Latest News

Thursday Discourse - 25/08/2011


!! हरि ॐ!!
  माझ्या (परमपूज्य बापू) सर्व मित्रांना घरच्या गणपतीचे आग्रहाचे आमंत्रण. आपल्या घरच्या गणपतीची आगमनाची मिरवणूक अमरसन्स, बांद्रा येथून ३१, ऑगस्ट ला सांयकाळी ५.०० वाजता निघेल. दुसर्‍या दिवशी १ सप्टेंबर सकाळी पूजन झाल्यावर सर्वांना दर्शन घेता येईल. रात्री महाआरती असेल. ३ सप्टेंबर ला पुर्नमिलाप मिरवणूक दुपारी ४.०० वाजता हॅपीहोम मधून निघेल.

     गेल्या वर्षापासून आपण संकल्प सुपारी सुरु केली आहे. हा संकल्प किंवा नवस फक्त गणेशोत्सवाच्या वेळीच करता येईल. नवस पूर्ण झाला, तर तो घरच्या गणेशोत्सवाच्या वेळीच फेडता येईल.
     संकल्प सुपारीला कुठलीही किंमत नाही, जर तुम्हांला कधीही कुणी म्हणत असेल की, "बापुंना भेटायचे असेल, तर ५००/-, १०००/- रुपये द्या, मी भेट घडवतो.” तर अशा व्यक्तीला लगेच तुम्ही चप्पला काढून मारु शकता आपल्याकडे अशा कुठल्याही गोष्टी घडत नाहीत.

     बापूंसोबत असलेले फोटो दाखवून जर कुणी व्यक्ती, आपण बापूंच्या खूप जवळचे आहोत असे भासवत असेल, तर असे काहीही नसते, हे लक्षात ठेवा. कुणी ५ कोटी रुपये दिले तरी माझी भेट घडेलच असे नाही, कारण हे पूर्णपणे माझ्या मनावर असते. कुणी ५ पैसे जरी दिले तरी त्याला पाच पट मी देऊ शकतो. त्यामुळे जास्त पैसे असले तर बापूंची भेट घडेल, असा प्रकार आपल्याकडे नसतो.

     गणेशोत्सवात संकल्प सुपारी वाहायची किंवा नवस फेडायची व्यवस्था तिथेच केलेली असेल. गेल्या वर्षापर्यंत गणपतीच्या समोर एकेक जण दर्शनासाठी यायचे. त्यामुळे दर्शन घेताना खूप घाई व्हायची. म्हणून ह्या वर्षापासून वेगळी दर्शन व्यवस्था केली आहे, ज्यात ५-५ जण एकाचवेळी दर्शन घेऊ शकतील. त्यामुळे एकाच वेळेस ५-६ जणांना जास्त वेळ मनोसोक्त दर्शन घेता येईल.

     दुसरी एक सूचना म्हणजे बलवर्गाची ५ वी व ६वी बॅच आता सुरु होणार आहे. तेव्हा १८ ते ४० वयोगटातील पुरुषांनी हे फ्रेश फॉर्म भरायचे आहेत. हे फॉर्मस गेट नंबर ३ वर आजपासून (तीन गुरुवार) मिळतील. त्यातून निवड करुन सिलेक्शन केले जाईल.

     आपण वमन बाधा बघत होतो. किती बाधा झाल्या आतापर्यंत? इथे बसलेल्या मंडळींपैकी कितीजण मी (परमपूज्य बापू) लिहीलेले "प्रत्यक्ष" मधले अग्रलेख वाचतात? खूपच कमी हात वर आहेत.
     ह्या अग्रलेखांमधून गुरुक्षेत्रम्‌ म्हणजे काय? स्कंदचिन्ह म्हणजे काय? ते कळेल. ह्या स्कंदचिन्हातील मधला भाग म्हणजे गुरुक्षेत्रम्‌, हा मधला भाग म्हणजेच नामाकाश. प्रत्येक श्रद्धावानाने केलेली प्रार्थना पोचल्यावर ह्या नामाकाशाच्या बाजूने असणारे चण्डिका कुलातील सहाजण मग त्यांच्या कार्याला लागतात.

     मनापासून तुम्ही जेव्हा गुरुक्षेत्रम्‌मध्ये येऊन प्रार्थना करता मग ती प्रार्थना दत्तगुरुंची असो, चण्डिकेची असो, की परमात्म्याची असो ती पोहचते ह्या नामाकाशातच. मग त्या प्रार्थनेला प्रतिसाद कोण देणार, हे चण्डिका कुल ठरवते. श्रद्धावानांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देण्याची जबाबदारी चण्डिकाकुल स्वत:वर घेते.

