आवश्यक असते. ह्या वमनामध्ये पोटासोबत मनातील नको असलेल्या गोष्टींच्या वमनाचाही समावेश आहे. मनामध्ये जर सगळे साठवुन ठेवले आणि जर व्यक्त नाही केले तर मग सतत चिडचिड करत ते रागाच्या रुपाने बाहेर पडत असते. जेव्हा मनात राग आहे, निचरा झाला आहे पण बाहेर टाकता येत नाही तेव्हा समजायचे की आपल्याला वमन बाधा झाली आहे . ग्रंथराज मध्ये आपण पहिले की आपल्या शरीरामध्ये ३ नाड्या आहेत ईडा, पिंगला व सुषुम्ना. ह्यामधली सुषुम्ना नाडी ही गुप्त असते. सुषुम्ना नाडीचा सगळ्यात जवळचा संबंध हा कुंडलिनीशी असतो. कुंडलिनी माता म्हणजेच अंजना माता व तिचा पुत्र म्हणजे हनुमंत म्हणजेच स्वधेचा पुत्र हा खेळत असतो तो सुषुम्ना नाडी मध्येच. ह्या सुषुम्ना नाडीचा संबंध vagus nerve सोबत असतो. ह्याचा अर्थ आपल्या प्रत्येकाच्या शरीरातील वमन केंद्र हे अंजना मातेच्या व महाप्राणाच्या हातामध्ये असते. आपण गंगा, यमुना व सरस्वती हा त्रिवेणी संगम बघतो. ह्यातली सरस्वती ही लुप्त असते. का? तर सरस्वती म्हणजेच सुषुम्ना नाडी. सुषुम्ना नाडी ही लुप्त असते. आपल्या शरीरातील vagus nerve व हनुमंताचा, महाप्राणाचा संबंध तुटणे म्हणजेच सरस्वती लुप्त होणे. म्हणुन हे हनुमंताशी तुटलेले connection जोडायला हवे. "दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे ते ते..." जेवढा महाप्राणाशी सबंध जास्त तेवढा क्रोध कमी तर जेवढी वमन बाधा जास्त तेवढा मनुष्य तापट बनत जातो . मनुष्याने किती चिडावे ह्याचे प्रमाण याज्ञवल्क ह्यांनी अतिशय सुंदरपणे मांडले आहे. कात्यायनी व मैथीली ह्या याज्ञवल्कच्या दोन पत्नी. याज्ञवल्कचे प्रमाण बघण्याआधी त्यामागची छोटीशी गोष्ट समजुन घ्यायला हवी. याज्ञवल्कने जेव्हा हे प्रमाण सिद्ध केले तेव्हा ते त्याच्या गुरुला पटले नाही. तेव्हा गुरुने त्यास माझी सर्व विद्या परत कर असे सांगितले. विद्या कशी परत करणार असा प्रश्न याज्ञवल्कला पडला तेव्हा तिथे सुर्य नारायण प्रगटले व त्यांनी त्यास वमन करण्यास सांगितले. त्या वमनामधुन याज्ञवल्कने गुरुंची सर्व विद्या परत केली. आता याज्ञवल्कची पुर्ण विद्या गेल्यामुळे तो अज्ञानी झाला तेव्हा सुर्यनारायणाने त्यास सोबत येण्यास सांगुन त्यास ब्रम्हज्ञानाची प्राप्ती करुन दिली. याज्ञवल्कने वमनातुन ज्ञान टाकले हे जाणुन त्याची पत्नी कात्यायनीने प्रश्न केला की, मानवाने किती वेळा वमन करावे? ह्यावर याज्ञवल्कने अतिशय सुंदर उत्तर दिले की, " परमेश्वराने ह्या जगात पाठवताना तुमचा श्वास व तुमचा क्रोध ह्याचे समीकरण करुन पाठविलेले असते. हे कसे? तर व्यस्त प्रमाणात म्हणजेच जर क्रोध जास्त तर श्वास संख्या कमी व जर श्वास संख्या जास्त तर