Latest News

जीवन सुखी करण्याची अत्यंत सुंदर पद्धती म्हणजे " श्री श्वासम "

  • श्री श्वासम म्हणजे काय  ?
भारत वर्षातील सत्ययुगातील मानवाचे जीवन सुखी करण्याची अत्यंत सुंदर पद्धती म्हणजे श्री श्वासम !!
सत्यायुगाच्या शेवटी तिचा लोप होत गेला.त्रेता युगामध्ये ती अगदी मोजक्याच लोकांकडे उरली तर  कली युगा पर्यंत   तर ती कोणाकडे सुद्धा  राहिली नाही .
आज ही पद्धती आई जगदंबेच्या कृपेने व सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या कृपेने पुन्हा आपल्याकडे येत आहे .
  श्री श्वासम हे आई जगदंबेचे क्रियाशील श्वसन आहे जे मानवांच्या जीवनात शरीर,मन,प्राण,व प्रज्ञा ह्या सर्वांसाठी उत्साह निर्माण करून  त्यांचा अभ्युदय घडवून आणणारे आहे. म्हणुनच "श्री श्वासम" ही ह्या विश्वातील संपुर्ण millennium मधील सर्वांग सुंदर घटना आहे. 

"श्री श्वासम" ज्याला ज्याला हवा आहे त्या प्रत्येकापर्यंत , प्रत्येकाच्या कुवतीनुसार पोहोचावा म्हणुन ८ नोव्हेंबर २०१३ पासून सदगुरू श्री अनिरुद्धांनी  व्रताला (उपासनेला) प्रारंभ केला होता. ती साधना सद्गुरु बापुंनी यथावकाश पूर्ण केली आहे. 

"श्री श्वासम" थोडक्यात समजावून सांगताना सदगुरु बापू सांगतात की, "श्री श्वासम" म्हणजे " The Healing Power Of The Universe " .

मानवाला शरीर,मन,प्राण,व प्रज्ञा ह्या पातळीवर ज्याचे ज्याचे कमतरता आहे , जे जे काही त्याचे बिघडलेले आहे ते ते दुरुस्त करण्याची शक्ती म्हणजे  "श्री श्वासम" . 

  • श्रीश्वासम् काय देऊ शकत नाही..तर अपवित्र अन् हितनाशक...असं काहीच देणार नाही..तेवढं सोडुन सगळं काही हा श्रीश्वासम् देणार आहे.. ही 'सर्वोच्च भेट' आहे, हे अगदी कुठल्याही जन्मात तुमच्या बरोबर असणार आहे.
  • श्रीश्वासम् हा त्रिविक्रमच आहे. आयुष्याचं संपुर्णच्या संपुर्ण transformation (स्वरूप फिरविणे, वृत्ती बदलणे) श्रीश्वासम् करू शकतो. ही कामधेनू आहे. हिच ह्या श्रीश्वासम् च्या रुपाने आपल्याकडे आलेली आहे.. आणि ही कायम किरातरूद्र व माता शिवगंगागौरी बरोबर असते. ही आज आपल्या दारात ऊभी आहे..आपल्याला फक्त तिला हाकलायचं नाहीय!!
  • ह्या उत्सवाला येताना एक वस्त्र तुमच्या स्वत:च्या हाताने धुवुन घालायचं आहे..कमीत कमी एक दिवस तरी हे घालून या.. ह्या धुतवस्त्राचा खुप जवळचा संबंध आहे..संपुर्ण भुतकाळ धुवायचा आहे..त्याचं प्रतिक म्हणुन..एक वस्त्र तरी स्वत:च्या हाताने धुवा..
  • मुषक हा श्वासाचं प्रतिक आहे..हा घनप्राणाचा मुषक.. घन म्हणजे स्थुल.. आपल्या शरिरात स्थुल शक्ती फिरते.. मुषक बिळातुन आत जातो अन् बाहेर येतो (श्वासाचं प्रतिक) आपले श्वास आपण त्या गणपतीला अर्पण करणार आहोत.. ह्या उत्सवात प्रत्येकाला मुषक बनवता येईल.. मनापासुन भाग घ्यायचा.. एन्जॉय करायचं.
 
अवधुतचिंतन नंतर प्रसन्नोत्सव आणि आता श्रीश्वासम्.. आपण त्यात सहभागी झालो म्हणजे आपले जीवन सफल संपुर्ण होणारच आहे.. बाबांचं वाक्य आहे .. 

"शरण मज आला, आणि वाया गेला"..

फक्त विश्वास..आणि त्याचं वचन..देव कधीच बदलत नाही..कोणतंही युग असो.. तो जे म्हणतो, ते 'तो' करतोच.. त्याचा शब्द तो कधीच मोडत नाही.."आम्हाला स्वस्तिक विद्या येणारच"  - प.पू. सदगुरु अनिरुद्ध बापू .
"जय जगदंब जय दुर्गे

  • Pravachan of Sadguru Aniruddha Bapu on ShreeShwaasam - English Translation - 

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.