Latest News

ब्लडप्रेशर आणि बाहेरचे खाणे



2006 सालापासून 17 में हा जागतिक रक्तदाब दिन (World Hypertension Day) म्हणून साजरा केला जातो

2013 ते 2018 ह्या 5 वर्षांसाठी “Know Your Numbers” ही थीम राबविण्यात येत आहे. ह्याचा उद्देश आहे कि जगातील जास्तीतजास्त लोकांमध्ये हाइपरटेंशन बदल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत म्हणून हा जागतिक दिवस साजरा केला जातो 

 हाइपरटेंशन हे पुर्वी चाळीशी नंतर आढळायचे परंतु आता तर हे विशी तिशीच्या व्यक्तींमध्ये ही आढळू लागले आहे. लहानपणापासूनच सुरू झालेले हाइपरटेंशन काळजी घेतल्यास पुढे जाऊन प्रौढावस्थेत ही तापदायक ठरू शकते आणि त्याचा परिणाम म्हणून ह्रदय रोगामुळे होणार्या मृत्यू चा धोका निर्माण होऊ शकतो

जसजसे ब्लडप्रेशर वाढत जाते तसेतसे त्रासात ही भर पडत जाते. ज्यावेळी systolic ब्लडप्रेशर 120 – 139 mmHg असते आणि/किंवा diastolic ब्लडप्रेशर 80-89 mmHg असते त्या वेळी तेप्रीहाइपरटेंशनआहे असे संबोधले जाते 

 हाइपरटेंशन चे वर्गीकरण ठरवताना ब्लडप्रेशर हे दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा मोजणे गरजेचं असतं. तसंच ते वेगवेगळ्या प्रसंगी कमीतकमी एक आठवड्याच्या अंतराने मोजणे महत्वाचे आहे. सध्या जगभरात हाइपरटेंशन आणि प्रीहाइपरटेंशन ह्या दोन्हीचे प्रमाणात वाढ होत आहे.
साधारणतः 29.8% भारतीय व्यक्ती हाइपरटेंशन ने त्रस्त आहेत
जवळपास 3 पैकी 1 भारतीय व्यक्ती हाइपरटेंशन ने त्रस्त आहे.
ब्लडप्रेशर हे बर्याचदा asymptotic असल्याने बर्याच व्यक्तींमध्ये ब्लडप्रेशर हे accidentally निर्देशित झाले आहे आणि ह्या मुळेच वाढलेले ब्लडप्रेशर हे दिर्घकाळ निदर्शनास येत नाही.


बाहेरच्या खाण्यात कॅलरीजचे प्रणाम, सॅच्युरेटेङ फॅटचे प्रमाण आणि मीठाचे प्रमाण घरच्या जेवणाच्या तुलनेत जास्त आढळते

सिंगापुरच्या विद्यापीठातील 18 ते 40 ह्या वयोगटातील 501 विद्यार्थींचा समावेश एका प्रयोगात केला होता. ब्लडप्रेशर, BMI, आणि त्यांच्या जीवनशैली विषयी माहिती गोळा केली होती. जीवनशैलीत त्यांच्या शारिरीक व्यायाम, आणि बाहेरचे खाद्य पदार्थ आठवड्यातून किती वेळेस घेता ह्या विषयाची माहिती गोळा केली. ह्या सर्व माहिती चा प्रीहाइपरटेंशन हाइपरटेंशनशी काही संबंध आहे का ह्या विषयी चाचपणी केली. ह्या सर्व माहिती चे संख्या शास्त्रीय पृथक्करणानुसार
— 27.4% विद्यार्थींना प्रीहाइपरटेंशन असल्याचे निदर्शनास आले.
— 49% पुरुष 9% स्त्रीयाना प्रीहाइपरटेंशनचा त्रास आहे असे निष्पन्न झाले.
— 38% विद्यार्थी आठवड्यातून बारा वेळा खाण बाहेरून घेत होते असे ही आढळले.
प्रीहाइपरटेंशन हाइपरटेंशन असलेल्या विद्यार्थींचा BMI जास्त होता. त्यांची शारीरिक हलचाल ही कमी होती आणि ते स्मोकिंग करत होते.
— 6% विद्यार्थींचा प्रीहाइपरटेंशनचा धोका तर आठवड्यातून फक्त एकदाच बाहेरच खाणं घेतल्यावर वाढलेला आढळला.

ह्या प्रयोगावरून असंच दिसतंय की बाहेरचे खाणे जरा विचार पूर्वक करायला हवे नाही का ?

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.