Latest News

Thursday Discourse (17-03-2011)

These are the important points summarized from Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu's discourse delivered on Thursday, 17th March 2011 at Shree Harigurugraam.

हरि ॐ

(नुकतीच डॉ. पौरससिंह ह्यांना औस्ट्रेलियातील Edith Cowan युनिव्हर्सिटी कडुन मास्टर्स ओफ जिरयाट्रिक मेडिसिन ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. पौरससिंह हे भारतातील सर्वांत पहिले जिरयाट्रिक मेडिसिन स्पेशालिस्ट आहेत. प्रवचनाच्या आधी ह्या सोहळ्याची सी.डी. सर्व बापु भक्तांना दाखवण्यात आली.)

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (१७ - ०३- २०११)

आता आपण सगळ्यांनी एक सी.डी. बघितली.त्यात एक सुंदर गोष्ट दिसते ती म्हणजे त्यात समारोहाच्या आधी धर्मोपदेशक येतात, पवित्र मंत्र म्हणतात आणि मग समारंभ सुरु होतो. आपण परदेशातील लोकांचे अनुकरण करायला जातो पण त्यांच्या चांगल्या गोष्टींचे कधी अनुकरण करत नाही. ते त्यांच्या आध्यात्मिक गोष्टी कधीच सोडत नाहीत.

प्रत्येकाचा अध्यात्माचा मार्ग वेगळा असला तरी base एकच असतो.हा संपूर्ण सोहळा बघताना एक जाणवले की, चान्सलर, वोईस-चान्सलर हे तिथे आधी गदा घेवुन येतात.त्या आधी तिथे कोणी स्टेज वर येवुन बसलेले नाही. एव्हढ्या मोठ्या युनिव्हर्सिटी च्या समारंभाच्यावेळी प्रथम त्याचा धर्मोपदेशक येतो पवित्र मंत्रांचे उच्चारण करतो आणि मगच कार्यक्रम सुरु होतो.आपण त्यांचे बाह्य स्वरुप स्विकारतो, त्यांचे अंतरंग कधीच बघत नाही.

ह्या सोहळ्या वरुन परत आल्यावर पौरसने सांगितले की, "बाबा, I promise, माझे संपुर्ण आयुष्य मी ह्या कार्याला वाहुन घेईन व हे करताना कुठलाही स्वत:चा फायदा न बघता वृद्धांची व अपंगांची सेवा करेन." बरयाच जणांना माहीत नसेल की, नंदाई ब्रेल लिपीत expert आहे.नंदाईने अंधांच्या शाळेसाठी काम केले आहे.पौरसने त्याच्या आईला लहानपणापासुन अपंगांसाठी काम करताना बघितले आहे.

आज आपण नाव बघणार आहोत ते आहे शिवा.शिव म्हणजे पवित्र.

जर १ मि.ग्र.शिव असेल व त्यात १० अब्ज अपवित्र गोष्ट घातली गेली तर त्यालाही ते १ मि.ग्र.शिव पवित्र बनवते. शिवा म्हणजे अश्या शिवत्त्वाच्या, पावित्र्याच्या कार्याची,अपवित्राचा लय घडवणारी कार्य प्रणाली.

परम शिवाचे शिवत्व जिच्यामुळे अशी ती आदिमाता शिवा (शिवा म्हणजे परमशिवाची पत्नी नव्हे)

प्राचीन वैदिक परंपरेत तीन प्रमुख संप्रदाय होते,विष्णू,शिव, व ब्रह्मा ह्यांची पुजा करणारे अनुक्रमे वैष्णव,शिव,ब्रम्ह हे तीन संप्रदाय. ह्या तीन्ही संप्रदायांनी त्यांचे जे जे स्वरुप (ब्रम्हा, विष्णु, शिव)प्रधान मानले त्यानुसार त्यांनी ह्या आदीमातेला नावे दिली.वैष्णव संप्रदायाने नारायणी,शिव संप्रदायाने शिवा,तर ब्रम्ह संप्रदायाने तिलाच आदिती म्हटले.

जी, गायत्री, तिच अनसुया, तिच शिवा. आदिती म्हणजे जी दिती नाही ती, जिच्यात संहार धर्म अजिबात नाही अशी. जेव्हा व्यासांनी हे वेगवेगळे संप्रदाय बघितले तेव्हा त्यांनी ह्या सगळ्य़ांच्या पलिकडे जावुन दत्तगुरु व गायत्री ही नावे त्या मूळ स्वरुपांना दिली.त्यामुळे हे तीन्ही संप्रदाय एकत्र आले.

