These are the important points summarized from Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu's discourse delivered on Thursday, 3rd March 2011 at Shree Hari guru graam.
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (०३ - ०३- २०११)
"दुर्गा क्षमा शिवा धात्री..."
दुर्गा स्वरुप आपण बघितले.."दुर्गा दुर्गति हारिणी".अनेक जण गोंधळून जातात. दुर्गति म्हणजे नक्की काय ? दुर्गतिचे उ.दा. द्यायचे झाले तर दलदलीत पडणे एक टोक तर गटारात पडणे दुसरे टोक आहे.
दलदल म्हणजे चिखल, ह्यातुन माणुस जेव्हढे बाहेर यायचा प्रयत्न करतो, तेव्हढाच तो आत रुतत जातो व शेवटी जीव गमावुन बसतो. तर गटारात पडल्यावर सर्वांगाला घाण लागते.इथे जीव जात नाही, पण अंग सगळे घाणीने, दुर्गंधीने माखुन जाते.अश्या प्रकारच्या दुर्गति पासुन वाचवणारी ती दुर्गा.
एका सामान्य स्त्रिची तिच्या पुर्ण आयुष्यात वेगवेगळी रुपे बघायला मिळतात. तिच्या पित्यासाठी ती कन्या असते, तिच्या पतीसाठी पत्नी, भावासाठी बहिण, मुलासाठी आई, सुनेसाठी सासू अशी वेगवेगळी रुपे दिसतात. अशीच सत्तेची सुद्धा वेगवेगळी रुपे दिसतात. सत्ता हे सुद्धा स्त्रीलिंगीच आहे. जी मुळ आध्यात्मिक वैश्विक सत्ता आहे ती म्हणजे आदिमाता. जी असंख्य ब्रम्हांडे आहेत त्या सर्वांवर सत्ता चालते ती फक्त आदिमातेचीच. अश्या ह्या आदिमातेला प्राप्त करुन घेण्यासाठी भक्तिमार्ग व तंत्रमार्ग ह्या दोन मार्गांनी उपासना करतात. वैदिक मार्ग व तंत्र मार्ग ह्यांच्या मध्ये भक्ति मार्ग असतो. तंत्र मार्गात आपला फायदा कसा होईल एव्ह्ढाच विचार असतो.
इथे फरसाणवाल्याचे उ.दा. आठवते. फरसाणवाला नेहमी कागद खाली ठेवून त्यात फरसाण घालुन वजन करतो..ह्यात त्याचा नेहमी कितीतरी फायदा होत असतो,कारण त्या कागदाचे वजन पण त्या फरसाणच्य वजनात add होते, आपल्याला हे समजु शकत नाही. अशी गणिते सामान्य माणसाला कळत नाहीत. वैदिकमार्गातील तंत्रांमधुन अशी अनेक रुक्ष गणिते निर्माण झाली व तंत्रमार्ग तयार झाला. असे हे तंत्र शास्त्र ह्या आदिमातेला आदिमाता न मानता केवळ आदिसत्ता मानतात.
ह्या तीन मार्गातील फरक आपल्याला बर्फाची फ़क्टरी व हिमालय पर्वत ह्यांच्या उ.दा.वरुन लक्षात येईल. वैश्विक सत्तेच्या गणितामध्ये बर्फाचे पाणी किती अंशाला गोठते ह्यावरून बर्फाच्या फ़क्टरी मध्ये बर्फ तयार होतो.हिमालयावर पण बर्फ दिसतो, कदाचित बर्फाची फ़क्टरीमधुन हिमालयापेक्षा जास्त बर्फ तयार करता येईल.मग ह्या दोघांत फरक काय ? तर हिमालयामधुन गंगा तसेच अन्य बारामास नद्या वाहत असतात. ज्यामुळे अनेक पवित्र तिर्थक्षेत्र आम्हांला मिळतात. तांत्रिक बर्फाची फ़क्टरी काढतात, त्यातुन बर्फ विकता येतो पण लोकोपयोगी नद्या आम्हांला मिळू शकत नाही.आम्हांला पवित्र करणारी तिर्थक्षेत्रे मिळू शकत नाहीत. तिथे फक्त रोकडा व्यवहार चालत असतो. म्हणजेच इथे आपल्या लक्षात येते की,
• तंत्र मार्ग म्हणजे बर्फाची फ़क्टरी
• वैदिक मार्ग म्हणजे हिमालय व
• भक्ती मार्ग म्हणजे त्याच हिमालयाच्या आश्रयाने वाहणारी बारामास नदी गंगा, जी सर्व लोकांना पातकातुन मुक्त करण्याचे कार्य करत असते.