क्रोध कमी. म्हणून लक्षात ठेव की क्रोध हा माणसाला उंदराप्रमाणे कुरतडत असतो, म्हणून मी जितक्या वेळा इतरांवर चिडेन त्याच्या दुप्पट वेळा मला स्वत:वर चिडता आले पाहिजे. " जेव्हा मी असे करेन तेव्हाच माझे vagus nerve व सुषुम्ना नाडीचे connection कायम राहिल. म्हणजे जर तुम्ही दुसर्यावर ३ वेळा चिडलात तर स्वत:वर ६ वेळा चिडायला हवे. पण असे होते का? नाही. म्हणुनच connection तुटते. नेहमी दुसर्याकडॆ बोट दाखवताना लक्षात ठेवा स्वत:कडॆ 3 बोटे असतात. आपण स्वत:वर चिडण्याचे प्रसंग अनेक असतात पण आपण स्वत:वर चिडत नाही, आणि राग दुसर्यावर काढत राहतो. जेव्हा तुम्ही स्वत:च्या चुका सुधारण्यासाठी स्वत:वर चिडता तेव्हा तुम्ही एवढे समर्थ होता की, आपोआप तुमच्या रागाला तुम्ही control करु शकता. मग ह्यासाठी मापदंड काय? तर सोपे आहे दुसर्यावर जेवढ्या वेळा चिडणार त्याच्या डबल स्वत:वर चिडले पाहिजे. आपण कोणावर चिडालो की लगेच स्वत:वर चिडायचे, ह्यामुळे स्वत:ची improvement करण्याची ताकत, स्वत:चा aura एवढा वाढतो की समोरची व्यक्ती काही करु शकत नाही. असे जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपोआप महाप्राणाशी तुटलेले contact जुळते. महाप्राणाचे कार्य काय तर अभ्युदय घडवुन आणणे आणि हे तुटलेले contact जुळण्यासाठी मापदंड कुठला तर दुसर्यावर एकदा चिडलो तर स्वत:वर डबल चिडणे. ह्याचा अर्थ स्वत:ला मारत बसायचे असे नाही, असला वेडेपणा करायचा नाही. स्वत:वर चिडणे म्हणजे अंर्तमुख होणे. माझे काय चुकले? माझ्या लोभामुळे माझ्याकडुन चुक झाली का? ह्याचा अभ्यास करणे. स्वत:ची चुक कबुल करायला शिकले पाहीजे, चुक घडल्यावर जागच्या जागी देवाची क्षमा मागायला शिका. दुसर्यावर रागवल्यावर देवा मला मार्ग दाखव असे सांगा. आपण इथे दर गुरुवारी सुखसावर्णि करतो किती जण बसले आहेत इथे सुखसावर्णिला? हात वर करा. बापरे ६०% लोकांना सुखसावर्णि माहित नाही. भयानक गोष्ट आहे. मी मागे प्रवचनात सांगितले होते प्रत्येकाच्या सद्गुरुंचे प्रतिक म्हणजे त्रिविक्रम. सुखसावर्णि मध्ये आपण काय प्रार्थना करतो तर " त्रिविक्रम दयां कुरु, कृपां कुरु, क्षमां कुरु, मार्गं दर्शय... " म्हणजे त्रिविक्रमासमोर बसुन काय करायचे तर दया कर, क्षमा कर सांगायचे. इथे माफी मागायची, मन्नत मागायची की अमुक गोष्ट झाली तर अमुक अमुक देईन व हा नवस नंतर गुरुक्षेत्रम किंवा जुईनगरला जाऊन फेडायचा. मागे कुणी तरी जुईनगरच्या होमाविषयी अफवा पसरवली होती की, तिथे आधी चिठ्ठी लागते तर असे काहीही नाही. तिथे कुणीही बुकिंग करुन होम करु शकतो. तिथे कोणाच्याही चिठ्ठीची आवश्यकता नाही. सुखसावर्णि म्हणजे काय तर confession box. आपला