Latest News

Ram Navami Utsav 2013

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे रामनवमीचा उत्सव शुक्रवार दिनांक १९ एप्रिल २०१३ रोजी श्री हरिगुरुग्राम, वांद्रे (पुर्व) येथे सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत साजरा केला जाणार आहे.

  • प्रतिवर्षाप्रमाणे श्री साईराम सहस्त्रयज्ञ संपन्न होईल. या यज्ञामध्ये श्रध्दावानांना ’क्षेमकल्याण’ व ’आपत्तीनिवारक’ अशा दोन प्रकारच्या समिधा अर्पण करता येतील. श्री साईराम सहस्त्रयज्ञामध्ये हवन केल्याने गतजन्मीच्या पापांचे भर्जन होते.
  • दुपारी १२.०० वाजता ’श्री रामजन्म’ पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात येईल.
  • श्री साईनाथांच्या तीन वस्तू म्हणजेच जपमाळ, त्रिशुल व शाळीग्राम यांचे पूजन व त्यासमोर ’घोरकष्टोधरण’ स्तोत्राचे अखंड पठण सुरु होईल.
  • तसेच, श्री साईनाथांच्या ’श्री सदाशिव मुर्तीस’ सतत राजोपचारे श्री साईनाथ महिन्माभिषेक’ अभिषेक चालू राहिल. श्री साईनाथ महिन्माभिषेक सकल कुटूंब स्वास्थ व अपत्यांचे आरोग्य ह्यासाठी फलप्रद आहे.
  • गतवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुध्द बापूंच्या हस्तस्पार्शाने पावन झालेला ’श्री अनिरुध्द हंडीप्रसादाचा लाभ’ प्रत्येक भक्त घेऊ शकेल.
  • तसेच ’श्री साईनाथांचा तळीभरण’ विधी संपन्न होईल. याचे वैशिष्ट असे की तळीभरण विधीतील सहभाग व प्रसाद सर्व नऊ प्रकारच्या प्रसादांमध्ये श्रेष्ठ मानला जातो.
  • याच बरोबर, ’ॐ रामाय रामभद्राय रामचंद्राय नम:’ हा अखंड जप चालू असेल.
  • तसेच ’श्री साईसत्‌चरित्र ग्रंथातील अध्यायाचे पठण’ संपूर्ण दिवस करण्यात येईल.
  • रात्री महाआरती व ’साईराम सहस्त्रयज्ञ पूर्णाहुती’ होऊन या सोहळ्याची सांगता होईल.

वरील सर्व विधींमध्ये प्रत्येक भक्त वैयक्तिकरित्या सहभागी होऊ शकेल याची सर्वांनी नोंद घ्यावी

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.