Latest News

Thursday Discourse dated 28 April 2011


सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे प्रवचन (२८-०४-२०११) 
हरी ॐ  
जयन्ति मंगला काली.ह्या ११ नावांचा जयजयकार करत आपण पुढे गेलो. आज आपण आदि शंकराचर्यांनी लिहिलेले श्री देवी अपराध क्षमापन स्तोत्र बघणार आहोत . शंकराचार्यांचे ज्ञान इतके महान होते की त्यांना त्रैलोक्य संचारण सिद्धि होती.त्यांनी आदिमातेला ब्रम्हत्रिपुरसुंदरी ह्या नावाने आळवले.त्यांच्या श्री देवी अपराध क्षमापन स्तोत्रातुन आदिमातेची खरीखुरी प्रतिमा उभी राहते. अगदी clean and clear, cut and Precise. 
" न मत्रं  न यत्रं तदपि च न जाने स्तुतिमहो, 
न च आव्हानं ध्यानं तदपि न च जाने स्तुति कथा "
ह्या स्तोत्रातुन आचार्य सांगतात , मी मंत्र, यंत्र जाणत नाही , तुझी गद्यात स्तुति कशी करायची हेही ज्ञान मला नाही , तुझे आवाहन कसे करायचे हे मला दुरान्वयेदेखील माहीत नाही. ध्यानाबद्दल तर मी अज्ञानीच आहे. 
न जाने मुद्रा: ते तदपि च न जाने विलपनं ,
परं जाने मात: त्वद-अनुसरणं क्लेश हरणम ॥
 अगं आई, तुझ्या मुद्रांचे अर्थही मला कळत नाहीत, तु रागवलीस की आनंदी आहेस हे ही मला कळत नाही, एव्हढा मी अडाणी आहे. तुझ्या अठरा हातातील अठरा शस्त्रे तु कधी वापरतेस तेच मला कळत नाही.आई तुझ्याविना मला रडताही येत नाही गं, लहान बाळ जसे आई आई करुन रडते ते विरहाचे रडणेही मला जमत नाही गं ... एव्हढा मी बावळट आहे. 
           परंतु एक मात्र मी नक्कीच जाणतो की तुझ्या मागोमाग (त्वद-अनुसरणं) येण्याने सर्व प्रकारचे क्लेशांचा नाश होतो. आदिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक , दानव, राक्षस  असे कुठल्याही प्रकारचे क्लेश असुच शकत नाहीत. बाळाला आईने दुर केले तरी ते तिचाच पदर धरुन राहते, जेव्हा ते आईचा हात सोडुन जाते तेव्हा मग कुठेतरी धडपडते, त्यामुळे क्लेश उत्पन्न होतो आईचा विरह जाणवतो आणि मग ते बाळ परत आई आई करत आईच्या मागे मागे जाते. 
तदेतत क्षन्तव्य  जननि सकलोध्दाराणि शिवे ,
कुपुत्रो जायेत क्विचिदपि कुमाता न भवति ॥
"सकलोध्दाराणि" मराठीत "सगळे" ह्या अर्थाने सकल शब्द आपण वापरतो पण मुळ सकल शब्द खुप महान आहे. सगळ्यांचाच( जो जो उध्दार करुन घेऊ इच्छितो त्याचा) उध्दार करणारी.. किती अर्थ आहे ह्या षोड्शी मंत्रामध्ये !! मनुष्याच्या त्रिविध देहाचा आधीच्या जन्मातील असलेल्या त्रिविध देहाच्या संबंधामुळे (बीजामुळे- पूर्व जन्मातील कनेक्शन ) क्लेश उत्पन्न होतात. सकल हे त्रिमितीवरचे आहे, हे कुठलेही क्लेश कारक संबंध ऊरु नयेत म्हणुन ही सकलोध्दाराणि आधीच्या जन्माशी जोडणारे बीज मुळापासुन उखडुन टाकते. 