शिवा म्हणजे अपवित्रतेला पवित्र करणारी ताकद ,पवित्र करणारी basic शक्ती.

"सर्व मंगल मांगल्ये , शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते "
हा श्लोक तिचा सगळ्यात जवळचा मानला जातो कारण ह्यात तीन्ही संप्रदायांचा उल्लेख आहे. मंगलाचे मंगलत्व सांभाळणारी, सर्व पुरुषार्थ साध्य करुन देणारी अशी ती आदिमाता. इथे गौरी तीच आदिती.

पण ही कधी अपवित्रतेला पवित्र करते ह्याचे उत्तर तुलसीदासांनी दिले आहे .." होत न आज्ञा बिनु पयसा रे, सब सुख लहे तुम्हारी सरना,तुम रच्छक कहु को डरना"

जेव्हा मनुष्य सहा पुरुषार्थ पैकी कुठल्याही एका पुरुषार्थाचा हात धरुन पुढे जायला बघतो, तेव्हा त्याला ती तिन्ही पातळीवर म्हणजेच सूक्ष्म, स्थूल आणि तरल या तीनही पातळीवर सर्व बाजुंनी शिवा सहाय्य करते.आमच्या वर्तमान काळात घडणाऱ्या तसेच भुतकाळात घडुन गेलेल्या अपवित्र गोष्टींनाही ती पवित्र करते. त्याचेच उदाहरण म्हणजे श्वासोच्छवासाची क्रिया.

प्राणायामात आपण अनुलोम-विलोम क्रिया बघतो.ह्यात श्वास आत घेण्याच्या क्रियेला संस्कृत मध्ये पुरक म्हणतात तर श्वास बाहेर टाकण्याच्या क्रियेला रेचक म्हणतात.श्वास आत घेवुन बाहेर टाकण्याच्या मधल्या काळाला अंतर कुंभक तर श्वास बाहेर टाकल्यावर परत आत घेईपर्यंतच्या मधल्या काळाला बाह्य कुंभक म्हणतात. ही श्वासोच्छवासाची क्रिया तीन पातळींवर घडते.स्थुल पातळी म्हणजे शुद्ध प्राण वायु फुफ्फसांकडुन हृदयाकडे जातो, हृदयामार्फत सर्व शरीरात पसरतो तेव्हाच शरीरातील अशुध्द प्राण वायु हृदयाकडुन फुफ्फसांकडे पाठवला जातो व उच्छवासावाटे बाहेर टाकला जातो. सुक्ष्म पातळी म्हणजे हा श्वास शरीरातील प्रत्येक पेशींना प्राणवायुचा पुरवठा करतो.तर तरल पातळी म्हणजे हाच प्राणवायु प्रत्येक पेशींच्या enzymes,structure पर्यंत पोचवतो.

तसेच आपण पाणी पितो त्यातीलही शुध्द द्रव्ये शरीरात शोषली जाते व अशुध्द द्रव्ये किड्नी द्वारे मुत्रामधुन शरीराच्या बाहेर टाकली जातात.

म्हणजेच इथेही अपवित्रतेला पवित्र करण्याची क्रिया घडत असते.आपण अन्न घेतो त्याच्या बाबतीत सुद्धा हिच गोष्ट लक्षात येते. अन्नातील चांगले घटक शरीरात शोषले जातात व अनावश्यक घटक मलावाटे बाहेर टाकले जातात. काही जणांना constipation चा त्रास होत असतो इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते कि, मनुष्य जेव्हढा त्याचे ओठ घट्ट बंद करुन ठेवतो तेव्हढा तो constipated असतो.डॉक्टर नेहमी गु्दद्वाराची तपासणी करताना सांगतात , "लंबा,लंबा सांस लो" , कारण त्यामुळे गु्दद्वाराच्या मांस पेशींची हालचाल चांगली होते.व शरीराकडुन आलेले अनावश्यक घटक मलाद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते.जे बिल्कुल हसत नाहीत त्यांना विविध अपचनाचे विकार होत असतात.काही जणांना सवय असते प्रत्येक गोष्टीत खोट काढायची , त्यामुळे जीवनातला आनंद त्यांना शोधताच येत नाही.

