हरि ॐ
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (०७-०४-२०११)
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (०७-०४-२०११)
"जयंती मंगला काली ,भद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते "
स्वाहा बघितली आता ११ वे नाव स्वधा बघायचे आहे. पहिल्याच दिवशी मी (प.पू.बापू)सांगितले कि ही नावे विशिष्ट क्रमाने येतात. अहंकार विरहित असे परमेश्वराला अर्पण करायचे रुप म्हणजे स्वाहा, त्यापुढे येते ती स्वधा. पितरांना अर्पण करताना स्वधा चा उच्चार होतो. मृत्यू नंतर उच्चारले जाते म्हणून हे नाव अपवित्र होते का? बिलकुल नाही. मुळ शास्त्राला बाजुला ठेवुन परंपरेनुसार चालत आलेल्या रुढींमुळे मृत्यू नंतरच्या विधिंना अपवित्र समजले जाते.
मी(प.पू.बापू) ग्रंथराज मध्ये सांगितले आहे श्राध्द म्हणजे आई वडिलांची जिवंतपणी केलेली सेवा. त्यांच्या म्रुतुनंतर त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना हे मृत्यू नंतरचे श्राध्द.
श्राध्दाच्या वेळी पिंड ठेवले जातात .हे पिंड म्हणजे नक्की काय? हे आपल्याला माहिती पाहिजे. पुर्वीच्या वेळी मनुष्य संन्यास घ्यायचा त्यावेळच्या विधिच्या वेळी पिंड केले जातात.पिंड म्हणजे देहाचे प्रतिक. हे पिंड म्हणजे तीन भाताचे गोळे असतात.अन्नमय देहाचे प्रतिक म्हणुन हे ठेवले जातात. आधीच्या दोन जन्माच्या पाप - पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे दोन पिंड तर जे unknown आहे त्याचे प्रतिनिधित्व करणारे एक पिंड असते.
संन्यास घेताना मनुष्य शपथ घेतो की, मी संन्याशाप्रमाणॆ जगेन. संन्यासाची भिक्षा घेताना आधीच्या जन्मांमधुन स्वत:ची मुक्तता करण्यासाठी हे विधी सांगितले आहेत.
म्रुत्युनंतर विशिष्ट दिवस सुतक पाळावे असा कुठेही उल्लेख नाही.व्यापारी वर्गात ४ दिवसच सुतक पाळले जाते, त्यांना व्यवसाय जास्त दिवस बंद ठेवता येत नाही , तर ज्या लोकांकडे आराम आहे अश्यांमध्ये ४० दिवस पण सुतक पाळले जाते.पुर्वीच्या काळी सर्व नातेवाईक दुर राहयचे. लगेच कोणाच्या म्रुत्युनंतर येणे त्यांना जमायचे नाही त्यामुळे मग १० वे, १३ वे अश्या विधिंची सोय करण्यात आली. कुठल्याही शास्त्रात अमुक दिवशीच असे करावे असा उल्लेख नाही.
अनेकांचा समज असतो कि, म्रुत्युनंतर आत्मा घराभोवती फिरतो .म्हणुन सगळे जोर-जोरात रडतात. का? तर फिरणार्या आत्म्याला वाटले पाहिजे की त्याच्या म्रुत्युमुळे सर्वांना खुप दु:ख झाले आहे.मग तो तिथे न थांबता निघुन जातो. त्याचप्रमाणे १० व्या दिवशी तो आत्मा वास येईल इतक्या अंतरावर घराच्या वरुन फिरत असतो असं समज असतो. मग तो कावळ्याच्या शरीरात शिरतो आणि त्याला आवडणारी गोष्ट खावुन जातो. अश्या प्रकारचे गैर समज अजुनही आहेत.
आपण विधि का करतो त्या मागचे शास्त्र कोणी ही नीट जाणून घेत नाहीत. ह्याचेच एक उ.दा. म्हणजे एक मुलगा आपल्या आजोबांचे श्राध्द करत होता. त्या वेळी त्याचे वडिल जिवंत होते.तरिही दोन पिढ्यांच्या पिंडाचे पुजन करायचे अश्या समजुतीमुळे त्या मुलाच्या वडिलांचे ते जिवंत असतानाही त्यांच्या नावाचा पिंड ठेवुन पुजन केले गेले. ही घडलेली घटना आहे.