कबुलीजवाब देण्याची जागा. ह्याच्या समोर आपल्या चुकांची कबुली द्यायची. म्हणुन आपण इथे प्रार्थना करतो मार्ग दाखव. आमचं मागणं आणि कबुलीजवाब देण्याचे हक्काचे स्थान म्हणजे सुखसावर्णि. आमच्या आयुष्यातील सर्व बाधांचे क्षमन करण्याची ताकत ह्या गुरुक्षेत्रम मंत्रामध्ये आहे. आणि त्रिविक्रम आहे कुठे? तर गुरुक्षेत्रम् मध्येच. त्याच्यासमोर बसुन चुकांचा कबुली जवाब देण्याची, क्षमा मागण्याची प्रार्थना म्हणजेच सुखसावर्णि. तुम्ही जेव्हा मनापासुन पापांची क्षमा मागता तेव्हा तो क्षमा करतो, पण सतत आपल्या चुका उगाळत बसुन स्वत:ला दोष देऊ नका ते त्याला आवडत नाही. सुखसावर्णिद्वारे त्या त्रिविक्रमाकडे मागणं मागणे म्हणजे आपला संबंध त्या त्रिविक्रमाशी जोडणे. मग मनुष्याच्या मनाचा संबंध हनुमंताशी, महाप्राणाशी जोडण्य़ाचे काम हा त्रिविक्रम करतो. गुरुक्षेत्रम् मंत्रामध्ये हनुमंताचे नाव दोन वेळा येते. हनुमंत हा रामाचा प्राण असल्याने तो त्रिविक्रम रामच मनुष्याच्या मनाचे connection हनुमंताशी जोडुन देऊ शकतो. आज आपण वमन बाधा बघितली. ह्यापुढे आपण एकच चुक परत परत करतो म्हणजे काय? ही कुठली बाधा आहे, तिचे नाव आपण पुढच्या गुरुवारी बघणार आहोत. आज पहिल्या वमन बाधेचा उपाय बघितला. इथे एक रहस्य सांगतो जो उपाय पहिल्या वमन बाधेचा आहे तोच इतर सर्व बाधांचाही आहे. सगळ्याचा उपाय एकच तो म्हणजे कुंडलिनीचे, महाप्राणाचे आपल्याशी connection जोडुन ठेवणे. हे कसे होते तर जेव्हा सद्गुरुंवर नितांत श्रद्धा असते तेव्हाच. "एक विश्वास असावा पुरता , कर्ता हर्ता गुरु ऎसा.." एक मनापासुन सांगतो राजांनो, तुम्ही जरी कुर्हाड घेऊन हे connection जोर लावून तॊडण्याचा प्रयत्न केलात ना तरी तुम्ही एकदा जरी कळवळीने, मनापासुन तुमच्या सद्गुरुंवर प्रेम केले असेल, त्यांना नमस्कार केला असेल तरी तो मग तुमच्या मागुन तुमच्याही नकळत हे तुटलेले connection जोडुन देतो व तुमच्या हातातील कुर्हाडीचे कमळ करतो. ही ताकद फक्त सद्गुरु तत्वामध्येच असते. हे मी (प.पू.बापू) माझ्या सद्गुरुंच्या अनुभवावरुन सांगतो. ज्यावेळी हे connection जोडले जाते तेव्हा आपोआप कुर्हाडीचे कमळ झालेच म्हणून समजा. वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा ह्या महिन्यात हनुमान चलिसा maximum म्हणा. कारण "श्रीगुरु चरनरज सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारी .." मुकुरू म्हणजे आरसा ह्याचा अर्थ तुलसीदास सांगतात की, सद्गुरुचरणांच्या धुळीने माझ्या मनरुपी आरश्याला मी स्वच्छ करतो. जेव्हा ह्र्दयात सद्गुरुंचे चरण असतील तर मनाचा आरसा कितीही मलीन असला तरी तो स्वच्छ होतोच. अशी ही हनुमान चलिसा ह्या