सदगुरु श्री अनिरुध्द बापू |
श्री हरिगुरुग्राम येथे परमपूज्य सदगुरु श्री अनिरुध्द बापू व नंदामातेच्या कृपार्शिवादाने श्री वरदाचण्डीका प्रसन्नोत्सवात दिनांक १० मे २०११ रोजी गंगामातेचे अवतरण झाले.
जय गंगे भागीरथी च्या जयघोषात सारा आसमंत दणाणून गेला होता. प्रत्येकजण हा क्षण डोळ्यात तेल घालून अनुभवत होता. आणि बघता बघता बापूंचा सूर त्यांच्या गजरात मिसळला आवाज टिपेला पोचला आणि हलकेच बापूंनी ती अवतरल्याचे जाहीर केले, ऊत्साहाला उधाण आले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सर्वांनी प्रेमाने त्या गंगामातेचे स्वागत केले.
गंगा, गंगामाता, गंगामैय्या ..................हजारो भक्त जीवाचा कान करून बापूंचा एक एक शब्द ऐकत होते.
ही गंगा म्हणजे नुसती नदी नाही तर ती ज्ञानगंगा आहे.
वेदांनी कायमच या गंगेला पवित्र, शुध्द, आणि सर्वोच्च मानले म्हणुन आजही आपण सगळेजण त्या गंगास्नानाला महत्व देतो, त्या गंगेचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतो. अशीही ज्ञानगंगा त्रिपथगामिनी म्हणजेच स्थूलात अर्थात या पृथ्वीवर भागीरथी गंगा म्हणून, अंतरिक्षात अलकनंदा म्हणून व भर्गलोकी मंदाकीनी म्हणून वास करत असते.
भारतीय संस्कृतीने कधीच ज्ञान म्हणजे knowledge माहीती म्हणून संबोधले नाही तर ज्ञान म्हणजे त्या परमेश्वराच्या जवळ पोचण्याचा, पुरुषार्थ मिळवण्याचा व जीवन विकासाचा मार्ग. अशी ही गंगा ज्ञान रुपाने माझ्या शरीरात रहाते, शारिरीक, मनोमय व प्राणमय रुपाने. माझ्या शरीरात असणार्या ईडा व पिंगला या दोन नाड्या या माझ्या शरीरातील गंगा व यमुना आहेत. म्हणूनच ही गंगा माझ्या मनातील विचारांना सतत प्रवाहीत ठेवते, माझ्या मनातील विचारांना शुध्द करते, माझ्यातील अशुध्दाचा नाश करून माझ्या शुध्दत्वाचा विकास करते.
अशा या गंगेचे रक्षण ४९ मरुतगण करत असतात. आणि त्यामुळे ही भौतिक गंगा जरी लुप्त झाली तरी ही ज्ञानगंगा मात्र सतत ऊदिच्या रुपाने गुरुक्षेत्रमच्या पवित्र वास्तूत वास करून रहाणार आहे. व हे ४९ मरुतगण तेथेसुध्दा तिचे व पर्यायाने आपले सुध्दा संरक्षण करणारच आहेत. कारण जेव्हा जेव्हा मी ही ऊदी कपाळावर धारण करणार तेव्हा तेव्हा माझ्या बुध्दीतील ४९ Neurotransmitter जागृत होणार आहेत. त्यामुळेच माझी बुध्दी माझ्या मनाचा ताबा घेऊन माझ्या जीवनाचा उचित विकास करणार आहे.
अशा या पवित्र गंगेचे पाणी मस्तकावर धारण करण्याची व नेत्रांना स्पर्श करण्याची सुवर्णसंधी ह्या उत्सवात सर्व भक्तांना मिळाली.
No comments:
Post a Comment