शास्त्रामागील अर्थ समजुन न घेतल्याने आपण असे आचरटासारखे वागत असतो.मग मनुष्य जिवंत असतानाही त्याचे पिंड ठेवुन पुजन केले जाते. ज्योतिष शास्त्र वाईट नाही पण त्याच्या आहारी जावु नका. अजुनही कोणी घरात वारले की कुठले नक्षत्र लागले ह्यासाठी पंचांग बघितले जाते. पंचंक लागले की मग घरातील पाच जण मरणार म्हणुन ते टाळण्यासाठी विधी सांगितले जातात. आपण ते अज्ञानामुळॆ घाबरुन करत असतो.
शास्त्रामागील अर्थ समजुन न घेतल्याने आपण असे आचरटासारखे वागत असतो.मग मनुष्य जिवंत असतानाही त्याचे पिंड ठेवुन पुजन केले जाते. ज्योतिष शास्त्र वाईट नाही पण त्याच्या आहारी जावु नका. अजुनही कोणी घरात वारले की कुठले नक्षत्र लागले ह्यासाठी पंचांग बघितले जाते. पंचंक लागले की मग घरातील पाच जण मरणार म्हणुन ते टाळण्यासाठी विधी सांगितले जातात. आपण ते अज्ञानामुळॆ घाबरुन करत असतो.
मी(प.पू.बापू) श्राध्दाबद्दल ग्रंथातही सांगितले आहे, की जिवंतपणी आई-वडीलांची काळजी घेतली नाही, त्यांना कसेही वागवले आणि त्यांच्या म्रुत्युनंतर महाजेवण वाटले तर त्याला काही अर्थ नसतो. तुमच्या गावात ज्या काही प्रथा असतील त्याप्रमाणे जरुर श्राध्द करा पण हे श्राध्द का करायचे असते ते नीट समजुन घ्या.
घरातील व्यक्तीच्या म्रुत्युनंतर घरात निर्माण होणार्या negative स्पंदनातुन बाहेर येण्यासाठी आपण श्राध्द करत असतो . म्रुत्युनंतर आत्मा कुठेही फिरत नसतो. प्रत्येक मनुष्याचा लिंगदेह म्रुत्युनंतर त्रिमितितुन चतुर्मितीत जातो. आपण श्राध्द विधी घरात श्रध्देने करायचे असतात ते घरात पवित्र वातावरण निर्माण करण्यासाठी. अश्या दु:खाच्या प्रसंगी आप्तांना बोलवल्यामुळे मन आपोआप दुसर्या गोष्टीत रमते.
हल्ली नातलगच नको असतात किंवा कमी असतात .त्यामुळे माणसाच्या म्रुत्युनंतर एक स्मशानातला माणूस ambulance मधली २-३ माणसे,अशी मोजकीच लोक असतात. पुर्वीच्या काळात अगदी आजुबाजुच्या घरात जरी कोणी वारले तरी २-४ नातेवाईक कायम घरी राहायचे.हल्ली प्रत्येकजण privacy maintain करायला बघतो, अचानक कोणी पाहुणे घरी आले तर त्यांना manner less समजले जाते. पुर्वीच्या काळी घरात अचानक कोणी नातलग आले तर त्यांचे आनंदाने स्वागत केले जायचे. हल्ली लोकांना कोणी घरी आलेले नको असते. ही सगळी सध्याची परिस्थिती शास्त्राच्या विरोधात आहे.
शास्त्र आपल्याला काय शिकवते? तर सांघिकी व्रुत्ती. "धा" हा शब्द म्हणजे धारण करणे. संन्यस्त वृत्तीची दीक्षा घेताना प्रार्थना केली जाते की, आजपासुन मी स्वत:ला फक्त परमेश्वराशी जोडले आहे. मी संन्यस्त वृत्तीला स्वत: भोवती धारण करत आहे .
