Latest News

मर्यादा पुरुषार्थाचे नवविधा निर्धार


निर्धार -
राम माझा राजा आहे व मी राजरामाचा सैनिक आहे.
माझ्या ह्या राजाचा व त्याच्या अधिराजाचा (किंगमेकर) - दत्तगुरुंचा स्वभाव, संकल्प व बल यांची माहिती करुन घेणे व रामाला वनवासाला कोण व कसे व रामाला वनवासाला कोण व कसे पाठवतो हे जाणणे एवढाच माझा ज्ञानमार्ग.

निर्धार 2 -
रामाच्या वानारसैन्यातील उत्तम सैनिक बनण्यासाठी आवश्यक ती शिस्त, अनुशासन; देहाला (शरीर, प्राण, मन व बुद्धि) ह्यांना लावणे एवढाच माझा योगमार्ग.

निर्धार -
आपण रामाचे सैनिक आहोत हे जाणुन आपले कुठलेही काम उत्कृष्टरित्या कसे करावे हे शिकणे एवढाच माझा कर्ममार्ग.

निर्धार -
वानरसैनिकाने स्व:ताचे सामर्थ्य सातत्याने वाढवतच राहणे एवढाच माझा भक्तिमार्ग. (श्री हनुमंत, बिभीषण, भारत व शबरी ह्यांचे आचरण)

निर्धार -
रामाच्या वानार्सेनेट सामील झाल्यापासून लन्केपर्यन्तचा, सेनानायक हनुमंत व वानार्सेनेचा प्रवास म्हणजेच 'सुन्दरकाण्ड' मार्ग.
ह्या प्रवासाचे चिंतन व आभ्यास (study एंड प्रक्टिस) हाच दू:खनिवृत्तीचा व परमेश्वर प्राप्तीचा सर्वात श्रेष्ठ व सर्वात सोपा उपाय आहे.

निर्धार -
रावणाशी युद्ध माझे राम-लक्ष्मणच करणार.
मी फक्त त्यांचा उत्तम सैनिक बनून राहणार.

निर्धार -
रावणाशी लढणार्या माझ्या राम-लक्ष्मणांचे रक्षण हनुमन्तच करणार.
मी हनुमंताचेच मार्गदर्शन स्वीकारणार.

निर्धार -
रावणाचा नाश राम करतोच.  रामराज्य स्थापन होतेच.

निर्धार -
जो आज रामाचा वानर तोच पुढे कृष्णाचा गोप.
अर्थात निरंतर सख्य. कधीही न बुडणार्या गोकुळात सदैव निवास.

नवविधा निर्धारांचे पालन जसे जमेल तसे सतत करत रहाणे आवश्यक आहे. जो ह्यांचे पालन करण्यासाठी प्रयन्त्नशील असतो, तो त्याच्या प्रयत्नात पूर्ण यशस्वी नाही झाला,तरीही हा परमात्मा महाविष्णु त्या प्रयत्न्यकर्त्या मानवाला त्याच्या सर्व पापांची क्षमा करतो.

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.