अश्या ह्या मंत्रमय स्तोत्राची CD  माझ्या(प.पू.बापू) आवाजात सर्वांना ऐकायला मिळणार आहे. परंतु ह्या स्तोत्राचा रोज अमुक वेळा म्हणेन असा कुठलाही नेम करु नका, आणि मला(प.पू.बापू) अडचणीत आणु नका.ह्या स्तोत्राचा मराठीत अर्थ तुम्ही वाचु शकता.ह्याची एक विशिष्ट रचना आहे,त्यामुळे ह्याचा उच्चार विशिष्ट प्रकारेच करावा लागतो. जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे आणि मी(प.पू.बापू) तुम्हांला कधीच चुकिचा सल्ला देऊ शकत नाही. सद्गुरुतत्व व आदिमाता हे पैशाने विकत घेता येणारे नसतात.त्यामुळे कुठल्याही संस्क्रुत पंडिताला पैसे देउन हे स्तोत्र म्हणवुन घेवु नका. 
ही सकलोध्दाराणि म्हणजे सकल - प्रत्येक गोष्टीचा उद्धार करते.मनुष्याच्या समग्रत्वाचा उद्धार करते म्हणजेच तुमच्याकडे जी गोष्ट ज्या स्थितीत आहे त्या स्थितीपासुन, त्या stage पासुन bestest stage पर्यंत तुम्हांला घेऊन जाते. 
विधे: अज्ञानेन द्रविणविरहेण-आलसतया
विधेय- अशक्यत्वात  तव चरणयो: या च्युति: अभूत ॥
आचार्य सांगतात, मला पुजेचा विधीही येत नाही, माझ्याकडे द्रव्याचा अभाव आहे ,पण खरं गोष्ट आई ही आहे की, मी ह्या सबबी देतो कारण मी स्वभावाने आळशी आहे. 
तुझ्या मागे "आई,आई" म्हणत येण्याचा पण मी आळस करतो.त्यामुळे आई माझ्याकडुन पुजासुद्धा नीट होत नाही.ह्या सगळ्या कारणांमुळे मी तुझ्या चरणांपासुन दुर झालो आहे आणि त्याला कारण एकच माझा आळस.

आईचा मार्ग फक्त परशुराम दाखवतो.पहिली मानवी माता रेणुका आई हे त्याच आदिमातेचे रुप. म्हणजेच सगळ्या जगाला आदिमातेच्या उपासनेचा मार्ग दाखवतो तो परशुरामच. मात्रुवात्सल्यविंदानम मध्ये आपण बघतो परशुरामास माता रेणुकेच्या स्म्रुती आठवताना त्या आदिमातेची आठवण येते मग त्याच ओढीने परशुराम गुरुदत्तात्रेयांकडे जातो व आदिमातेचे आख्यान ऐकतो. आईच्यामागे जाण्याचा आळस करु नका. पुढे आचार्य सांगतात, आणखीन काय करु ? मला क्षमा कर गं आई .कुपुत्र असणे सहज शक्य आहे पण आई तु कधिच कुमाता नव्हतीस व नसतेस.
हे आई, प्रुथ्वीवर तुझे साधेसुधे तुझे भक्त असे तुझे पुत्र खुप असतील, परंतु त्यामध्ये अतिशय अवखळ असा मी एक आहे.तुझे सगळे पुत्र चांगले आहेत, मी एकटाच वाईट आहे.ह्यातुन शंकराचार्य सांगतात आधी स्वत:कडे बघा.ती आई अतिशय क्षमाशील असल्यामुळे ती माझ्या पुढे पुढे चालतच असते.

मी (प.पू.बापू) तुमच्या पाठीशी कायम उभा राहीन, हा माझा शब्द जसा चांगल्या क्षणांसाठी आहे तसाच वाईट वेळेसाठी देखील आहे. मला(प.पू.बापू) फक्त आईच म्हणता येते.
तुम्ही आयुष्यात कितिही चुका करा पण ह्या आदिमातेचे चरण कधिही सोडु नका. माता रेणुकेचा विरह होताना त्या परशुरामाचा शोक लक्षात घ्या . स्वत:च्या शोकात बुडणारे अनेक असतात मात्र त्यातुन सगळ्या विश्वाचा उध्दार करणारा तो एकच परशुराम , ज्याने आपल्याला मातृवात्सल्यविंदानम दिले. 
"मदीय: अयं त्याग: समुचितं इदं नो तव शिवे ,
कुपुत्रो जायेत क्विचिदपि कुमाता न भवति ॥"