स्वधा म्हणजे स्वत:च स्वत:चा आधार असणारी, स्वत:च स्वत:ला धारण करणारी. संन्यस्त व्रुत्ती म्हणजेच स्वधा व्रुत्ती. ज्यामध्ये फक्त परमेश्वर हवा आहे हे एकच मागणे असते बाकी कश्याचीही आवश्यकता नसते. हे जे ११ वे नाव आहे ती स्वत:च स्वत:ला धारण करणारी आहे.
हे एक circle आहे ज्यात स्वधा शुन्य अंशावर आहे तर जयंती ३६० अंशावर आहे. म्हणजेच जोपर्यंत मनुष्य स्वकर्तुत्वाने पाऊल टाकत नाही तोपर्यंत तो विजयी होऊ शकत नाही. self dependent बनायचे असेल तर आधी स्वाहाकार अंगीकारणे आवश्यक आहे. स्वाहाकार म्हणजेच स्वत:ला भगवंताच्या चरणी अर्पण करणे, रोजच्या कामाव्यतिरीक्त असलेला प्रत्येक क्षण भगवंताच्या नामस्मरणात घालवणे. असे जेव्हा घडेल तेव्हा स्वत:च स्वत:ला धारण करण्याची शक्ती प्राप्त होते. आधी स्वधाकार आणि मग स्वाहाकार(आधी स्वकर्तुत्व आणि मग अर्पण करणे) असा उलटा क्रम होऊ शकत नाही. म्रुत्युनंतर परत जन्म घ्यायचाच असतो पण तो हाच जन्म नसतो (म्हणजे म्रुत्युनंतर परत त्याच जन्मात २० वर्षा़चे होऊन येता येत नाही) त्याच प्रमाणे स्वधाकार हा स्वाहाकारच्या आधी प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी प्रथम त्याच्या चरणी स्वत:ला अर्पण करता आले पाहिजे.
ह्यासाठी आपल्याकडे तेव्हढी ताकद असते का ? समजा १ हजार किलो सोन्यावर तुमच्या नावाचा stamp आहे, पण ते सोने आहे थरच्या वाळवंटात जिथुन तुम्हांला ते सोने आणण्यासाठी कुठेलेही साधन उपलब्ध नाही. मग तुमची capacity आहे का ते सोने आणण्याची? म्हणजेच एव्हढे सोने आहे पण ते नेता येत नाही.असेच देवाच्या भांडाराचे असते. देवाने त्याच्या भांडाराला कधिच कुलुप लावलेले नसते. पाप्यांसाठी व पुण्यांसाठी हे भांडार समानपणे कायम खुले असते. फक्त हा परमात्मा श्रद्धावानांसाठी नेहमी partiality करत असतो.तो तुमच्या मालकीचा असलेला खजिना उचलुन नेण्यासाठी वेगवेगळ्या वाटा सुचवतो.
तो तुमच्यासाठी (श्रद्धावानांसाठी) extra चे काम करतो. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये जास्त मेहनत हिरो पेक्शा त्याच्यासाठी काम करण्यार्या extra ची असते, तसे extra चे काम तो परमात्मा करत असतो . आपण मात्र ते स्वत: केले असे समजुन स्वत:ला extra ordinaory समजत असतो.
परमात्मा गुपचुप तुमच्या ओझ्याला काठी लावत असतो.असे असतानाही आयुष्यात जेव्हा वाईट घटना घडतात ,अपघात होतात तेव्हा समजायचे जर नामस्मरण नसते केले तर अधिक वाईट घडले असते. परमात्मा श्रद्धावानांना नेहमी दुप्पटीने देत असतो. जर तुम्ही १ ग्रम बळ दिले तर तो २ ग्रम बळ देतो. "तुम्हरे प्रेम राम के दुना"
म्हणुन आधी स्वाहाकार अंगिकारायला हवा. त्यामुळे पुण्य करण्याची ताकद वाढते व वाईट गोष्टींची ताकद कमी होते. रोजच्या जीवनातील उ.दा. म्हणजे चांगला ग्रुहस्थाश्रम करण्याची ताकद वाढते व व्यभिचार करण्याची ताकद कमी होते. पण आपल्याला हे नको असते. मनुष्य आधीच limited पुण्य घेवुन जन्माला आलेला असतो अश्यावेळी जर आधी स्वाहाकार नसेल तर ते पुण्य लगेच संपुन जाणार.
