Latest News

Thursday Discourse (24-03-2011)

हरि ॐ
सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन ( २४-०३-२०११)

"जयन्ति मंगला काली, भद्रकाली कपालिनी,
दुर्गा क्षमा शिवा धात्री ,स्वाहा स्वधा नमोस्तुते"

धात्री ह्या शब्दावर आपण आज बोलणार आहोत ..ह्या नामावर बोलायचे झाले तर अविरत बोलता येईल. धात्री ह्या शब्दाचा सरळ अर्थ धारण करणारी, आधार देणारी, भरण - पोषण करणारी.

पृथ्वी जिच्यावर मानव उत्पन्न झाला तीही धारण करते, आधार देते, भरण - पोषण करते. म्हणुन धरित्री हे मातेचे अतिशय जवळचे स्वरुप म्हणुनच पृथ्वीला भूमाता म्हणतात. पृथ्वी जशी सर्वांचेच भरण-पोषण करते, सर्वांनाच आधार देते तशी आदि माता पण धारण करणारी असली तरी सर्वांनाच आधार देत नाही.

म्हणुनच कुठे ती धात्री म्हणुन active  असते तर कुठे ती तटस्थ असते, कुठे आधार देते हे आम्हांला माहिती पाहिजे. ही आदिमाता कशी आहे तर "शिवा धात्री". शिवा म्हणजेच अत्यंत पवित्र. म्हणजेच ही धारण, भरण - पोषण, आधार फक्त पवित्रतेलाच देते. पृथ्वीचे तसे नाही, ती सर्वांनाच आधार देते.

पण जी शिवा धात्री आहे, दुर्गती हारीणी म्हणुन जी आहे ती फक्त पवित्र तत्वांनाच आधार देते. पण त्याचबरोबर ज्याला आपण चुकतो हे मान्य आहे व ज्याला पवित्र बनायचे आहे, अश्यांना पण ती आधार देते. समजा दोन बिंदु आहेत एक 'अ' जो maximum अपवित्र आहे व दुसरा 'ब' जो पवित्र आहे. अश्यावेळी जर 'अ' चे तोंड 'ब' बिन्दुकडे जरी असले म्हणजेच पवित्रतेकडे असले तरी ही आदीमाता त्यांना क्षमा करते. पवित्र बनवते आणि आधार देते. हीच जर सर्वांचीच धात्री असती तर असुरांना ही आधार देणारी असती पण ही असुरांचा महिषासुरमर्दिनी बनुन नाशच करते .

जेव्हा मनुष्याची चांगले बनण्याची इच्छा असते तेव्हा कितीही वेळा जरी तो fail  झाला तरी ती आदिमाता त्याचे भरण पोषण करत राहते. पण ती मानवाच्या वाईट भावनांचे भरण-पोषण करीत नाही, तर वाईट इच्छांना चांगले करण्याचा प्रयत्न करते. म्हणुन वाईट माणसांना देवीची पुजाच नको असते. एखादा दारुडा मनुष्य दारु न पिता देवीसमोर बसला तर तिच्या पवित्रतेमुळे त्याची दारु सुटणारच. त्यामुळे वाईट मनुष्य देवीसमोर येतच नाही.

जिथे पुर्ण पवित्रता आहे तिथे अपवित्र गोष्ट येवुच शकत नाही. गुरूक्षेत्रम मध्ये दत्तगुरु, आदिमाता चंडिका आणि त्रिविक्रम अचलपणे उभे आहेत त्यामुळे तिथे कुठलीही वाईट गोष्ट राहुच शकत नाही.
वाईट मनुष्य तिथे restless  होणारच. त्याला ती महिषासुरमर्दिनीची मुर्ती भयंकरच वाटणार.गुरूक्षेत्रम मध्ये समोर ती उभी आहे तर बाजुला त्रिविक्रम उभा आहे.हा त्रिविक्रम बनला आहे वज्रापासुन.सर्व शस्रे एकत्र येउन बनते ते वज्र. म्हणुन गुरूक्षेत्रम ठिकाणी वाईट व्यक्ती comfortably बसुच शकत नाही.

आदीमातेचा पवित्रतेला धारण करणे हा गुण श्रद्धावानांपर्यंत पोचावा म्हणुव तिने त्रिविक्रमाला जन्म दिला.
त्रिविक्रम म्हणजे सद्गुरुतत्वाचे संपुर्ण प्रतिक. एखादा श्रद्धावान जर दत्तात्रेयांचा भक्त असेल तर त्याच्यासाठी तो त्रिविक्रम दत्तात्रेयांचेच रुप असतो. एखादा भक्त जर साईनाथांना मानत असेल तर त्याच्यासाठी तो त्रिविक्रम साईनाथच असतो.