     समजा  R म्हणजे रामनाम मानले व S म्हणजे शिवनाम मानले तर रामभक्तासाठी त्याची प्रार्थना रामनामामुळे आधी R पद्धतीने कार्य करते मग S पद्धतीने कार्य करते. तसेच शिवभक्तासाठी शिवनाम आधी S पद्धतीने कार्य करते मग R पद्धतीने म्हणजे R व S एकच पण कार्य जशी प्रार्थना असेल त्यानुसार ठरते.

     ह्याचे भौतिक उदाहरण द्यायचे झाले तर पेशंटला ताप असेल तर तो स्वत: वेगवेगळी औषधे घेऊनही त्याचा ताप जात नाही. पण तेच तो डॉक्टरकडे गेल्यावर, डॉक्टर त्या पेशंटचा ताप कश्यामुळे आला आहे हे लक्षणांवरुन ओळखून समजा मलेरियाचा ताप असेल तर त्यानुसार औषध देतो, त्यामुळे पूर्णपणे ताप जातो.

     जेव्हा तुम्ही एखादं नामस्मरण करता, समजा रामनाम किंवा कोणी शिवनाम घेत असेल, तर जरी राम व शिव ह्या दोन्ही बीजांचे कार्य विरुद्ध असेल तरी जर तुम्ही रामनाम घेत असाल व शिव म्हणून हाक मारली तर शिव रामाला सोबत घेऊन मदतीला धावून येतो.

     गुरुक्षेत्रम्‌ हेच सगळ्यात पवित्र तीर्थक्षेत्र का? कारण, इथे आमच्या मागील जन्माची पापे बघितली जात नाहीत. इथे श्रद्धावानाला सजा नाही, फक्त क्षमा आहे, म्हणूनच गुरुक्षेत्रम्‌ हे सर्वात जेष्ठ व श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही म्हणाल जेष्ठ कसे काय? हे आता ३ वर्षापूर्वीच तर झाले. इथे ३ वर्ष हा स्थल रुपातील काळ आहे. मुळात गुरुक्षेत्रम्‌ म्हणजे साक्षात स्कंदचिन्ह, हे नामाकाशरुपाने सूक्ष्म रुपात यापूर्वीही अस्तित्त्वात होतेच, तेच आता स्थूल रुपात आणले आहे.

     पूर्वी जवळून बापूंचे दर्शन घेता यायचे पण आता ४-५ लाईन लावूनही  घाईतच दर्शन घ्यावे लागते. असच गुरुक्षेत्रम्‌च्या बाबतीतही होणार आहे, त्यामुळे आत्ताच जागे व्हा.

     कारण, आज जी आपण १० वी वमनबाधा बघणार आहोत ती म्हणजे आळस. आपण जेव्हा आळस देतो म्हणजे शिथिलत्व जाते कारण muslce contract होतात. आळस देणे म्हणजे शिथिलत्व टाकणे. म्हणून आळस देणे नसणे, त्यागणे नसणे, हीच वमन बाधा आहे. आळस झटकून टाकण्याची तुमच्याकडे capacity नसणे ही वमन बाधा आहे.

     आळस कधी आपण झटकतो? समजा तुम्ही आळस येऊन पडलात आणि तेव्हाच तुम्हांला शेजारी साप दिसला तर तुम्ही तसेच राहणार का? नाही. पळत सुटणार ना. कारण मनात भीती निर्माण झाली.
     तसेच समजा आपली प्रिय व्यक्ती I Love You म्हणायला आली, तर तुम्ही आळस देऊन पडून राहणार का? नाही, त्या व्यक्तीसोबत आनंदाने चालत जाणार बरोबर.

     म्हणजेच आळस झटकण्यासाठी आनंद, भीती व संयम किंवा शिस्त ह्यांची आवश्यकता असते. ज्यांच्या आयुष्यात आळसाचे वमन करण्याची क्रिया शिस्तीमुळे असते, त्यांच्या आयुष्यात कधीही भीतीमुळे आळस  झटकण्याची वेळ येत नाही.

     आमच्या आयुष्यात भीती किंवा आनंदामुळे नाही तर शिस्तीमुळे आम्ही आळस टाकू, त्यामुळे आपोआपच उत्साह व आनंद येणारच.

     आळस न टाकणे ही वमन बाधा मनुष्याच्या जीवनात सर्वांत महत्त्वाचा रोल बजावते. मग बघू, थोड्या वेळाने बघू ह्यात पूर्ण आयुष्य निघून जाते. हा आळस कसा टाकायचा? तर,
     सकाळी उठल्यावर डोळे उघडता उघडता समोर तुमच्या लाडक्या देवाच्या फोटोचे दर्शन घ्यायचे, त्याचे नामस्मरण करताना त्यासोबत एकच वाक्य म्हणायचे I Love You. ही गोष्ट सकाळीच का करायची?

