Latest News

प्रथम अनिरुद्धधामाच्या निर्माणकार्याची सुरुवात..


 
प्रथम अनिरुद्धधाम मंगळवार दि. ०७-०५-२०१३ रोजी, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथिच्या पवित्र दिनी, प्रथम अनिरुद्धधामाच्या निर्माणकार्याची सुरुवात डुडूळ गाव, देहू- आळंदी रोड (तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथे झाली. 
 
परमपूज्य बापूंच्या निर्देशानुसार महाधर्मवर्मन्‌ डॉ. योगीन्द्रसिंह जोशी व डॉ. सौ. विशाखावीरा जोशी यांनी काही मोजक्या श्रद्धावानांसह निर्माणकार्य सुरू होण्याआधी करावयाची उपासना केली. 
 
यामध्ये श्री गुरुक्षेत्रम् मन्त्र, ’ॐ गं गणपतये नम:’ जप, श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्, श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्, श्रीरामरक्षास्तोत्र, श्रीहनुमानचलिसा व घोरकष्टोद्धरण स्तोत्र यांचा समावेश होता. उपासनेसाठी श्री आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिका, श्रीगुरु दत्तात्रेय, सद्‌गुरु श्री अनिरुद्ध, नन्दाई व सुचितदादा यांच्या तसबिरी ठेवण्यात आल्या होत्या. एका बाजूला संस्थेचा ध्वज आणि दुस-या बाजूला स्कंदध्वज लावण्यात आला होता. 
 
मग सर्व श्रद्धावानांनी अत्यंत प्रेमाने आपल्या लाडक्या सद्‌गुरुंची उपासना या कार्यक्षेत्री केली. वरील उपासना पूर्ण झाल्यावर महाधर्मवर्मन्‌ डॉ. योगीन्द्रसिंह आणि डॉ. सौ. विशाखावीरा यांनी श्रीफळ फोडले. या कार्यारंभ उपासनेचा एक अविभाज्य भाग म्हणून श्रीगुरुक्षेत्रम् येथील उदी सर्व क्षेत्रभर थोडी थोडी पसरविण्यात आली आणि अशा प्रकारे प्रथम अनिरुद्धधामाच्या निर्माणकार्याचा आज प्रारंभ झाला, एका नव्या युगाचा आरंभ झाला.

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.