   हा जो माझ्याकडुन तुझा त्याग केला गेला आहे हे उचित नाही गं आई...मग कर ना काहितरी. मला जवळ तुच घे. मी वाईट आहे हे जाणुन तु मला जवळ घे . आईवार प्रेम कसे करायचे हे शंकराचार्य इथे शिकवतात. हाक घालायची ना तर ती ह्या आईलाच. ज्या क्षणी तुम्ही तिला प्रेमाने हाक मारता त्या क्षणी ती तुमची मोठी आई झालेलीच असते. म्हणुन प्रेमाने तिला हाक मारा,तिचे कुठलेही नाव घ्या. 
जगन्मात: मात: तव चरण सेवा न रचिता,
न वा दत्तं देवि द्रविणं अपि भूय: तव मया ।
आई तुझ्या चरणांची सेवा मी कधिच केलेली नाही ,तुझ्यासाठी एक कवडीसुद्धा खर्च केलेली नाही.तरीदेखील माझ्यासारख्या अधमावार तु अनुपम स्नेह करतेस ह्याचे कारण एकच "कुपुत्रो जायेत क्विचिदपि कुमाता न भवति"शरीराने ,मनाने , बुद्धीने कधीही तुझी भक्ती, सेवा, दान केले नाही तरीही तु माझ्यावर निरुपम प्रेम करतेस कारण मी कितीही कुपुत्र असलो तरी तु कुमाता नाही आहेस. 

तव अपर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं 
जन: को जानीते जननि जपनीयं जपविधौ ॥
हे अपर्णे आई, तुझ्या मंत्रातले एक अक्षर जरी कानावर पडले ना तरी अगदी दरिद्री मनुष्याकडे सुद्धा करोडो मुद्रा येऊन थडकतात.  मग जे कायम तुझा जप करत असतात त्यांना काय मिळत असेल आणि ते कोण जाणू शकेल !!हे कोणीही जाणुच शकत नाही. जिथे परशुराम नाही जाणू शकला तिथे तुम्ही काय जाणणार ? 
आठवा पहिला अध्याय माता रेणुकेच्या भेटीनंतर आई एका निमिषात परशुरामास गंधमादन पर्वताकडे नेते. अनेक योजनांचे अंतर एका क्षणात कमी होते. अशी ही प्रेमळ आई. म्हणुन अनसुयेला पाहिल्यावर दत्तात्रेय व परशुराम दोघेही जप करतात ,
" ॐ नमश्चण्डिकायै  ,वात्सल्यचंण्डिकायै  नम:"ह्या आईचे वात्सल्य परशुरामाने अनुभवले म्हणुन तोच सर्वांना सांगु शकतो .
आपत्सु मग्न: स्मरणं त्वदियं , 
करोमि दुर्गे करुणार्णवेशि ,
 नैतत शठत्वं मम भावयेथा:
क्षुधा -त्रुषार्ता जननीं स्मरन्ति"
शंकराचार्य सांगतात , मी शठ आहे (शठ म्हणजे कपटी  , लबाड ) हे मला मान्य आहे, पण आई तु हे मान्य करु नकोस, तु मला शठ मानु नकोस. भुक आणि तहान लागली की मगच बाळाला आईची आठवण येते, एव्हढेच मला समजते. म्हणुन मी सदैव तुझा बाळच आहे. 
आदि शंकराचार्य आम्हांला सांगतात की, आईकडे बाळासारखा लाडिवाळ हटट करा.तिचे आई म्हणून मातृत्व अनुभवा. तिच्यापुढे नेहमीच शरणागत बाळ रहा. कुठलेही तर्क- कुतर्क करू नका . आई म्हणून ती शक्ती रूपाने आहेच पण तिला शक्ती  न म्हणता आईच म्हणा .तिच्या पुत्रांच्या शत्रूंची आई कधीच नसते तिथे ती दुर्गा रूपानेच असते ,त्या शत्रूंचा नाश करण्यासाठी  असते. 
" अपराध परंपरा पर्ण न ही माता समुपेक्षेते सुतं .."
हे जगदंबे, तुझी माझ्यावर कृपा आहेच. आणि माझी अपराध परंपरा चालू आहेच . 
लक्षात ठेवा तुम्ही जी हाक आपल्या सद्गुरूला मारता तेव्हा सदुगुरू त्या आईला हाक मारत असतो.. तुमचा  एकमेव तारणहार तो परमात्माच असतो जो तुमची हाक आदिमाते पर्यंत  पोचवतो .म्हणून त्या परमात्म्याची तिच्या पुत्राची कधीच उपेक्षा करू नका.
मत्सम: पापी नास्ति.." 
माझ्यासारखा दुसरा पापी नाही व तुझ्यासारखी कोणी क्षमाशील नाही, हे जाणून आई तुला जे योग्य वाटेल तेच तू कर . "
त्या आदिमातेकडे व परमात्म्याकडे sorry म्हणायची गरज नसते व thanks देखील म्हणायची गरज नसते. फक्त कायम thankful असावे लागते. 

1 comment:

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.