ही गंगा आली कशी ? तर, त्या आदिमातेने आपल्या क्षमेचा एक छोटासा अंश महाविष्णूच्या चरणकमळातून निघणार्या ह्या त्रिपथगामिनी मध्ये घातला.हीच गंगा .म्हणुन आज ही त्या क्षमेच्या अंशामुळे सगळ्यांच्या पापाचा नाश करु शकते. इथे अंश म्हणजे नक्की काय? हे आम्हांला कळले पाहिजे. अध्यात्माचा मुलभूत नियम आज समजावुन घ्यायचा आहे.
जसे पाणी हे जलतत्त्वाचा अंश आहे, मग तो एक पाण्याचा छोटासा थेंब असो कि पुर्ण समुद्र असो . उ.दा.एक व्यक्ती पुर्ण आयुष्य भर जे काही बोलते ते त्याच काळातील बाकिचा समाज जे बोलतो त्या सर्वांचा एक अंश असते. ह्याचाच अर्थ अंश ही लहानशी किंवा मोठी गोष्ट नसुन जे काही संपूर्ण त्याचे एक परिमाण म्हणजे अंश. ह्याची अतिशय सुंदर व्याख्या मला (प.पू.बापू) एका सामान्य आदिवासी व्यक्तीकडुन शिकायला मिळाली. त्या आदिवासींनी त्यांच्या गाण्यातुन हे तत्त्च खुप सुंदररित्या समजावले, की, हा सुर्य जो आम्हांला प्रकाश देतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर केव्हढी मोठी जागा दिसते, ती डोळ्यासमोर दिसणारी सर्व जागा म्हणजे भगवंत, व आपल्या डोळयाची जेव्हढी size त्यातुन आत जाणारा सुर्यप्रकाश म्हणजे माणुस. जी गोष्ट मोठ्या द्न्यानी लोकांना नीटपणे समजू शकली नाही ती ह्या प्रेमळ आदिवासींना सहजपणॆ कळली. म्हणून स्वत:ला द्न्यानी समजु नका.त्यांमूळे गर्व येतो आणि मग पतन निश्चित असते.
क्षमा समजुन घ्यायचे असेल तर अंश व अंशी समजुन घ्यायला पाहिजे. तिच्या क्षमा ह्या नावावर मी (प.पू.बापू) युगानुयुगे बोलु शकतो. कारण तिचे खरं नाव क्षमा हेच आहे. बाकीची तिची नावे ही त्या क्षमेचा अंश आहेत. म्हणुन प्रत्येक स्त्रीकडे क्षमेची खुप मोठी शक्ती असते, ही शक्ती कधीच विसरु नका. ह्याचा अर्थ वाईटाला क्षमा करा असा नाही. मात्रुवात्स्ल्यविंदान मध्ये आपण बघतो वाईटाचा नाश करण्यासाठी ह्या आदीमातेने रक्तदंतिकेचे स्वरुप घेतलेच. पण वाईटाचा नाश करून, पापांचे डोंगर कमी करुन ती क्षमाच करत असते हे लक्षात घ्या. क्षमा हे नाव देविच्या पुजनात कधीच सापडत नाही.पण मी (प.पू.बापू) सांगतो म्हणुन आजपासून लक्षात ठेवा, तिचे खरे नाव क्षमा हेच आहे. प्रत्येक स्त्री कडे ही क्षमा उपजतच असते. मुल कितीही वाईट वागले तरी आई क्षमाच करत असते, कलियुगात मात्र ह्याला अपवाद दिसुन येतात.
एकदा एक ओळ्खिचे नवरा- बायको दिसले खुप हताश वाटत होते, घाबरत होते. त्यांच्याशी बोलल्यावर कळले. त्यातील Mr.X ची आई विधवा होती व Mrs.X चे वडिल विधुर होते. त्या दोघांनी पळुन जावून लग्न केले.त्यामुळे हे नवरा- बायको आता एकमेकांचे बहिण- भाऊ झाले होते. प्रसंग खरंच खुप बिकट होता.ह्या Mr.& Mrs.X ची मुले सुध्दा आता लहान नव्हती. तेव्हा शांतपणे त्यांच्या मामाला बोलवुन त्यांना Mr.x ला दत्तक घ्यायला सांगितले, ह्यामुळे आता हे दोघे नात्याने आतेबहीण- भाऊ होत होते, व आतेबहीण- भावांचे लग्न होते. अश्या तर्हेने परत लग्न लावुन दिले..किती मोठ्या प्रसंगातुन त्यांची सुटका सहजपणे झाली. कलीयुगात काहिही घडू शकते ह्याचे हे उ.दा.आहे, असे exception देखील असतात .
