Latest News

Purushartha Ganga Aachaman



  • आचमन - १४४
जीवन संघर्षमयच आहे व म्हणूनच पराक्रम व पुरुषार्थ हा जीवनाचा गाभा आहे व यशाचा प्राण .

माझ्या मित्रांना पराक्रमी बनविणे व त्यांना यशस्वी झालेले पाहणे हा माझा छंद आहे ...
 

  • आचमन - १४७
काही जणांचे असे म्हणणे असते की जोपर्यंत मनुष्य पूर्ण शुद्ध होत नाही , तोपर्यंत परमात्मा त्याच्यावर कृपा करत नाही.

किती मूर्खपणाचे आहे हे तत्व. असे असते तर संपूर्ण विश्वात एखाद्याला तरी अल्प सुखही मिळू शकले असते का ? ह्या परमात्म्याला प्रेम करण्यासाठी कुठलेही कारण लागत नाही . परंतु " त्याचे " प्रेम " कृपा" म्हणून तुमच्या जीवनात आणण्यासाठी तुम्हाला फक्त प्रेमाने देवयान पंथावरच रहावे लागते .


  • आचमन - १५४
अशी कोणतीच रात्र नाही की जिचा अंत होऊन सूर्योदय होत नाही. मृत्यु सुद्धा फक्त एक रात्र आहे व तिच्याही शेवटी परत पुनर्जन्म आहेच .

तर मग संकटाची रात्र कधीच संपणार नाही असे का बरे मानता ?

मित्रांनो , तुमच्यावरील संकटाची व पराभवाची रात्र आणि भयाचा व दुःखाचा अंध:कार कितीही मोठा असला तरीही जर तुम्ही पुरुषार्थधामाच्या आश्रयाने राहत असाल तर तुम्हाला जराही विचलित होण्याचे कारण नाही .कारण प्रत्येक सूर्य पुरुषार्थधामातूनच उगवतो .
  • आचमन - ११९

श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराजास मानणारी माणसे ही माझ्या कुटुंबातीलच माणसे होत .पुरुषार्थ हे माझे रक्त असल्यामुळे प्रत्येक पुरुषार्थी हा माझा रक्ताचा नातेवाईक आहे .

आणि म्हणूनच जो पुरुषार्थी श्रद्धावान नाही , तो माझा नाही .


श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराज( तृतीय खंड -- आनंद साधना )

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.