सदुरुतत्वाचे कार्यकारी स्वरुप म्हणजे त्रिविक्रम. तुम्ही ज्यांना मनापासुन मानता त्यांचे तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार पेलेल असे स्वरुप म्हणजे त्रिविक्रम. समजा एखा्द्या भक्ताची capacity ९०% ची आहे तर तो त्रिविक्रम त्या भक्ताजवळ ९०% च्या capacity नेच उभा राहतो , व नंतर ती ९१,९२ अशी वाढवत नेतो. समजा एखा्द्याची capacity शुन्य आहे, ०.००००१ % पण नाही ,काही क्षमताच नाही पण काहीतरी भाव आहे तर त्याच्यासाठी तो त्रिविक्रम क्षमतेचेच बीज बनुन येतो .

म्हणुन त्रिविक्रमाचे पुजन आमच्यासाठी सर्वांत सोपे असते. कारण त्रिविक्रम आमच्यावर कुठल्याही क्षमतेचा ताण पडू देत नाही. आणि अशी रचना केली आहे ती आदीमातेनेच ..तिच्या सर्व शस्त्रांनी बनलेला हा त्रिविक्रम मानवाच्या सर्व Spectrum वर (वेगवेगळ्या श्रेणी स्तरांवर..अगदी अल्प ते सगळ्यात उत्तम) त्या त्या आवश्यकतेनुसार कार्य करतो. एखाद्या साडीच्या दुकानात गेल्यावर दुकानदार सांगतो कि, २०० रुपये ते २ लाख रुपयापर्यंत साड्या आहेत हा जो श्रेणी स्तर असतो तो म्हणजे Spectrum. त्रिविक्रम अश्या सर्व स्तरांवर कार्य करतो.

सद्गुरु तत्व (सर्व दैवते,सर्व सद्गुरु स्वरुपे) ते दत्तात्रेया पर्यंत जे जे स्वरुप ते ते म्हणजे त्रिविक्रम. असे हे सोपे स्वरुप माझ्या (प.पू.बापू) आईने बनवले आहे.तिची १८ शस्त्रे एकत्र करुन ,पवित्रतेचे स्वरुप एकत्र करुन श्रद्धावानांसाठी हा त्रिविक्रम तिने उत्पन्न केला आहे.

आपण मात्रुवात्सल्यविंदानममध्ये वाचतो, जेव्हा विश्वाची उत्पत्तीच झाली नव्हती, काहीच अस्तित्वात नव्हते त्यावेळी ब्रम्हदेवाच्या पहिल्या प्रज्ञापराधा मधुन मधु-कैटभ हे दोन असुर निर्माण झाले.ते पाहुन ब्रम्हदेवाने मदतीसाठी महाविष्णूकडे धाव घेतली .महाविष्णूने त्यास आदीमातेचे स्तवन करण्यास सांगितले .तेव्हा अशुभ नाशनाच्या कार्यासाठी आदीमातेने  प्रथम अवतार धारण केला .मग आदीमातेच्या आज्ञेने  महाविष्णूने  मधु- कैटभांचा वध केला .अश्या प्रकारे त्या परमात्म्याकडून ही आदीमाता कार्य करुन घेते.

जेव्हा पृथ्वी उत्पन्नही नव्हती झाली तेव्हा असुरांशी लढणारे होते ते हे माय-लेकच. मधु-कैटभांशी लढण्यासाठी स्वत:च्या हातातील चक्र आदीमाता महाविष्णूला देते.सर्व असुरांशी लढताना जी काही शस्त्र-अस्त्र आहेत ते म्हणजे त्रिविक्रम.

जो ज्या प्रमाणात तपश्चर्या करेल त्या प्रमाणात फळ देणे हे त्या परमात्म्याचे काम. रावणाने परमात्म्याची उपासना केली व अजिंक्यत्वाचा वर मिळाल्यावर तो परमात्म्यावरच उलटला हे पाहुन त्या आदीमातेचे हृदय कळ्वळले.तेव्हा तिने त्रिविक्रमाचे स्वरुप उत्पन्न केले.

जेव्हा वाईट माणसे उपासना करतात तेव्हा हा त्रिविक्रममध्ये आला की, होते काय तर ...परमात्म्याचा असुरांसाठीचावर modify  होतो. म्हणजेच त्याचा वर सफळ संपुर्ण होत नाही.