प्रत्येक स्त्रीकडे जी क्षमा असते ती तिने हृदयात धारण करायला पाहिजे.ह्या क्षमेमुळेच युगानुयुगे स्त्रीचा सन्मान केला गेला आहे. पतीने जर १०० ग्रुम पुण्य मिळत असेल तर पत्नीला आपोआप त्यातले ५० ग्रम पुण्य मिळते. तिचे जेव्हढ्या प्रमाणात पतीवर जास्त प्रेम तेव्हढे तिला जास्त पुण्य. तुम्ही सगळ्या माझ्या(प.पू.बापू) लेकी आहात.म्हणुन प्रत्येक स्त्रीला आज सांगावेसे वाटते.प्रत्येक पत्नीसाठी तिचा पती हा देव असलाच पाहीजे. जो वाईट नाही व जो तुमच्यावर मनापासुन प्रेम करतो अश्या पती- पत्नीच्या नात्यात पती हा पत्नी साठी देव असलाच पाहीजे. मग पतीचीही जवाबदारी येते की त्याने देवासारखे वागलेच पाहीजे. म्हणजेच त्याने पत्नीचा आधार बनलेच पाहीजे. पतीचा आधार आहे,ह्या खात्रीवर स्त्री जगात कुठल्याही संकटांना सामोरी जावु शकते.कारण स्त्री मध्ये क्षमा तत्व असते . पृथ्वीकडे पण हीच क्षमा असते ... तिचे नावच मुळी क्षमा आहे... आपण तिला लाथा मारतो, तिच्यात नांगर खुपसतो पण तरीही ती आपल्याला क्षमाच ती आपल्याला नेहमी चांगलेच अन्न, जल देत असते .
पुरुषाचा आधार गुणधर्म शिवाकडुन आला आहे. परमात्मा हा महाविष्णू रुपाने नेहमी गती देत असतो तर शिव रुपाने नेहमी आधार देत असतो.आधाराशिवाय गती असु शकत नाही. प्रुथ्वी व सुर्याची गती आपण बघतो ती गुरुत्वाकर्षणाच्या आधारावरच असते. सगळ्या गोष्टी एकमेकांपासुन योग्य अंतरावर ठेवुन आधार देणे हा गुरुतत्त्वाचा प्रमुख गुणधर्म. प्रत्येक पुरुषाने हे लक्षात ठेवले पाहीजे, त्याने आपल्या पत्नीचा आधार बनलेच पाहीजे.
स्त्रीची क्षमा व पुरुषाचा आधार हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा कितिही संकटे आली तरी संसार सुखाचाच होतो.
क्षमा हाच मोठा आधार आणि खरा आधारच क्षमा करु शकतो. म्हणूनच शिवाने अर्धनारीनटेश्वराचे रूप धारण केले.ब्रह्मा- सरस्वती, विष्णू-लक्ष्मी, शिव- पार्वती ही तीन आद्य पति- पत्नीची जोड्पी आदिमातेने उत्त्पन्न केली. ह्या आदीमातेने स्वत:ही अनुसुया रुपात स्वत:च्याच अत्रि रुपाशी विवाह करुन संसार केला व तिला पुत्रही झाले.
ह्या आदीमातेने प्रत्येक गोष्ट स्वत: आधी करुन दाखवली.तिच्या क्रुतीतुन तिने आम्हांला आध्यात्मिक क्षमा दिली. मला (प.पू.बापू) तिचे सगळ्यात आवडणारे स्वरुप हेच आहे..क्षमा. तिच्याएव्हढी क्षमा कोणाकडेही नाही.
एक साधे उ.दा.घ्या. डोळे बंद करुन गुरुच्या फोटोसमोर शांतपणे बसा व आयुष्यामध्ये लहानपणापासुन काय काय चुका केल्या त्या आठवा. १० मिनीटे पण तुम्हांला बसवणार नाही. स्वत:च्याच चुका आठवुन वेड लागेल. मग कळेल की एव्हढ्या चुकांच्या सजा मला मिळाल्याच नाहीत.ही क्षमा त्या जगन्माऊलीकडूनच आली. दिवसभरात किती चुका करतो, कितीवेळा धावत्या गाडीतुन उतरतो , कितीवेळा एखाद्या विषयाचा अभ्यास करायला आळ्स करतो, आणि नेमका तोच विषय पेपरला येतो,कितीवेळा रागाच्या भरात नको ते बोलून जातो.कोण सावरते ह्यावेळी ? ती आदिमाताच.. हे बघितल्यावर लक्षात येते की ह्या सर्व चुकांना क्षमा तिनेच केली.तिने मला (प.पू.बापू) जे पाठवले आहे ते मी क्षमा करावी म्हणुन नाही तर तिची क्षमा तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी, प्रवाहीत करण्यासाठी.. मला(प.पू.बापू) पाठवले आहे.
मी (प.पू.बापू) पोस्टाची पेटी आहे एव्हढंच लक्षात ठेवा.बापु म्हणजे त्याच्या आईची पोस्टाची पेटी. मी (प.पू.बापू) क्षमा करत नाही ... माझा तो गुणधर्म नाही.... माझा गुणधर्म आहे आधार. क्षमा फक्त माझी आईच करू शकते....तिच्या क्षमेची अनेक उ.दा. आहेत.
