अनिरुद्ध बापूंनी जागविला आत्मविश्वास.. |
रविवारी सायंकाळी एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित प्रवचन सोहळ्यात बापू
बोलत होते. आपल्या एक तासाच्या प्रवचनात त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देत, साध्या आणि सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडविण्याचे सामर्थ्य
तुमच्यात आहे आणि देवाला न विसरण्याचा मंत्रही दिला.
*** क्षणचित्रे..
■ व्यासपीठावर चांदीचा मुलामा दिलेला बॅकड्रॉप आकर्षक पद्धतीने बनविण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर मध्यभागी भद्रकालीमाता, डाव्या बाजूला हनुमान आणि उजव्या बाजूला स्वामी सर्मथांच्या प्रतिमा होत्या.
■ बापूंचे ६.३५ वाजता व्यासपीठावर आगमन झाले. त्यांना विद्यार्थ्यांनी बॅण्डच्या तालावर मानवंदना दिली.
■ मैदानात आकाशकंदील लावण्यात आले होते आणि गुढय़ा उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे साधू संत येती घरा.. तोचि दिवाळी दसरा.. याची अनुभूती भाविकांना येत होती.
■ बापूंचे प्रवचन सुरू होताच आल्हाददायी मंद पवन सुरू झाला. बापूंचे प्रवचन अनेक जण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत होते.
■ बापूंचे प्रवचन सुरू होताच आल्हाददायी मंद पवन सुरू झाला. बापूंचे प्रवचन अनेक जण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत होते.
· बापूंनी दिल्या यशस्वी जीवनाच्या टिप्स..
आजकाल सर्वांनाच आता काय करायचे हा प्रश्न पडत असतो. मग हे कसे करायचे? मग हे कसे
होईल? यातून काय होईल.. असे एकामागोमाग प्रश्न पडत असतात.यातून ज्याला उत्तर मिळते तो
सुखी आणि शांत मनुष्य म्हणावा.जगायचे कसे हे माणसांना कळत नाही. हाच प्रश्न जीवनभर सतावत असतो. आम्हाला प्रश्नच पडत नाही. पश्न पडले तर उत्तर सापडत नाही.
■ आपण ज्यांच्यासोबत २४ तास राहतो. त्यांना आपण ओळखतो काय? आणि ओळखले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती.
■ प्रश्नांचे उत्तर प्रश्नातच दडलेले असते. पुस्तके वाचून आत्मविश्वास वाढला असे ऐकले नाही. पुस्तके विकणार्यांचा मात्र आत्मविश्वास वाढतो.
■ जे भांडत नाही ते नवरा-बायको होऊ शकत नाही. बायकोचा ताशा आणि नवर्याचा ढोल वाजतच राहतो. पण यातही गोडवा आहे. भांडण झाले तर कुणीही सॉरी म्हटले तर बिघडले कुठे..
■ आजकाल कुटुंबांमध्ये एकत्र प्रार्थना होत नाही. ज्या कुटुंबात एकत्र प्रार्थना होते. ते कुटुंब एकत्र राहत असते. हा अनुभव आहे.
■ जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर असलेले १00 गुन्हे माफ करून त्याला मदत करतो.
■ जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर असलेले १00 गुन्हे माफ करून त्याला मदत करतो.
■ जे परमेश्वराला आवडत नाही तेच आपण करीत असतो.
■ सुखाची साधने असली तरी त्या साधनांचे अस्तित्व पुरेसे नाही.
■ जीवनात देवाला विसरू नका. २४ तासातील २४ मिनिटे म्हणजे एक घटिका नामस्मरण करा.
■ जीवनात देवाला विसरू नका. २४ तासातील २४ मिनिटे म्हणजे एक घटिका नामस्मरण करा.
मनात भीती ठेवून भक्ती करू नका, मनातील भीती काढण्यासाठी भक्ती करा.. भक्ती करणे म्हणजे मनाचा दुबळेपणा नव्हे.. भक्ती करणार्यांमध्येच ताकद असते. देवावर विश्वास असेल तर तुमचाही आत्मविश्वास वाढेल.. असा आत्मविश्वास आज अनिरुद्धबापू यांनी भाविकांच्या मनात जागविला..
प्रवचनासाठी एकलव्य क्रीडा संकुल भाविकांनी फुल्ल झाले होते. ते म्हणाले की, जीवनात चांगल्या गोष्टी करताना आजूबाजूचे लोक नावे ठेवतील. त्याची तमा बाळगू नका..
तुम्ही माझ्यावर प्रेम करीत असाल तर त्या प्रमाणात माझ्याकडे पाप द्या.. पण भगवंताला विसरू नका.. त्याच्या नावातच मोठी ताकद आहे. “विश्वास असावा पुरता ..”
- आत्मविश्वास नसल्याने अनेक गोष्टी आपण गमावून बसतो. जीवनात यश मिळविण्यासाठी आणि संसार करण्यासाठीही आत्मविश्वास लागतो. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर परमेश्वरावरील विश्वास वाढवा. मनाची शक्ती आणि सार्मथ्य म्हणजे आत्मविश्वास होय.
- जीवनात नाही म्हणायला शिका. आपण कधीच नाही म्हणत नाही. तसे रोगांनाही नाही म्हणत नाही. नाही म्हणण्याचे धाडस आतून येत असते. यासाठी गरज आहे ती आत्मविश्वासाची. बदल घडविण्याचे साधन म्हणजे नाम.
परमेश्वराच्या नावात मोठी ताकद आहे. हे विज्ञानानेही स्वीकारले आहे. ध्वनी व कंपने ही जीवनाच्या प्रत्येक गोष्टीशी जोडली गेली आहेत. जीवनात बदल घडवून आणण्याचे साधन म्हणजे नाम होय. .. असेही त्यांनी प्रवचनातून सांगितले.
जळगाव जिल्हय़ासह खान्देश आणि औरंगाबाद परिसरातून आलेल्या शिस्तबद्ध भाविकांनी मैदान खचाखच भरले होते. शहरातील अनेक मान्यवर राजकारणी, अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिकही या वेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment