दोन स्पिंडलचा चरखा |
सहा स्पिंडलचा चरखा |
आपण लड्या काढण्यासाठी दोन स्पिंडलच्या चरख्याचा उपयोग करतो.सहा किंवा आठ स्पिंडलचाही चरखा आपल्या संस्थेत उपलब्ध आहे. दोन बाँबिन पूर्ण भरण्यासाठी साधारणतः एक ते सव्वा तास लागतो. या दोन बाँबिन मधुन एक लडी आरामात निघते. या सगळ्या लड्या श्री हरिगुरुग्राम किंवा उपासना केंद्रात जमा केल्या जातात. लड्यातून बनणार्या कापडापासून युनिफाँर्म शिवले जातात व त्याचे वाटप कोल्हापूर मेडिकल कँप येथे होते.
श्री हरिगुरुग्राम मध्ये ह्या लड्या एकत्र करून त्यांचा किलोप्रमाणे गठ्ठा बनवला जातो. साधारणतः एक किलोत चाळीस लड्या येतात. या एक किलो लड्यांमधुन शर्टसाठी अंदाजे सहा मीटर किंवा पँटसाठी अंदाजे साडे पाच मीटर कापड निघते. यात पॅटसाठी दोन सुती कापड आणि शर्टसाठी दीड सुती कापड असे दोन प्रकार येतात.
विणलेले कापड डोंबिवली येथे डाईंग व ब्लिचिंगसाठी पाठवले जाते. आपण ज्या ज्या शाळेत युनिफाँर्म वाटप करणार आहोत त्या शाळेच्या कलर कोड प्रमाणे कापड रंगद्रव्यात ’डाय’ केले जाते.आपण शाळेत खाली दिलेल्या रंगाचे युनिफाँर्म वाटतो.
1) White Shirt and Khaki Pants - For Boys
White Shirt and Blue Pinaco - For Girls
2) Sky blue Shirts and Dark Blue Pants - For Boys
Sky blue Shirts and Dark Blue Pinaco - For Girls
3) Pink Shirts and Maroon Pants - For Boys
Pink Shirts and Maroon Pinaco - For Girls
नंतर हे प्रोसेस झालेले कापड परेल येथील गारमेंट्स फँक्टरी मध्ये योग्य त्या मापात कापून शिवण्यासाठी पाठवले जाते.
युनिफाँर्म शिवल्यानंतर ते मरोल/जोगेश्वरी येथे स्थानीक भक्तांकडे एक्स्ट्रा थ्रेड कटिंग आणि पाँलीथीन बँग मध्ये पँकिंगसाठी पाठवले जाते. युनिफाँर्म बाँक्समध्ये पँक केल्यानंतर त्या बाँक्सवर त्या शाळेचे नाव असलेले लेबल
आणि बाँक्समधील इयत्तेप्रमाणे युनिफाँर्मच्या संख्येचे लेबल चिकटवले जाते.
यंदाच्या कोल्हापूर कँप मध्ये आपण अंदाजे ८८०० विद्यार्थ्यांना युनिफाँर्म वाटप केले गेले.हे युनिफाँर्म शिवण्यासाठी अंदाजे ४०,००० मीटर कापड वापरले गेले.
कोल्हापुर मेडिकल कँप साठी प्रत्येक शाळेतून इयत्तेप्रमाणे विद्याथ्यांची लिस्ट येते. ही लिस्ट आल्यानंतर युनिफाँर्म शाळेप्रमाणे बाँक्समध्ये पँक केले जातात.
आपण कोल्हापुर मेडिकल कँप मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दोन युनिफाँर्मचा एक सेट देतो. या दोन युनिफाँर्म साठी लड्या संस्थेकडे जमा केल्यापासून युनिफाँर्म शिवून त्याचे पँकिंग होईपर्यत संस्थेला अंदाजे ३३८ रुपये खर्च येतो.
आपण सूत काढताना जर चरखा चालवण्याचा speed कमी जास्त झाला तर त्याचा परिणाम हा सूताच्या quality वर होतो. जर speed कमी जास्त झाल्यामूळे कच्चे सूत आले तर ते फूकट जाते, कारण कापड विणतेवेळी हे कच्चे सूत तुटते. ह्या साठीच चरखा कसा चालवावा, चरख्यात कुठले पार्टस् वापरले जातात, चरख्याची दुरूस्ती कशी करावी यासाठी चरखा माहिती पुस्तीका आपल्या संस्थेने काढली आहे. प्रत्येक श्रद्धावानाने ती जरूर वाचावी.जेणेकरून आपण व्यवस्थीत प्रकारे चरखा चालवू शकू व तो चांगल्या प्रकारे maintain ठेवू शकू.
No comments:
Post a Comment