सत्ययुगाच्या शेवटी वैखानर नावाचा एक राजा होता.त्याने बलवान होण्यासाठी परमशिवाची तपश्चर्या केली आणि खूप ताकद मिळवली. नंतर त्याला वाटले परमशिवा पेक्षा जास्त ताकद आदिमातेची आहे मग तिच्या एवढी ताकद मिळवण्यासाठी त्याने आदिमातेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. आदिमातेला माहित होते,हयाची इच्छा जरी राक्षसी असली तरी मुळात तो चांगला आहे.म्हणुन त्याची तपश्चर्या पूर्ण होण्या आधीच आदिमाता त्याच्या वर प्रसन्न झाली. त्याने आदिमातेकडे वर मागितला कि मला तुझ्या एव्हढे तुल्यबळ व्हायचे आहे. त्यावर आईने सांगितले ,"तुझी जेव्हढ्या प्रमाणात तपश्चर्या तेव्हढे बळ तुला प्राप्त होईल".त्याच्या लक्षात आले आपली तपश्चर्या कमी प्रमाणात झाली आहे ,त्यामुळे आदिमाते एव्हढे बळ अजुन मिळाले नाही, म्हणुन परत तपश्चर्या सुरु केली, आदीमाता पुन्हा प्रकट झाली व त्याला थांबवले.पुन्हा त्याने आदीमातेकडे ,"मला तुझ्या एव्हढे तुल्यबळ व्हायचे आहे" हेच मागितले, आईने त्याला समजावले व विचारले," तुला माझी जागा घ्यायची आहे का?"
तेव्हा त्याने उत्तर दिले नाही... मला तुझ्याही पुढे जायचे आहे...वैखानर आता दत्तगुरूंची जागा घ्यायला बघत होता.आदीमातेने त्याला समजावुन बघितले पण त्याने ऐकले नाही,. त्याने परत तपश्चर्या सुरु केली. तेव्हा आदिमातेने त्याला सांगितले, एका दिवसापुरता व एका रात्रीपुरता माझी सर्व ताकत तुला प्राप्त होईल.तिची ताकत आली म्हणजे तिचे पावित्र्य पण आले. तिच्या पवित्र्याच्या द्रुष्टीमुळे तो प्रत्येक वाईट गोष्टिंचा नाश करत जातो..शेवटी त्याच्या लक्षात येते सर्व वाईट म्हणुन त्याने संपुर्ण जगाचाच नाश केला.हे लक्षात येताच त्याला पश्चाताप होतो व तो स्वत:चाच नाश करायला तयार होतो, तेव्हा आदिमाता त्याला थांबवते,व सांगते "सर्व जग आहे तसेच आहे, काहिच घडले नाही, हा सर्व एक भास होता.हे असे का घड्ले ?कारण क्षमा नाही, म्हणुन तु सर्वांचा नाश केलास ह्यासाठीच आधी क्षमा मिळवावी लागते आणि मगच सामर्थ्य."
उत्सवात आपण इथे शत्रुघ्नेश्वरीचे पुजन करणार आहोत,त्यावेळी आपल्याला हेच आईकडे मागायचे आहे की, "आई, तू आमच्या शत्रूंचा अशा रीतीने नाश कर कि त्यांच्यापासून आम्हाला त्रास होणार नाही आणि त्यांचे पण चांगले होईल.त्यांच्यापण जीवनात बदल घडुन येईल." सध्याच्या काळात हे शत्रुघ्नेश्वरीचे पुजन अत्यंत आवश्यक आहे.
जयन्ति मंगला काली ..अशी तिची लाखो नावे असली तरी ती सर्व तिच्या क्षमा ह्या एकाच नावाची अंश आहेत.ती क्षमाशील आहे हे जाणायला कधिच चुकू नका.ह्या आईचा खरा गुणधर्म क्षमा हाच आहे , हे सदॆव काळजात धारण करा. बापूंचा हा शब्द कधीच विसरु नका. ही आदीमाता म्हणजे Ultimate क्षमा आहे. ही अंशी आहे आणि बाकीचे तिच्या ह्या नामाचे अंश आहेत.
हरी ॐ
------------------------------ ------------------------------ -----------
सुचना: पुढील गुरुवारी संध्या.६-३० वाजता उपासना सुरु होईल. नंतर प्रत्येकाला वालुकेश्वरावर बेल पत्र अर्पण करुन दर्शन घेता येईल.(प्रत्येकाने येते वेळी बेल पत्र स्वत: घेवुन यायचे आहे.)
(Courtesy: http://www. manasamarthyadata.com/)
No comments:
Post a Comment