Latest News

Sudip Information

  


भगवंतासमोर सुदीप प्रज्वलित करून ते त्याच्या चरणी अर्पण करणे हे अत्यंत पवित्र, उदात्त व श्रेयस्कर कर्म आहे. ग्रंथराजाहि सुस्पष्टपणे सांगतो कि परमात्म्यास नऊ प्रकारचे थेंब आवडतात, त्यातील एक प्रकार म्हणजे श्रीमद पुरुषार्थग्रंथराजासमीप प्रज्वलित केलेल्या दिपातील तेलाचे, तुपाचे व मेणाचे थेंब. जेव्हा आम्ही ग्रंथराजासमीप किंवा भगवंतासमीप किंवा सद्गुरुंसामीप सुदीप प्रज्वलित करतो, तेव्हा हा भगवंत आमच्या जीवनाच्या वाटेवर प्रकाश निर्माण करत राहतो व त्यामुळे जरी अडचण आली तरी ती पार करून जाण्याचा मार्ग मला सहजपणे दिसत राहतो. अडचणीच्या वेळी सुदीप अर्पण करण्या एवढेच महत्वाचे आहे, ते अडचण नसतानाही पुढील वाट प्रकाशित होत राहावी व अडचण येऊच नये यासाठी सातत्याने सुदीप अर्पण करावे.

                आपल्या कळत नकळत आपल्याकडून अनेक चुका किंवा प्रज्ञापराध घडत असतात. यामुळे आपल्या जीवनात अनेक बाधा निर्माण होतात किंवा संकटे येतात. याउलट अनेकवेळा आपल्या जीवनात अनेक महत्वाच्या व आनंदाच्या घटना घडतात. अशावेळी सद्गुरूना हक कशी मारायची किंवा त्याने केलेल्या कृपेसाठी त्याला धन्यवाद कसे द्यायचे ते कळत नाही. म्हणून सुखाच्या व दुखाच्या दोन्ही वेळेस सद्गुरुंबरोबर राहण्यासाठी हा अग्निनारायनाचे स्वरूप असणारा सुदीप आपल्यासाठी सहाय्यक आहे.

  अग्निनारायण एकच आहे पण भक्तांच्या भावानुसार तो वेगवेगळ्या सुदीप रूपांमध्ये कार्यकारी असतो.

सुदीप चे प्रकार:

१. इच्छापूर्ती सुदीप : हा सुदीप आपल्या उचित व पवित्र इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा झाल्यावर श्रद्धावान अर्पण करतात. पवित्र व मंगल इच्छापूर्तीसाठीकेल्या जाणाऱ्या प्रयासाना बळ मिळावे यासाठी मनोमन प्रार्थनाही करतात.

२. बाधानिवारक सुदीप : जीवनात अनेक प्रकारच्या बाधा आपल्या जीवनास क्लेशमय बनवतात. या बाधांचा आपल्या जीवनातील प्रभाव दूर करण्यासाठी व असा प्रभाव कमी झाल्यावर श्रद्धावान " बाधानिवारक सुदीप" अर्पण करतात.

३. पीडानाशक सुदीप : दुष्प्रारब्धामुले प्रापंचिक मानवास शारीरिक, मानसिक किंवा अन्य प्रकारच्या पीडा सतावत असतात. या पिडांमुळे त्या व्यक्तीचे तसेच त्याच्या कुटुंबाचे जीवन कष्टमय होते. या पिडांचा नाश व्हावा यासाठी, तसेच पीडा निवारण झाल्यावर "पीडानाशक सुदीप" श्रद्धावान अर्पण करतात.

४. दर्शन सुदीप : पवित्र मार्गावरून वाटचाल करण्याची इच्छा असूनही अनेक प्रकारच्या मोहांकडे मन ओढले गेल्याने मानवाला मर्यादामार्गावरचालणे कठीण होते. मनःसामार्थ्य प्राप्त व्हावे आणि देवयान पंथावरून समर्थपणे प्रवास करता यावा यासाठी "दर्शन सुदीप" श्रद्धावान अर्पण करतात.

५. वाढदिवस सुदीप : वाढदिवशी आणि मागील वर्षात घडलेल्या मंगल घटनांप्रीत्यर्थ, तसेच कठीण प्रसंगी सद्गुरुनी दिलेल्या आधारबाद्द्ल सद्गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांची कृपा आयुष्यभर अशीच लाभत राहावी हि प्रार्थना करण्यासाठी "जन्मदिन सुदीप" श्रद्धावान अर्पण करतात.

६. स्वेच्छासंकल्प सुदीप : आपणास आवडेल, झेपेल असा उचित संकल्प करून हा सुदीप श्रद्धावान अर्पण करतात. स्वतःच्या, आप्तांच्या, अपत्यांच्या क्षेमकुशलतेसाठी, विकासा साठी, व संरक्षणासाठी संकल्प करून श्रद्धावान प्रतिक स्वरुपात "स्वेच्छासंकल्पसुदीप" अर्पण करतात.

।। हरि ॐ।। ।। श्रीराम।। ।। अंबज्ञ ।।

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.