महिन्यात एकदा तरी १०८ वेळा म्हणा. ५ तास लागतात. समजा १०८ च्या ऎवजी ६१ वेळाच झाले तरी त्याचा कमी फायदा आहे का? ह्या महिन्यात जप करण्यासाठी counting करुच नका. जे काही म्हणता येईल ते म्हणा. ॐ कृपासिंधु म्हणा, ॐ मनसामर्थ्यदाता.. म्हणा जे काहीही तुम्हाला आवडेल तो जप म्हणा पण म्हणा. खुप सुंदर हा महिना आहे. अर्धा जेष्ठ आणि अर्धा आषाढ असा हा महिना आहे. ह्याला काय नाव देता येईल आपल्याला. आज ह्या महिन्याला नाव ठेवुया. काय नाव ठेवता येईल? नाही सुचत? आत्ताच सांगितले ना मी.. "श्रीगुरु चरनरज सरोज रज..." तर हा महिना म्हणजे गुरुचरण महिना. ह्या महिन्यात अतिशय प्रेमाने हनुमंताचे नाव घ्यायचे का? तर श्री गुरुंचे चरण प्राप्त व्हावेत म्हणून, ..हनुमंताशी तुट्लेले connection जोडले जावे म्हणुन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो त्याच्या सगळ्या लेकरांवर अतीव प्रेम करतो म्हणुन. तुमच्यावर जे कोणी प्रेम करतात त्याला १ लाख कोटीने गुणले ना तरी होणार नाही एवढे प्रेम सद्गुरुंनी तुमच्यावर एका मिनिटाला केलेले असते जे सगळ्यांपेक्षा भारी असते. म्हणून सांगतो तुम्ही कुणालाही सद्गुरु माना पण माना कारण त्याशिवाय पर्याय नाही. फक्त दाढीवाल्या बुवांच्या मागे लागु नका. डोक शाबुत ठेऊन भक्ती करा. हा गुरुचरण महिना कसा आहे तर हनुमंताशी connection जोडणारा. एक लक्षात ठेवा, राम हनुमंताकडे गेला की हनुमंत रामाकडे? राम हनुमंताकडे गेला, रामाचे हनुमंतावर नितांत प्रेम होते. तुलसीदासासारखा श्रेष्ठ भक्त प्रथम काय लिहितो तर "बुद्धीहीन तनु जानिके सुमिरॊ पवन कुमार.." मनुष्य बुद्धीहीन आहे, म्हणुन योग्य मार्गाने प्रवास घडण्यासाठी हनुमान चलिसा म्हणा. आज जे काही आपण त्रिविक्रमाचे knowledge घेतले ते लक्षात ठेवुन त्या त्रिविक्रमाकडे " दया कर, कृपा कर, क्षमा कर" हे मागणं मागितलंत तर तो त्रिविक्रम त्याची तीन पावले तुमच्या दिशेने नक्कीच चालेल , ह्याची अनंत पटीने मी तुम्हांला guarantee देतो. हरी ॐ |
AADM
Aniruddha’s Academy of Disaster Management (AADM) a premier non-government organization would be holding 7 days certificate course in Disaster Management at its Central Office on monthly basis from now on.
The course would cover basic disaster management topics from academic and practical perspective viz., First-Aid, Fire Fighting, Bandages, Casualty Lifting Methods, CPCR (Cardio-Pulmonary; Cerebral Resuscitation).
*For more details plz visit: www.aniruddhasadm.com
*AADM Central Office :
Contact No :(022)2430 1010 ,or (022)-2430 2424.
