Latest News

आरोग्यरक्षक रंगपंचमी..

रंगपंचमी. आबालवृद्धांच्या उत्साहाला उधाण आणणारा सण .. रंगात न्हाऊन निघायला सर्वानाच आवडत असते. मात्र,रंगपंचमीत सध्या अनेक अनिष्ट प्रथा शिरल्या आहेत. एकमेकांवर फुगे मारण्यापासून घातक रंग वापरण्याची चढाओढ असते. त्यामुळे आपला सण साजरा करताना नागरिकांनी त्याचे पावित्र्यही जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच या रंगांपासून दुस-याचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
चकचकीत रसायनमिश्रित रंग शरीराला अपायकारकच ठरतात हे ध्यानी घेऊन रंगपंचमीला नैसर्गिक रंगच वापरण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.
नैसर्गिक रंगामुळे शरीरावर अपाय होत नाही. कपड्यावर देखील कोणताही परिणाम होत नाही.
  • राहावे सजग...  
- रंगपंचमी खेळण्यापूर्वी  अंगाला, केसाला व्हॅसिलीन, तेल लावावे. त्यामुळे रंगांचा थेट त्वचेशी संबंध येत नाही. व्हॅसिलिन, तेलामुळे शरीर स्वच्छ करताना मदत होते.
- गुलालासारखे नैसर्गिक रंग वापरण्यास प्रोत्साहित करा.
- डोळे, शरीर चुरचुरल्यास तातडीने स्वच्छ पाण्याने धुवावे, डॉक्‍टरांकडे जावे.
- घराजवळच गटा गटानेच रंगपंचमी खेळावी.

  • हे लक्षात ठेवा..
- गडद रासायनिक रंगांत मर्क्‍युरिक ऑक्‍साईड द्रव्य असण्याची शक्‍यता असते. असा रंग तोंडात गेल्यास छाती आणि फुफ्फुसावर या रंगांचा वाईट परिणाम होतो. असा रंग शरीरात गेल्यास घशाच्या त्रासाबरोबरच श्‍वसनक्रिया मंदावणे, किडनी निकामी होऊ शकते.
-  स्वस्तात मिळणारे रंग टाळावेत.

  • रासायनिक रंग नकोतच...
- छोट्या- छोट्या पाकिटातून रस्त्यावर किंवा दुकानात मिळणारे रंग टाळावेत. यात कृत्रिम रंग व घातक धातूंचा उपयोग केलेला असतो.
- या रंगांच्या वापरामुळे डोळे सुजणे, जळजळ, तसेच अंधत्व येण्याची शक्‍यता असते.
- त्वचेचे आजार, पुरळ उठणे, चट्टे उठणे, भाजल्यासारखी जखम होणे, रंग घशात गेल्यास आतील नाजूक त्वचेला जखमा होऊ शकतात व जंतूंचा प्रादुर्भाव होतो. हातावर किंवा शरीरावर चिकटलेला रासायनिक रंग सहज धुतला जात नाही. त्याचा त्वचेवर दुष्परिणाम होतो.
- हा रंग पाण्यात विरघळल्यानंतर पाणी प्रदूषण आणि भूजल प्रदूषणही होते.  

  • नैसर्गिक रंग आरोग्यदायीच...  
  1. लाल रंग - जास्वंद, पळस किंवा गुलाब फुले कुटून लगदा करून पाण्यात मिसळल्यास आकर्षक लाल रंग तयार होतो.
  2. हिरवा रंग - गहू, ज्वारी, पालक किंवा कोणत्याही हिरव्या पानांचा कुटून केलेला लगदा पाण्यात मिसळल्यास आकर्षक हिरवा रंग तयार होतो. 
  3. पिवळा रंग - बेलफळाच्या साली पाण्यात टाकून उकळल्यास पिवळा रंग तयार होतो. झेंडूची फुले व हळदीपासून पिवळा रंग तयार करता येतो. 
  4. जांभळा रंग - बीटपासून जांभळा रंग तयार होतो. बीट पाण्यात टाकून ढवळले की हा रंग तयार होतो. 
  5. काळा रंग - आवळ्याचा किस लोखंडी तव्यावर उकळत्या पाण्यात टाकून गडद काळा रंग बनविता येतो. 
  6. नारिंगी रंग - बेलफळाचा गर पाण्यात टाकून उकळल्यास नारिंगी रंग तयार होतो. गर अधिक वेळ उकळल्यास हा रंग तयार होतो. याचा वार्निशसारखा देखील वापर करता येतो.
 
एकमेकांवर रंग उधळून परस्परांमधील प्रेम वृद्धींगत करण्याचा हा दिवस. या वेळी वापरण्यात येणारे रंग हे नैसर्गिक आणि सात्त्विक असावेत, असे शास्त्र सांगते. सध्या मात्र अत्यल्प दरात रासायनिक आणि घातक रंग बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने लोक त्यालाच पसंती देऊ लागले आहेत - See more at: http://www.sanatan.org/mr/a/575.html#sthash.15mHdudl.dpuf

एकमेकांवर रंग उधळून परस्परांमधील प्रेम वृद्धींगत करण्याचा हा दिवस. या वेळी वापरण्यात येणारे रंग हे नैसर्गिक आणि सात्त्विक असावेत, असे शास्त्र सांगते. सध्या मात्र अत्यल्प दरात रासायनिक आणि घातक रंग बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने लोक त्यालाच पसंती देऊ लागले आहेत; - See more at: http://www.sanatan.org/mr/a/575.html#sthash.15mHdudl.dpuf

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.