     कारण, प्रत्येक मानवाच्या शरीरात Hinstamine नावाचे द्रव्य असते. रात्रीच्या वेळी मानवाच्या शरीरातील Hinstamine चे प्रमाण कमी होते व serotanin ची लेव्हल वाढते, म्हणून झोप लागते. जेव्हा ह्या दोन द्रव्यांच्या प्रमाणात गडबड होते तेव्हा झोप लागत नाही. सूर्य उगवल्यावर Hinstamine चे प्रमाण वाढते व serotanin चे प्रमाण कमी होते.
     म्हणून Hinstamine ला awakening Harmone तुम्हांला जागं करणारा अंगीरस म्हणतात. तुम्ही रात्री झोपताना तुमच्या मनात कसे विचार असतात, त्यावर ह्या दोन द्रव्यांचे नाते ठरत असते. रात्री झोपतानाचा क्षण व सकाळी उठण्याचा क्षण ह्या दोन क्षणांवर आपली Health अवलंबून असते.

     सकाळी उठल्यावर जर चांगले पवित्र विचार असतील तर त्या दिवसाचा balance नीट राहतो.
     त्याचप्रमाणे, जर रात्रीच्या वेळी देखील पवित्र विचार मनात असतील तर रात्रीचाही balance नीट होतो.

     काही जण आपण बघतो, बसल्या जागी झोप काढतात, काहीजण चालताना पण झोपतात म्हणजे चालत असतात पण मनात मात्र त्यांच्या वेगळेच नानाविध विचार चालू असतात. विचार एक सुरु होतो व वेगळ्याच ठिकाणी येऊन संपतो. सचिन तेंडूलकर ९० वर आऊट झाला की, इंडियाच्या टिमचे असेच असते पासून मनात विचार सुरु होतो, तो वेगवेगळ्या गोष्टी आठवत राहत, touch screen mobile पर्यंत येऊन थांबतो. म्हणजेच आपलं मन हे बेवड्यासारखं विचार करत राहते, ज्यात कश्याचाही  कश्याशी ही संबंध नसतो. ह्यामुळे मनाची शक्ती क्षीण होत जाते.

     जर Hinstamine व serotanin चे प्रमाण  imbalance झाले तर मन कायम अशांत राहते. नेहमी चांगल्या जास्त करुन वाईट गोष्टी आठवत राहतात. ह्या सगळ्याच्या वर आपण उठायला हवे. म्हणजे काय? झोपताना एखादे नाम, अभंग, स्तोत्र म्हणायचे. निद्रास्थितीत जर ह्या नामासोबत शिरलात तर नाम निद्रेमध्ये पण कार्य करते.
     रात्री झोपतांना सगळ्या गोष्टी आटोपल्यावर शांतपणे परमात्म्याचे नामस्मरण करीत झोपायला लागा.  तुमच्या शरीरातील Hinstamine चे प्रमाण नॉर्मलला येते. झोपही गाढ लागते. सकाळी उठल्यावर देवाचे नाव घेतले तर दिवसभरही फ्रेश राहायला होते. म्हणूनच आळसाचे वमन करण्यासाठी भुगृ ऋषींनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत त्या म्हणजे -
१) सकाळी उठल्याबरोबर इष्ट देवतेचे स्मरण करायचे व  I Love You  म्हणायचे.
२) रात्री झॊपताना देखील परमेश्वराचे स्मरण करत स्तोत्र म्हणायचे.    

 आपल्या मेंदूतील reward, punishment अश्या एकूण ८१ केंद्रांशी निगडीत Hinstamine ची केंद्रे संबंधित असतात. ह्या सगळ्या केंद्रांना balance ठेवण्यासाठी भगवंताने योजना केली आहे त्याला hypothalamus म्हणतात.    

 तुमची इच्छा असो वा नसो हा भाग पूर्णपणे त्या प्रजापती, महाविष्णु ह्यांच्या ताब्यात असतो. हा भाग असा असतो की, हा कुठल्याही मेंदूच्या केंद्राला विरुद्ध टोकाला जाऊन कार्य करायला भाग पाडतो. म्हणजे जर भीतीचे केंद्र असेल तर त्या केंद्राला शौर्याचे कार्य करायला भाग पाडतो. पण हे कधी? तर जेवढ्या प्रमाणात  तुमची श्रद्धा तेवढ्या प्रमाणातच.    
         hypothalamus हा प्राणमय, मनोमय, भौतिक देह ह्या तिघांना जोडण्याचे काम स्थूल, सूक्ष्म व तरल पातळीवर करतो. सहस्त्रार चक्रात स्थिर परमात्म्याचे चरण म्हणजे hypothalamus. ह्रदय म्हणजे heart नव्हे तर अंत:करण. हे hypothalamus मध्ये असते. ह्याचा स्वामी परमात्मा असेल तर कधीच कुठे problem येत नाही.    