रावणाने ब्रम्हदेवाकडे वर मगितला की, कोणापासुनही मृत्यु नको, मानवाला तो क्षुल्लक समजत होता त्यामुळे मानवापासुन मृत्यु नको असा वर मगितला नाही. म्हणुनच तो परमात्मा मग संपूर्ण मानव बनून आला व रावणाचा वध केला. ही जी योजना असते ना...असुरांच्या वरामध्ये अशी एक गोष्ट ठेवुन द्यायची की जी असुरांचा नाश होण्यास सहाय्यभुत ठरेल, ही योजना म्हणजे धात्री स्वरुप.

आपण रुद्र वाचतो. रुद्र म्हणजे कोण? हे आपल्याला माहिती पाहिजे. रुद्र म्हणजे एक अतिशय घोर असुर ज्याचा वध वैदिक इंद्र रुपाने केला. ह्या रुद्राभोवती त्याची आई सतत कवच म्हणुन फिरत असे त्यामुळे त्याचा वध करणे इंद्राला शक्य होत नव्हते. तेव्हा इंद्राभोवती आदितीने कवच निर्माण करुन त्याच्या आईला निष्प्रभ केले आणि मग इंद्राने त्याचा वध केला.

श्रद्धावानांसाठी त्रिविक्रमाची रचना तेव्हा आदितीकडून झाली. आदिती म्हणजे अस्पंद रुप, निश्चल रुप.
रुद्राला मारण्यासाठी तिने इंद्राला जे कवच म्हणून धारण केले ते स्वरुप म्हणजे धात्री.

रुद्र म्हणजे मोठा अंध:कार ,सगळ्यात मोठा अडथळा. त्याची आई म्हणजे रुद्री. ह्यांच्याविरुध्द लढताना इंद्राला असहाय्य होताना बघितले ,तेव्हा इंद्राला कवच आवश्यक होते. म्हणुन त्या काळात अस्पंद रुपाने असणारी आदिती इंद्रासाठी धात्री बनुन आधार देणारी, इंद्राचे प्रभामंडल(aura) बनुन कवच रुपाने धावुन आली व रुद्रासुराचा नाश केला. म्हणुन धात्रीचे मुर्ती स्वरुप कुठे दिसत नाही.

अश्या ह्या कवच रुपिणी धात्रीचा पुत्र त्रिविक्रम.म्हणजेच धात्री हे त्या परमात्याचे कवच आहे.
ह्याच धात्री रुपाने प्रत्येक श्रद्धावानासाठी तयार केलेले कवच म्हणजे त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह. हे चिन्ह जेव्हा आपण धारण करतो तेव्हा ते आपल्या सर्वांगाचे कवच बनते.

रुद्रासुर व इंद्र ह्यांचा न संपणारा संग्राम धात्रीने एक क्षणात  कवच रुप धारण केल्याने संपला. म्हणुनच ह्या कवच रुपिणी धात्रीने उत्पन्न केलेला त्रिविक्रम हा सर्व श्रध्दावानांचे कवच आहे. असा हा त्रिविक्रम गुरूक्षेत्रम मध्ये उभा आहे.

तुम्ही कितीही चुकलात तरी कुठल्याही मानाची अपेक्षा न ठेवता मनात चांगला भाव ठेवा , मग ही धात्री तुमचे कवच बनणारच. देवाचे नाव घेताना कुठल्याही अपेक्षेशिवाय मदत करण्याचे प्रयास करा मग त्रिविक्रम व धात्री तुमच्यासाठी कवच रुपाने धावुन येणारच .

धात्रीचाच दुसरा अर्थ होतो त्वरेने धावुन येणारी.म्हणूनच हीचे दुसरे नाव आहे शुभ त्वरा, तारिणी त्वरा. तारण्यासाठी जी धावत येते ती तारिणी त्वरा. तारण्यासाठी जी त्वरेने म्हणजे fastest  speed ने धावुन येते ती धात्री. मुळ रुपात अस्पंद रुपातुन मधली गायत्री, महिषासुरमर्दिनी अशी कुठलीही स्वरुपे न जुमानता ती direct कवच बनुन आली. म्हणजे नक्की काय ? तर समजा एखादे बीज घरातल्या भांड्यामध्ये आहे त्यात वृक्षाच्या सगळ्या capacities  आहेत. पण जेव्हा ते बीज मातीत लावले जाते तेव्हाच त्याला अंकुर फुटतो मग रोप वाढते त्याला कळी येते, त्यातुन मग फुल व फळ प्राप्त होते. ही normal stage झाली.