स्वाहाकार हा अनेक मंत्रांमधुन उच्चारला जातो तसा स्वधाकार उच्चारला जात नाही. मग हा स्वधाकार करतात कसा ? ह्यासाठी सर्वांत श्रेष्ठ मंत्र पंचमुखहनुमान कवचामध्ये आहे तो म्हणजे ,
"ॐ हरिमर्कट मर्कट मंत्रमिदं ,परिलिख्यती लिख्यती वामतले ,
यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं ,यदि मुन्चति मुन्चति वामलता "
वाम म्हणजे डावा. हनुमंताच्या चित्राच्या खाली डाव्या बाजुला रोज हा मंत्र ११ वेळा लिहायचा.
ह्या मंत्रात सांगितलेली वामलता ही ३ गोष्टींनी बनलेली असते -
१) प्रत्येक मनुष्याचे दोन जन्माचे पाप
२) कलिचा प्रभाव
३) शनिचा प्रभाव
ह्या तिघांनाही वामलताच म्हणतात. ह्या वामलतेचे (लता म्हणजे वेल) बंधन मनुष्याच्या जन्मासोबत वाढत जाते व त्याला हालचाल करण्यापासुन रोखते.त्याला चांगल्या गोष्टींपासुन दुर नेते.
म्हणुन ह्या वरील तीन गोष्टींपासुन बाहेर पडण्यासाठी हे बंधन तोडले पाहिजे, ह्यासाठी आवश्यकता असते ताकदीची. ही वामलता कापल्यावरच सर्व सुख उत्पन्न होते. आणि ही वामलता कापता येते ती "ॐ हरिमर्कट मर्कट.." ह्या मंत्रामुळे.
तुम्ही ज्यांना सद्गुरु मानता त्यांनी दिलेला कुठलाही मंत्र हा नेहमी स्वाहा, वषट,फट,हुं, ह्यांनीच बनलेला असतो मग तरीही "ॐ हरिमर्कट मर्कट.." ह्या मंत्राची आवश्यकता का असते ?
नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही संकंटांनी ग्रासलेले असता तेव्हा ३ गोष्टींचा आश्रय घ्यायचा.
१) पवित्र क्षेत्राचा म्हणजे गुरुक्षेत्रमचा आश्रय.
२) गुरु शब्दाचा आश्रय
३) गुरु मंत्राचा आश्रय
ह्या तीन गोष्टी असताना घाबरायचे काही कारणच नाही. मग "ॐ हरिमर्कट मर्कट.." ह्या मंत्राचा उपयोग काय? असा प्रश्न पडेल.
ह्या वरदा चंण्डिका प्रसन्नोत्सवापासुन "ॐ हरिमर्कट मर्कट.." ह्या मंत्राची वही उपलब्ध होणार आहे. ह्यात प्रत्येक पानावर उजव्या बाजुला हनुमंताचे एक विशिष्ट चित्र असणार आहे व डाव्या बाजुला ११ वेळा "ॐ हरिमर्कट मर्कट.." हा जप लिहायचा मग डोळे बंद करुन ११ वेळा म्हणायचा.
प्रसन्नोत्सवापासुन रामनामाच्या वहीसोबत अजुन काही वह्या मिळणार आहेत त्यात ही हनुमंताचे विशिष्ट चित्र वही देखील सगळ्यांना उपलब्ध होणार आहे.
"ॐ हरिमर्कट मर्कट.." ही वामलतेचा नाश करणार्या मंत्राची वही मी(प.पू.बापू) स्वत: तयार केली आहे. ही वहीच तुम्हांला तुमच्या आयुष्यात स्वधाकार आणण्यासाठी उपयोगी ठरेल.