 आपल्याला प्रत्येकाला वाटते मी सुखी व्हावं. समजा घरामागे विहिर आहे, पण ती भरेल कधी भरपूर पाऊस पडेल तेव्हाच, भरपूर त्या विहिरीला झरे असतील तरच ती विहीर भरलेली राहील.     आम्ही काय करतो? तात्पुरती गरज पडेल तेव्हाच भक्ती करतो, त्यामुळे विहीरीत पाणी शिल्लक नसते. शुद्ध स्वधर्म हा मनाचा, प्राणाचा असायला हवा, हा  नित्य व नैमित्तिक हवा. 

ह्यामुळे तुमचा hypothalamus अशी विहीर बनते की, ज्यात पावसाचे पाणी पण जमते व झरे पण लागतात.     आता बघूया ही बाधा कश्यामुळे होते? आळस कश्यामुळे येतो? हा येतो फक्त एकाच गोष्टीमुळे. आळस हा शरीराला किंवा बुद्धीला येत  नाही तर मनाला येतो. मनाला खरीखुरी विश्रांती मिळत नाही म्हणून मनाला आळस येतो. मन सतत कल्पनांमध्ये रमते, वास्तवात जगत नाही, सतत मनात कल्पना असतात. कल्पना करण्याऐवजी चांगले होऊ दे, म्हणून प्रार्थना करा, planning करा.    

 ही बाधा कुठून येते? तर कल्पनांमधून. सामान्य मनुष्याला कळत नाही, तो नानाविध मनोराज्य करत राहतो. 
कल्पना केली की त्याच्या विरुध्द घडते. कल्पना म्हणजे माणसाला छळणारी माया.   
  "कल्पना हेचि मूळ माया"    
 आजची वमन  बाधा ही १० वी होती. आता एकच बाधा उरली. ह्यावरुन गुरुमंत्राचे महत्त्व त्याचं मनावरचं, जीवनातलं भूतकाळावरचं कार्य लक्षात घ्या.गुरुक्षेत्रम्‌ मंत्र गेल्या २ जन्मांचे पाप कमी करतो, पण त्याआधीच्या जन्मातीलही पापे कमी करतो. त्यामुळे गुरुक्षेत्रम्‌ मध्ये येणारे श्रद्धावान ह्यापुढे पुण्य घेऊनच जन्माला येणार, पाप घेऊन यावं लागणार नाही.    

 गेल्या जन्मीचे पाप घेऊन जन्माला येणे, हीच ११ वी बाधा. ह्यासाठी भूतकाळातचं जाऊन ही बाधा दूर व्हावी म्हणून औषध प्यायला हवं. आणि हे औषध म्हणजे गुरुक्षेत्रम्‌ मंत्र.   

  प्रत्येक दिवस हा नवीन जन्मच आहे. कारण प्रत्येक रात्र हे मृत्युचेच स्वरुप आहे.  पण जिवंत असताना मृत्युच्या प्रेमात पडू नका. श्रद्धावान असाल आणि जर तुम्ही आत्महत्या केलीत तर तिथे उभा असलेला जो कुणी आहे तो फोडून काढेल तुम्हांला तुमचे जन्म-मृत्यु हे कोणाच्या बापाच्या हातात नसते, हे फक्त त्याच्या हातात असते. त्याने सही केली की कुणीही थांबू शकत नाही.  

   प्रत्येक दिवस हा श्रद्धावानांसाठी पुनर्जन्म आहे. आज मी उठलो म्हणजे मागच्या दोन दिवसांचे पाप घेऊनच उठलो. इतकी सोपी गोष्ट आहे.
"सर्वबाधाप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्‌"
     आज पासून दर गुरुवारी प्रवचन संपल्यावर एक वेळा आपण इथे गुरुक्षेत्रम्‌ मंत्र म्हणणार आहोत.

!! हरि ॐ !!

2 comments:

  1. Hari Om.. !

    Guruvari N yetahi ya madhyamatun Bapu bhetle. Aaplya sarvanche abhar.

    Hari Om

    ReplyDelete
  2. Hari Om,
    Mumbai la yeta yet nahi pan, ya madhyamatun Bapunna ikayela milate and feel like Bapu is talking to us here in Pune.Khup Khup thanks and shriram
    Thanks a lot
    Deepveera
    Hari om

    ReplyDelete

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.