Latest News

सेंद्रिय शेती कोर्स

।। हरि ॐ ।।

              शहरातील बर्‍याच लोकांना हा प्रश्न पडतो की आम्ही सेंद्रिय शेती किंवा पशुपालन हे कोर्स करून काय करणार! श्रद्धावानहो टेरेस वर, बाल्कनी मध्ये, इमारतीच्या परिसरातील जागेत एवढेच का नुसत्या ग्रिल वर सुद्धा आपण घरात लागणार्‍या ताज्या भाज्या पिकवू शकतो. ह्या भाज्या सेंद्रिय पद्धतीने कशा पिकवायच्या तसेच घरच्या घरी सेंद्रिय खते कशी तयार करायची त्यातील प्रमुख म्हणजे गांडूळ खत. घर चाळीत असो की गगनचुंबी इमारतीत असो आपण किमान लागणार्‍या भाज्या घरीच पिकवू शकतो हे सेंद्रिय शेती कोर्स केल्यानंतर शिकता येतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः मेहनत घेऊन रोज खत पाणी घालून पिकलेलं एक वांग सुद्धा एवढं समाधान देऊन जातं की ते बाजारात विकत मिळू शकत नाही.

              पशुपालन हा पारंपारिक भारतीय जोड धंदा असूनही हयाकडे व्यवसाय म्हणून बघितला न जाता एक पवित्र कर्तव्य म्हणून शेतकरी बघत असतो. गोमातेच्या सेवेचं अनन्यसाधारण महत्व आपल्याला माहीतच आहे. अशा मातेची सेवा या कोर्स अंतर्गत करण्याची ही संधी आहे. सेंद्रिय शेती मध्ये पशुपालनाला खूप महत्व आहे किंबहुना पशुपालन आणि सेंद्रिय शेती ह्यांचा अनोन्यसंबद्ध आहे.

हे कोर्स केल्यानंतर आपण इतर लोकांना मार्गदर्शन करू शकतो विविध सेवा करून अनिरुद्धाज इंस्टीट्यूट ऑफ ग्रामविकास च्या मुख्य उद्देशाला म्हणजे शेतकर्‍यांच्या व ग्रामविकासाला हातभार लावू शकतो. हे कोर्स आपल्याला गोविद्यापीठम च्या पवित्र वातावरणात राहून शिकायची संधी मिळते. इथे शिक्षण घेताना पुरातन गुरुकुलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

चला तर मग आपणही हा कोर्स करून पवित्र कार्यात हातभार लावू. 
१). सेंद्रिय शेती कोर्स २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी असे एकूण ५ दिवस. ८०० रुपये (१५० रु प्रती दिवस + ५० रु पुस्तक)
२). पशुपालन कोर्स - ५ ते ८ फेब्रुवारी २०१६ असे एकूण 4 दिवस. ६५० रुपये (१५० रु प्रती दिवस + ५० रु पुस्तक)
(१५० रूपयात सकाळचा चहा-नाश्ता, दोनवेळाचे जेवण व राहण्याची सोय अंतर्भूत आहे)

तरी इच्छुक श्रद्धावानांनी जवळच्या उपासना केंद्रावर संपर्क साधावा तसेच दर गुरुवारी हरिगुरु ग्राम येथे गेट नं. ३ जवळ चौकशी करावी. अधिक माहितीसाठी विलाससिंह  मालवदे (8652182626) अथवा जयतसिंह वारेकर (7744843329) यांना संपर्क साधा

।। हरि ॐ।। ।। श्रीराम।। ।। अंबज्ञ ।।

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.