तर अस्पंदापासुन direct  कवच म्हणजे बीजापासुन मधल्या सगळ्या अवस्था न जुमानता direct फळ ही अवस्था . अशी ही धात्री म्हणुन तिचा पुत्र त्रिविक्रम हा धाता. कधीही गुरूक्षेत्रम मध्ये आलात की लक्षात ठेवा  तिथे ही अनसुया, महिषासुरमर्दिनी धात्री रुपाने व तिचा पुत्र त्रिविक्रम धाता रुपाने उभे आहेत.
जर कोणी व्यक्ती अपवित्र माणसाकडे जात असेल आणि त्या व्यक्तीने तिथे त्रिविक्रमाला नमस्कार केला की आपोआप त्रिविक्रम त्याला वाईट गोष्टींपासुन लांब करतो, त्या वाईट माणसापासुन लांब ठेवतो.
हे धात्री स्वरुप मानवासाठी सगळ्यात जवळचे आहे  कारण धात्री हे अनसुयेच्या सासरचे नाव. अत्रिची पत्नी म्हणुन तिचे नाव धात्री. तिचाच पुत्र जेष्ठ धाता दत्तात्रेय व कनिष्ठ धाता महाविष्णू.
कलियुगाच्या आरंभाला अत्रि व अनसुया स्थुल स्तरावरील अवतार समाप्त करुन आपल्या मुळ स्थानी परत निघून जातात . गुरूक्षेत्रम मध्ये त्रिविक्रम प्रगटवताना ही धात्री अनसुया रुपाने परत आली आहे. गुरूक्षेत्रम मधले अनसुया स्वरुप हे तेच धात्री स्वरुप आहे.तिच्या फोटोत आपण बघतो ती तिच्या बाळांना कशी सांभाळते ते.

आज फोटो एव्हढ्या जवळुन बघायला मिळतो आहे काही काळाने लांबुनच दर्शन घ्यावे लागेल एव्हढी गर्दी होईल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेमाने जेव्हढे दर्शन घेता येईल तेव्हढे घ्या. अनसुयेच्या फोटो मध्ये जी गाय आहे तिच त्या दत्तगुरुंच्या फोटोत आहे. ही गाय धात्री स्वरुपच आहे. मानवाचे जन्मापासुन भरण-पोषण गायीच्या दुधानेच होत असते.

असे हे गुरूक्षेत्रम कोणासाठी आहे? ही महिषासुरमर्दिनी, अनसुया, त्रिविक्रम हा सगळा spectrum  कोणासाठी आहे? तर माझ्यासाठी. नेहमी प्रत्येक गोष्टीत माझे..माझे करता ना ते माझेपण इथे येवु देत. गुरूक्षेत्रम हे माझ्यासाठी आहे ...माझे म्हणायचे ते फक्त इथेच. हे माझेपण एकदा तुमच्याकडे आले ना की, ही अष्टादश भुजा धात्री तुमचे भरण-पोषण सर्वांर्थाने करणारच. 
 हरी ॐ
------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रवचनानंतर प. पू. बापूंनी एक अतिशय महत्त्वाची सुचना केली.

सुचना : १ जुन पासुन प्रत्येक श्रद्धावानाला गुरूक्षेत्रम मध्ये सेवा करता येईल.ह्या सेवेसाठी सकाळी ६ ते ३ व दुपारी २ ते १० अश्या दोन shifts  असतील. सेवेसाठी श्रद्धावानांची नावे lottary  पध्दतीनेच काढली जातील.

जर सेवेच्या दिवशी एखाद्याला येणे जमु शकणार नसेल तर सेवेसाठी परत form  भरावा लागेल. दर गुरुवारी श्री हरीगुरुग्राम येथेच ह्या सेवेसाठी form  उपलब्ध असतील .आज धात्री ह्या नामाविषयी सांगताना ह्या सेवेबद्द्ल सांगण्याची संधी माझ्या(प.पू.बापू) आईने दिली आहे .गुरूक्षेत्रम मध्ये सेवा करताना प्रत्येक क्षण नामस्मरणात घालवा.जे काही काम मिळेल ते अतिशय प्रेमाने करा. तिथे येणार्या  प्रत्येकाशी प्रेमाचे वागा. खरोखर हे सेवा करायला मिळणे हे एक अतिशय पवित्र व सुंदर गोष्ट आहे .
हरि ॐ
 

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.