Latest News

अश्विन नवरात्री पूजन व होम

  • अश्विन नवरात्री घटस्थापना :
१ चौरंग किंवा पाट,पाटावर पिवळे वस्त्र,त्यावर थोडेसे तांदूळ किंवा गहू,त्यावर तांब्याचा कलश,कलशात तांदूळ किंवा गहू भरणे त्यावर तांब्याचे ताम्हण व ताम्हणात अक्षता ठेवणे त्यावर आपल्या प.पु.नंदाईचा फोटो ठेवणे.रोज दिपारती करणे.

" ॐ आल्हादिन्ये नंदाए संधीने नमो नमः ||"
हा जप १०८ वेळा करून रोज चिदानंदा उपासना करणे.
 

हे गहू / तांदूळ नंतर अन्नपूर्णा प्रसादम ला द्यावेत .नवरात्रीत आपण श्री राम रसायन तसेच मातृवात्सल्य विदानम ग्रंथाचे पठण करू शकतो.
----------------------------------------------------------------------------
                             --------ललिता पंचमी---------
सुर्योदया पूर्वी सदगुरुंचा फोटो घरामध्ये सर्वत्र फिरवून फोटोंच्या ठिकाणीच ठेवावा.
पुरणाचा ( मुगाच्या डाळीचे पुरण ) नैवेद्य अर्पण करावा.
प.पु.बापूंचा फोटो फिरवताना खालील जप करावा.
"ॐ श्रेष्ठा स्मृतीच शुद्ध सर्व विद्या नमो नमः
शुभकार्या अधिष्ठात्री सीता फलदायिनी
नित्यस्वरूपा नित्यशुद्धा इच्छा कृतीवर्धिनी "

  • त्यानंतरची प्रार्थना-  " हे माते तू सर्व जगताची तारिणी आहेस.तू इच्छापूर्तीवर्धिनी आहेस.तू थोडेतरी स्मृती मला दे.ती मिळालेली स्मृती मी माझ्या जीवनात वापरेन."
ह्यावेळी प.पू.बापूंचा जप (२४/५४/१०८ वेळा) करावा. --------------------------------------------------------------------   
                           ------ अष्टमीचा होम -------
साहित्य : तांदूळ , ताम्हण , कापूर
कृती :
सूर्यास्तानंतर तांदुळाने स्वस्तिक काढून त्यावर ताम्हण ठेवणे ,
ताम्हणात २ मुठभर तांदूळ पसरावेत .
त्यावर मग मधोमध एक व ८ बाजूला ८ असे नऊ कापूर वड्या ठेवून , पहिल्या मधल्या कापराने अग्नी प्रज्वलित करावा.
प्रार्थना :
" सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ."
जप : 

१ .ॐ श्री आदिमाता नमोस्तुते
2. ॐ श्री अनिरुद्धाय नमो नमः
3. ॐ श्री आल्हादिन्ये नंदाये संधीन्ये नमो नमः
4. ॐ श्री विश्वम्भरा तुळजा गुणसारिता नमो नमः .
जपसंख्या : २७ , ५४ , १०८ .

प्रत्येक वेळी एक कापूर ताम्हणाच्या मधोमध अग्नीत टाकणे . जप संपेपर्यंत अग्नी प्रज्वलित ठेवावा.जप झाल्या नंतर साष्टांग नमस्कार घालावा .मग ताम्हण उचलून बाजूला करून स्वस्तिक काढलेले तांदूळ गोळा करून त्या ताम्हणात ठेवणे .
हे तांदूळ दसर्यापर्यंत देव्हार्यात सफेद कपड्यात बांधून ठेवणे व दसर्याच्या दिवशी विसर्जन करणे .

1 comment:

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.