Latest News

"न्हाऊ तुझिया प्रेमे" ..एक अलौकिक प्रेमरसयात्रा

  
अनिरुद्ध प्रेम वर्षावात न्हाऊन निघण्यासाठी अजुन फक्त ७ दिवस बाकी आहेत . गेल्या महिन्यात जेव्हा प्रथम "न्हाऊ तुझिया प्रेमे" ह्या महासत्संगाविषयी ऎकले तेव्हापासुन ह्या कार्यक्रमाविषयी उत्सुकता आणि ओढ मनाला लागुन आहे.

नुकतेच गुरुवारी पुज्य समीरदादांनी ह्या  कार्यक्रमासंबंधी श्री हरीगुरुग्राम येथे सर्व श्रद्धावानांना सविस्तर मार्गदर्शनही केले. त्यावरुन आपल्याला ह्या कार्यक्रमाची भव्यता व दिव्यता लक्षात येते.

**Instructions about 'Nahu Tujhiya Preme' satsang given Poojya Samirdada

https://www.youtube.com/watch?v=jg32-fKWpTc

खरोखरच एक अतिशय अवर्णनीय व अलौकिक असा हा कार्यक्रम आहे . श्री अनिरुद्धांवरील श्रद्धावानांच्या शुद्ध प्रेमातुन अनेक सुंदर भक्तीरचनांचा उदय झाला. ह्या भक्तीरचना काळाच्या ओघात डळमळीत झालेला आमचा भक्तीचा खुंटा पुन्हा घट्ट करण्यास साहाय्य करतात.

अश्या सर्वश्रेष्ठ भक्तीरचनांमध्ये परमात्मत्रयी समक्ष त्यांच्या प्रेमात न्हाऊन निघण्याची सुवर्णसंधी "न्हाऊ तुझिया प्रेमे" ह्या महासत्संगाद्वारे सर्व श्रद्धावानांना उपलब्ध झाली आहे.

ह्या महासत्संगाच्या दिवशीच आतापर्यंत झालेल्या सर्व रसयात्रा , भावयात्रा व उत्सव ह्यांच्या व्हीडीओज द्वारे त्यावेळचा आनंद अनुभवण्यासही मिळणार आहे.

असा हा आनंदाची व प्रेमाची लयलुट करणारा अलभ्य,अलौकिक महासत्संगाचा सोहळा पुढील रविवारी म्हणजेच दिनांक २६मे २०१३ रोजी पद्मश्री डॉ .डी.वाय.पाटील ,स्टेडियम नेरुळ, नवीमुंबई येथे संध्याकाळी ठीक ४ वाजता सद्गुरु श्री अनिरुद्ध ,प.पू.नंदाई, प.पू.सुचितदादा ह्यांच्या आगमनाने सुरु होईल.

ह्या कार्यक्रमाच्या प्रवेश पत्रिका श्री हरीगुरुग्राम येथे मिळण्याची अंतिम तारिख २३ मे २०१३ ही असून त्यानंतर ह्या कार्यक्रमाच्या प्रवेश पत्रिका अन्य कुठेही उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे अजुनही ज्यांनी प्रवेशपत्रिका घेतल्या नसतील त्यांना ह्या सोहळ्यात सामील होण्याची संधी आहे.

मित्रांनो आजपासुन पुढचे सात दिवस फक्त  त्या अलौकिक क्षणाची चातकासारखी आतुरतेने वाट पाहुया .
ह्या भक्तवत्सल अनिरुद्धाच्या प्रेमसागरात आकंठ डुंबुन जाण्यासाठी ..
ह्याच्या भक्ती कवचामध्ये कायमचे अडकण्यासाठी...

" अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा ,
कोणा नाही इतुके कॊतुक धर्म ह्याचा आगळा."

अम्बज्ञ






No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.