- अश्विन नवरात्री पूजन महत्त्व :
अश्विन नवरात्री मधील अष्टमीचा होम
अष्टमीच्या शुभ दिवशी संध्याकाळी आपल्या घरी पुढील प्रमाणे यज्ञ करायचा आहे.
साहित्य: तांदूळ, ताम्हण, कापूर.
पूजाविधी: प्रथम तांदुळाचे स्वस्तिक काढून त्यावर ताम्हण ठेऊन त्यात २,३ मुठी तांदूळ पसरावेत.
नंतर त्यावर ८ कापराच्या वड्या ८ दिशांना मांडाव्यात (ठेवाव्यात) व एक कापूर मध्यभागी ठेवावा व प्रथम तो प्रज्वलित करावा व पुढील जप (२७, ५४, १०८) वेळा म्हणावा.
१. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते ||
२. ॐ श्री आल्हादीन्यै नंन्दायै संधी्न्यै नमो नम: ||
३. ॐ कुलदेवता श्री ............ (आपल्या कुलदेवतेचे नाव) नम: ||
प्रत्येक वेळी एकेक कापूर ताम्हणाच्या मधोमध अग्नीत टाकणे. जप संपेपर्यंत अग्नी शांत होऊ देऊ नये.जप संपल्यानंतर साष्टांग नमस्कार घालणे.
मग ताम्हण हळू उचलून बाजूला करणे व स्वस्तिक काढलेले तांदूळ गोळा करून त्या ताम्हनात ठेवणे.ते तांदूळ दसऱ्यापर्यंत देव्हाऱ्यात सफेद कपड्यात बांधून ठेवणे व दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करणे.
No comments:
Post a Comment