"प्रत्येकाने मी कितीही चुकलो, कितीही पापी असलो तरी आमचा बापु कायम आमच्यासोबत आहे ही खात्री कायम बाळगा ." परमात्म्याच्या दोन शक्ती असतात.
१) अंजना शक्ती - स्वधा शक्ती (परमात्मा प्रगट रुपात असतो) म्हणजेच प्रयास.
२) व्यंजना शक्ती - स्वाहा शक्ती (परमात्मा भाव रुपात असतो).
ह्यातील स्वाहा शक्ती म्हणजे अनसुया माता तर स्वधा शक्ती म्हणजे अंजनी माता.(हनुमंताची माता)
आतापर्यंत एकच वही होती आता १ + १० म्हणजे ११ वह्या सगळ्यांना प्राप्त होणार आहेत. ही अंजना वही पण रामनाम बँकेतच. हनुमंत हा ११ व्या दिशेचा स्वामी आहे. मनुष्याला जन्मापासुन बांधुन ठेवणारी वामलता तोडण्यासाठी ही अंजना वही आहे.
"ॐ हरिमर्कट मर्कट.." हा मंत्र असलेली वही श्री वरदा चंण्डिका प्रसन्नोत्सवामध्ये तुम्हा सर्वांसाठी सिद्ध होणार आहे. ह्या वहीची परीक्षा घ्यायला जावु नका, काही उपयोग होणार नाही.
जयंती पासुन प्रवास सुरु झाला होता आणि आता स्वधापर्यंत येवुन परत जोराने प्रवास सुरु झाला आहे. इथे प्रत्येक नामानुसार ताकद वाढत जाते. कुठलेही प्रयास करताना भक्तीने सुरुवात केली तर आपोआप थकवा कमी होईल व स्वत:च स्वत:ला धारण करणारी स्वधा शक्ती तुमच्याकडे येईल.
हरी ॐ
------------------------------ ------------------------------ -----------
* प्रवचनानंतर बापूंनी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या ---
१) श्री वरदा चंण्डिका प्रसन्नोत्सवातील महापुजनात म्हणण्यात येणारे सर्व मंत्र हे माझ्या (प.पू.बापू) आवाजात रेकोर्ड केले जात आहेत व त्यानुसारच सर्व पुजन केले जाईल.
अतिशय प्रेमाने माझ्या(प.पू.बापू) लेकरांसाठी माझ्या आईकडे साकडे घालतोय .त्यामुळे पुजन करताना प्रत्येकाने मनात हाच भाव ठेवा. ज्यांना रक्तदंतिकेचे पुजन करता येणे शक्य नाही त्यांनी आपले नाव, पत्ता लिहुन द्यायचे, त्यांच्या पुजनाचे पैसे माझ्याकडुन (प.पू.बापू) भरले जातील.तुम्हांला नंतर जसे शक्य होईल तसे प्रामाणिकपणे पैसे आणुन द्या.पैसे नाहीत म्हणुन पुजन नाही असे कोणाबाबतीत होता कामा नये.त्यामुळे निश्चिंतपणे प्रत्येकाने रक्तदंतिकेच्या पुजनाला बसा. ह्यात आईची स्तुती, स्तवन रुपाने मी(प.पू.बापू) स्वत: माझ्या आईला साकडे घालणार आहे.
२) ह्या राम नवमी पासुन रेणुकामातेचे सहस्त्राधारा पुजन होणार आहे. २००१ पर्यंत आपण हे पुजन करायचो पण नंतर मी(प.पू.बापू) हे थांबवले होते. रेणूकामातेचे मुख असलेली शिळा ज्या घरात नेहमी पुजली जाते त्या घरातुन इथे रामनवमीच्या दिवशी येणार आहे.विश्वात प्रगटलेले मातेचे प्रथम रुप म्हणजे रेणूकामाता. ह्या रामवरदायिनीचे दर्शन आपल्याला ह्यापुढे नेहमी रामनवमीच्या दिवशी मिळणार आहे.
(Courtesy: http://www. manasamarthyadata.com/)
No comments:
Post a Comment