Latest News

श्री गुरुपौर्णिमा कार्यक्रम


॥हरि ओम॥
श्रीगुरुपौर्णिमा विशेष सुचना :           
               संस्थेतर्फ़े ह्या वर्षी सर्व श्रध्दावानांच्या सोयीसाठी "श्रीगुरुपौर्णिमा"ही शनिवारी दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून ते रात्री ९.०० वाजेपर्यंत श्रीहरिगुरुग्राम, वांद्रे येथे साजरी केली जाईल.
  • कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.
१) सकाळी ९.०० वाजता श्रीत्रिविक्रम पूजन व महापूजन सुरु होईल व ते रात्री ९.०० वाजेपर्यंत सुरु राहील. त्यानंतर परमपूज्य सद्‍गुरुंच्या चरणमुद्रांचे दर्शन, येणार्‍या प्रत्येक श्रद्धावानास घेता येईल. त्याचप्रमाणे श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे पुजन झाल्यावर पूजनाच्या अभिषेक जल कलषाचे दर्शनही प्रत्येक श्रध्दावानास घेता येईल.
२) परमपूज्य सद्‍गुरुंचे आगमन झाल्यावर प्रथम त्यांचे औक्षण होईल त्यानंतर,
३) परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादा श्रीनृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे पुजन करतील. त्यानंतर,
४) परमपूज्य बापूंच्या नित्य गुरुंच्या पादुका सद्‍गुरु स्वत:जपाच्या स्तंभावर श्रीअवधुत(अचल) व श्रीपुर्वावधुत(चल) कुंभा बरोबर ठेवतील. त्यानंतर,
५) परमपूज्य सद्‍गुरु, नंदाई व सुचितदादा रामनामाच्या वहीपासुन बनविलेल्या "इष्टिका" मस्तकावर धारण करुन स्तंभा भोवाती प्रदक्षिणा घालतील. प्रत्येक श्रध्दावानास हा इष्टिका मस्तकावर घेऊन जप म्हणत प्रदक्षिणा घालता येतील. त्यानंतर
६) परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादा श्रीअनिरुद्ध अग्निहोत्रात उद अर्पण करतील. येणारा प्रत्येक भक्त इथे उद अर्पण करू शकतो.
७) त्यानंतर स्टेजवर "ॐ द्रां दत्तात्रेयाय नम:" हा जप अखंड चालु राहील. प्रत्येक भक्त गुरुवारी येणार्‍या ह्या श्रीदत्तात्रेयांच्या मुर्तीचे दर्शन स्टेजच्या जवळुन घेऊ शकतात.
८) त्यानंतर श्रीअनिरुद्ध चलिसा पठण होईल व प्रत्येक तासानंतर श्रीअनिरुद्ध चलिसा म्हटली जाईल व ह्यावेळी परमपूज्य सद्‍गुरुंच्या हस्तस्पर्शासाठी उदी स्टेजवर नेऊन ती हस्तस्पर्श झालेली उदी श्रीगुरुपौर्णिमेचा प्रसाद म्हणून प्रत्येक श्रध्दावानांस वाटली जाईल.
९) त्यानंतर परमपूज्य सद्‍गुरु त्रयींचे दर्शन सुरु होईल व ते रात्री महाआरती पर्यंत येणार्‍या प्रत्येक श्रध्दावानांस घेता येईल.
१०) त्यानंतर महाआरती होईल. ह्यात प्रथम स्वत: सद्‍गुरु श्रीदत्तात्रेयांची आरती करतील व नंतर सद्‍गुरुंची आरती निवडक श्रध्दावान करतील. आरतीनंतर श्रीअनिरुद्ध पाठ तसेच गजर होईल.

अशा ह्या श्रीगुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचा लाभ सर्व श्रध्दावानांनी घ्यावा.

 - केंद्रीय केंद्र संपर्क समिती.

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.