*Address :
3, Krushna Niwas, Sakharam Keer Road, Near Shiv Sena Bhavan,Mahim, Mumbai - 400 016. India
The course would cover basic disaster management topics from academic and practical perspective viz., First-Aid, Fire Fighting, Bandages, Casualty Lifting Methods, CPCR (Cardio-Pulmonary; Cerebral Resuscitation).
*For more details plz visit: www.aniruddhasadm.com
*AADM Central Office :
Contact No :(022)2430 1010 ,or (022)-2430 2424.
*Address :
3, Krushna Niwas, Sakharam Keer Road, Near Shiv Sena Bhavan,Mahim, Mumbai - 400 016. India
Followers
Blog Archive
-
►
2016
(7)
- December 2016 (1)
- November 2016 (1)
- October 2016 (1)
- May 2016 (3)
- January 2016 (1)
-
►
2015
(17)
- December 2015 (2)
- September 2015 (1)
- August 2015 (6)
- July 2015 (1)
- April 2015 (2)
- March 2015 (2)
- February 2015 (2)
- January 2015 (1)
-
►
2014
(11)
- December 2014 (2)
- November 2014 (1)
- October 2014 (1)
- September 2014 (1)
- August 2014 (1)
- May 2014 (1)
- April 2014 (1)
- March 2014 (1)
- February 2014 (2)
-
►
2013
(24)
- November 2013 (1)
- September 2013 (4)
- August 2013 (6)
- July 2013 (3)
- May 2013 (2)
- April 2013 (6)
- March 2013 (2)
-
►
2012
(24)
- December 2012 (2)
- November 2012 (1)
- October 2012 (3)
- September 2012 (2)
- August 2012 (1)
- July 2012 (3)
- June 2012 (4)
- April 2012 (4)
- March 2012 (1)
- February 2012 (3)
-
▼
2011
(98)
- December 2011 (5)
- November 2011 (4)
- October 2011 (5)
- September 2011 (9)
- August 2011 (11)
- July 2011 (9)
- June 2011 (4)
- May 2011 (5)
- April 2011 (11)
- March 2011 (19)
- February 2011 (13)
- January 2011 (3)
-
►
2010
(83)
- December 2010 (8)
- November 2010 (7)
- October 2010 (9)
- September 2010 (2)
- August 2010 (9)
- July 2010 (9)
- June 2010 (6)
- May 2010 (11)
- April 2010 (7)
- March 2010 (4)
- February 2010 (8)
- January 2010 (3)
-
►
2009
(28)
- December 2009 (9)
- November 2009 (11)
- October 2009 (8)
Important Stotra
Excerpts from Thursday Discourse dated 16 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
Trivikram
Featured Post
लोटांगण म्हणजे काय ?
Lotaangan
Popular Posts
-
Sai Niwas The ancestral home of the Dabholkars, in Bandra . As you enter Bandra’s St Martin Road an ancient hallowed bungal...
-
. Aniruddha's Academy of Disaster Management (AADM) is a charitable organization with the prime objective as "Disaster Manageme...
-
निर्धार १ - राम माझा राजा आहे व मी राजरामाचा सैनिक आहे. माझ्या ह्या राजाचा व त्याच्या अधिराजाचा ( किंगमेकर) - दत्तगुरुंचा स्वभा...
-
"Shree Aniruddha Gurukshetram" as the name implies, is the Abode (Nivaas sthaan) of the Five Guru's of Sadguru Shree A...
-
श्री वर्धमान व्रताधिराज म्हणजे मानवाच्या जन्मास येउन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाही.. "श्री वर्धमान व्रताधिरा...
-
हम शिवगंगा गौरी का 'गदा स्तोत्र' देखने वाले है। वो दिखने में शांत है! पर उस...
-
भगवान किरातरुद्र प्रत्येक विश्वघटकाची निर्मिती चण्डिकाकुलातूनच होते, लयही चण्डिकाकुलातच होतो आणि निर्मिती व लय ह्यांमधील स्थिति व ...
No comments:
Post a Comment