दैनंदिन जीवनातील ह्या ज्या तीन घटना बघितल्या, ह्या मध्ये शिवा तत्वाची, ह्या आदीमातेच्या शिव स्वरुपाच्या आशीर्वादाची नितांत आवश्यकता असते.शिवा तत्व म्हणजे चांगला भाग स्वीकारुन वाईट भाग बाहेर टाकण्याची क्रिया.

श्वासाच्या क्रियेतुन अशुध्द प्राण वायु बाहेर टाकला जातो , अन्न ग्रहणाच्या क्रियेतुन मल बाहेर टाकले जाते,जलप्राशनाच्या क्रियेतुन मुत्र बाहेर टाकले जाते.

दिवसातुन एकदा जिला नमस्कार करायला आपल्याला त्रास होतो ती दिवसातुन कितीवेळा आपल्यासाठी झटत असते. १ मिनिटाला आपण १८ वेळा श्वास घेतो,१ तासाला १०८० वेळा म्हणजेच २४ तासात कमीत कमी २५००० वेळा आपली श्वासोच्छवासाची क्रिया घडत असते. श्वासोच्छवासाची क्रिया म्हणजे चांगला भाग स्वीकारुन वाईट भाग बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजेच शिवा तत्व .ह्याचाच अर्थ जन्मापासुन म्रुत्युपर्यंत रोज एव्ह्ढ्या वेळा ती आपली आठवण ठेवत असते.पण आपण दिवसातुन एकदा तरी तिची आठवण ठेवतो का?

१०८ वेळा मंत्र म्हणायला घेतला की , पहिले आणि शेवटचा मंत्र फक्त मनापासून असतो. मधल्या १०६ वेळा जगातल्या इतर सर्व गोष्टींची आठवण होते, पण तिचे रुप आपल्याला आठवत नाही.डोळे बंद करुन काही जण श्लोक म्हणतात,त्यात सुरुवातीच्या ओळी सोडल्या तर नंतर श्लोक कुठच्या कुठे म्हटला जातो. त्यापेक्षा जप करताना डोळे उघडे ठेवत जा, समोर दत्तगुरुंचा, त्रिविक्रमाचा फोटो ठेवा.मी (प.पू.बापू) तुमची exam घेणारा नाही तर exam च्या वेळी copy पुरवणारा आहे.डोळे मिटुन जप करणे म्हणजे exam देणे. exam द्यायला जावु नका. ध्यान लावुन बसायला आपण कोणी साधु नव्हे.आपण सामान्य माणसे आहोत म्हणुनच सोप्या मार्गांनी आपण जावु.काही जणांचे म्हणणे असते सुचित दादांनी खुप गोष्टी वाचायला दिल्या आहेत.काय काय वाचायच्या? तर त्यातल्या जेवढ्या जास्त करता येतील तेव्हढ्या करा.

पुरातन काळापासून दिवसाचे ३ भाग आहेत सकाळ,दुपार व संध्याकाळ.दिवसाच्या या प्रत्येक भागात कमीत कमी२४ मिनिटे नामस्मरण/उपासना करण्यास सांगितली आहे.तेव्हढी नाही जमली तरी कमीत कमी एकदा तरी २४मिनिटे उपासना करा.एव्ह्ढे रोज करणे म्हणजे फक्त passing , काठावर पास होणे.जर हे ३ वेळा केले तर first class व ह्या व्यतिरीक्त जर इतर वेळी रामनामाची वही लिहिली तर distiction.आणि जर हेच सगळे जीव ओतुन केलेत तर गोल्ड मेडल पेक्षाही मोठे मेडल मिळेल ज्याची कशाशी तुलना नसेल.जी गोष्ट दादांनी नेमुन दिली आहे त्यात जे जास्त आवडते ते करा. जे आवडते ते जर गुरुने दिले असेल तर ते करणे अधिक उत्तम.पण त्याच बरोबर जर ते जमत नसेल तर मी पठण करत नाही म्हणून मी फालतू आहे असा विचार मनात आणु नका.

