Latest News

श्री साई प्रदत्त अभूदय पर्व

                   श्री साई प्रदत्त अभ्युदय पर्व म्हणजे श्रद्धावानांसाठी प्रकटलेली साक्षात गंगा आहे. या गंगेत मी मारलेली डुबकी माझ्या भक्तीचा खजिना समृद्ध करते व माझ्या पापांचा नाशही करते. येणाऱ्या तिसऱ्या महायुद्धासारख्या भीषण काळामध्ये ही गंगा माझ्यासाठी आई बनून रक्षण करणारच. कारण या गंगेचे उगम आणि मुखही श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम आहे,तर आदिमाता अनसूया गंगोत्री आहे.

                   सदगुरू श्री अनिरुद्धांनी माझा प्रपंच व परमार्थ साधून देण्यासाठी मला बहाल केलेली ही सुवर्णसंधी आहे. १०० वर्षापूर्वी म्हणजे १९०८ च्या पौष पौर्णिमेस म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेस ह्या पर्वाची सुरुवात झाली, व १९१० च्या विजया दशमीस ह्या पर्वाची सांगता झाली होती. सदगुरू श्री अनिरुद्धांच्या कृपाशिर्वादामुळे त्यांनी आजही माझ्या अभ्युदयासाठी हा सुवर्णकाळ पुन्हा माझ्या जीवनात आणला आहे. ह्या श्री साई प्रदत्त अभ्युदय पर्वाची सांगता अनिरुद्ध पौर्णिमा २०१० रोजी म्हणजेच २१ नोव्हेंबर २०१० रोजी होणार आहे.

सदगुरू श्री अनिरुद्धांनी आपला अक्षय पारमार्थिक खजिना श्रद्धावानांसाठी सताड उघडा टाकला आहे व तो लुटून नेण्याची विशेष संधी ह्या पर्व काळात त्यांनी श्रद्धावानांना दिली आहे.

ह्या खजिन्याची प्राप्ती व्हावी म्हणून मला ह्या पर्व काळात तीन प्रमुख गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे --

१) सदगुरू दत्तात्रेयांचे स्मरण व खालील श्लोकाचे पठण -

" अनसूयोत्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबर:

स्मर्तुगामी स्वभक्तानाम उद्धार्ता भवसंकटात "

भावार्थ : अनसूया (असूयाविरहित) ,अत्रिंपासून संभवलेला, दिशा हेच वस्त्र असणारा ,स्मरणासवेच प्रकट होणारा ,भवसंकटातून आपल्या भक्तांचा उद्धार करणारा असा हा दत्तात्रेय आहे.

२) सदगुरू श्री अनिरुद्धांचे स्मरण व श्री अनिरुद्ध गायत्री मंत्राचे पठण -

" ॐ मन: प्राण: प्रज्ञा, ॐ ततगुरु दत्तस्य ,

उष्णं स्निग्धम गुरो: तेजो धीमही रामे चित्तलया ओजः

अनिरुद्ध राम: प्रचोदयात "

भावार्थ : मन प्राण प्रज्ञा ह्या तीन व्याहृति आहेत.त्या गुरूदत्तांच्या उष्ण , स्निग्ध, व गुरुतेजाचे आम्ही ध्यान करतो. आमच्या चित्ताचा लय श्रीराम चरणी होवो, त्यासाठी श्री अनिरुद्धराम आमच्या ओजाला
प्रबळ प्रेरणा देवो.

३) सदगुरू श्री अनिरुद्धांच्या पणजी द्वारकामाई पाध्ये यांनी विरचित केलेले आद्यकाव्य म्हणजेच खालील अभंग व त्याचे पठण -


अनिरुद्ध त्रिपुरारी त्रिविक्रम बनून कश्यासाठी आला आहे त्याचे मर्म हा अभंग समजावून सांगतो. म्हणूनच हा अभंग आमचे जीवन 'अभंग' बनविणारा आहे.

(श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे दिलेली माहिती).

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.