ज्यांचे माझ्यावर प्रेम नाही ,त्यांना ओरडायला, विनंति करायला मी(प.पू.बापू) जात नाही. रोज मात्वात्सल्यविंदानचा १ अध्याय, ग्रंथराज मधील २ पाने, आन्हीक,गुरुमंत्र हे म्हणणे पुरेसे आहे,एव्हढे रोज म्हणणे म्हणजे passing. ह्या सोबत रामरक्षा , दत्तबावनी म्हटल्यास अधिक उत्तम.पण आज सोमवार तर शिव पंचाक्षर म्हणेन,मंगळवार तर गणपतिचे स्तोत्र म्हणेन असे करायला जावु नका.नित्य उपासना महत्वाची आहे.

शाळेच्या संमेलनात सगळ्यांना माहीत असेल वर्षानुवर्षे एकच स्वागत गीत चालु असते,किती boring वाटते ते!!..तेच चेहरे तेच गाणे !!.देवाला पण bore होत नसेल का आपल्या त्याच त्याच चुकिच्या वागण्यामुळे?

ही शिवा दिवसातुन कमीत कमी २१,६०० वेळा रोज तुमचे शरीर पवित्र करण्याचे कार्य करते. मग आम्हांला तिची आठवण ठेवायला नको का?

आम्ही म्हणतो देवा आम्हांला प्रचिती दे...दर मिनीटाला ७२ वेळा हृदयाच्या स्पंदनामधुन दत्तगुरु अज्ञान रुपात प्रचिती देतच असतात. तर दर मिनीटाला १८ वेळा श्वासच्या क्रियेमधुन ती आदिमाता ज्ञान रुपात प्रचिती देत असते.हृदयाची गती समजण्यासाठी डॉक्टरला pulse बघावी लागते म्हणजेच ज्ञान मार्गाची आवश्यकता असते.श्वासाची क्रिया मात्र आपण सहजपणे जाणु शकतो.म्हणुनच क्रुष्णाने सांगितले आहे की,ज्ञान मार्ग सोडुन द्या , भक्तीमार्ग स्विकारा. श्वास आत घेताना उच्चार होत असतो "सो" तर श्वास सोडताना उच्चार होतो "हं"म्हणजेच प्रकृतीने आपल्याला जन्मतः च "सोहsम" हा जप दिला आहे.

आपण ॐ म्हणतो तेव्हा हवा आत घेतली जाते, इतर कुठलेही अक्षर म्हणताना हवा बाहेर फेकली जाते. हा ॐ कसा बनला आहे तर ओ,उ,म पासुन म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश.व त्यांच्यावर असणारी अर्धकोर,तुर्यावस्था,नित्यानंदाची अवस्था म्हणजेच "आदिमाता" आणि वरचा बिंदू म्हणजेच मूळ बिंदू "दत्तगुरू" . म्हणजेच ॐ च उच्चार करताना आपण ह्या पाचही शक्ती आत घेत असतो,म्हणजेच पवित्र गोष्टी आत घेतो, तर तांत्रिक ॐ म्हणताना हवा बाहेर टाकतात,पवित्र गोष्टी बाहेर टाकतात.

आपण हरी ॐ म्हणतो हे हरी ॐ म्हणजेच शिवत्व आत घेण्याची प्रक्रिया.समजा यात ॐ म्हणताना चुकून हवा बाहेर टाकली गेली तर त्यासाठी हरी आधी म्हणायला मी (प.पू.बापू) सांगितले आहे. चुकीचे हरण करणारा तो हरी म्हणूनच "ॐ" च्या आधी "हरी" म्हणायचे. हरी ॐ म्हणजे पवित्र गोष्ट स्विकारण्यासाठी सद्गुरुनी दिलेले साधन.

हरी ॐ म्हणताना काही चुक झाली किंवा मनात वाईट विचार आला तर शांत पणे माझे नाव घ्या.जे काही वाईट असेल त्याची मी(प.पू.बापू) काळजी घेईन

"तुमचा मी भार वाहीन सर्वथा,नव्हे हे अन्यथा वचन माझे" असे साईनाथांनी सांगितले आहे .

त्यामुळे ह्याच्या पुढे तरी हरी ॐ म्हणताना हा पवित्र भाव आठवायचा प्रयत्न करा.ह्यात हरी जोडल्यामुळे जी पवित्र गोष्ट आत घेण्याची प्रक्रिया आहे त्यात काही mistake होण्याचा चान्सच नाही.

(Courtesy: http://www.manasamarthyadata.com/)

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.