Latest News

Thursday Discourse (31-03-2011)


These are the important points summarized from Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu's discourse delivered on Thursday,31st March 2011 at Shree Harigurugraam. 

हरि ॐ
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन श्री हरी गुरु ग्राम ( ३१-०३-२०११) 
आपण धात्री बघितली, आता बघायची आहे स्वाहा. हा शब्द सर्वांना अतिशय परिचीत आहे. कुठेही यज्ञ चालू  असला तर त्यातले बाकी काही नाही कळले तरी स्वाहा व नम: हे शब्द प्रत्येकाला  कळतातच. 
मातृवात्सल्यविंदानम मध्ये आपण वाचतो कि अत्री ऋषींनी यज्ञाचे  science  develop केले .त्यात यज्ञ  कुठले करायचे आणि कुठले करायचे नाही ह्या विषयी सांगितले आहे. अनसुयेने ह्या यज्ञाच्या शास्त्रालाच  आशिर्वाद देवुन सांगितले की, मी स्वाहा रुपाने यज्ञ कर्त्याच्या बाजुला नेहमी उभी असेन . 
स्वाहा म्हणजे कुठलीही क्रिया नव्हे तर स्वाहा म्हणजे साक्षात असं चैतन्य की जर आपल्याला मनापासुन आपल्या देवाला ठराविक गोष्ट  अर्पण करायची  आहे आणि ती आपल्याकडे  नाही आहे तरी देखील ते अर्पण होऊ शकते.समजा देवाला ५ मेणबत्त्या वाहायच्या आहेत, किंवा ५  पुण्यकर्मे वाहायची आहेत पण ती तुमच्याकडॆ नाहीत, तरीही परमेश्वराने तुम्हाला दिलेले चैतन्य स्वाहा शब्दाचा उच्चार करुन परमेश्वराचे स्मरण करुन अर्पण करायचे, की आपोआप ती  गोष्ट अर्पण केली जाते. 
म्हणजेच जर शून्य ग्रम  चैतन्य माझ्याकडे आहे आणि मला १० ग्रम द्यायची इच्छा आहे तर मनामध्ये त्या मुर्तीचे ध्यान करुन स्वाहा म्हटले तर तेव्हा ते १० ग्रम अर्पण केले जाते. आणि त्या व्यक्तीकडे नसतानाही  दिले गेले तरी त्याचे त्या व्यक्तीवर ऋण राहत नाही. 
हे चैतन्य म्हणजे काय ? तर रसरशीतपणा, प्रेममय जीवन. असा रसरशीतपणा, प्रेममयपणा हा तुमच्यातला परमेश्वराला सर्वात आवडणारा गुण . परमेश्वर स्वत: चैतन्यमय असल्याने  त्याला ओढ त्या चैतन्याचीच. 
चैतन्यमय जीवन म्हणजे आपण जगतो ते आयुष्य नव्हे. परमेश्वराला आवडणारे चैतन्यमय जीवन म्हणजे मनुष्य शरीर, मन व बुद्धी ह्यांची अभिव्यक्ती करायला स्वतंत्र असला पाहिजे.असे जीवन जेव्हा मी  परमात्म्याला अर्पण करतो तेव्हा ते त्याला जास्त आवडते. 
सर्व सामान्य मानव म्हणुन आपल्याकडे ही ताकद असते का? आतापर्यंत रसरशीतपणा, चैतन्यता, प्रेममयता हे सगळॆ किती काळ माझ्या संपुर्ण जीवनात होते किंवा असते? 
जीवनात प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपण कोणाशी तरी तुलना करीत घालवत असल्याने त्यात रुक्षता येते. आणि परमात्म्याला ओढ असते ती स्निग्धतेची. ..

रसरशीतपणा, प्रेममयता, आनंद हे सगळॆ ज्यात आहे असे क्षण परमेश्वराला अर्पण करता आले पहिजेत . 
आपण १०० वेळा देवा तुला अर्पण करतो असे  म्हटले तरी त्यात भाव असतो का? एक महत्त्वाची गोष्ट लक्षात  ठेवा कि, काही मागण्यासाठी स्वाहा म्हणायचे नसते. स्वाहा हा उच्चार फकत देण्यासाठी असतो. स्वाहाचा खरा अर्थ समर्पित करणे. पण हे सामान्य मानवाला जमत नाही. म्हणूनच  सद्गुरु तत्वावरील पुर्ण श्रद्धेने जेव्हा सामान्य मनुष्य आपल्याकडील गोष्ट देवाला अर्पण करतो तेव्हा त्याचा तो नैवेद्य आपोआप आदिमाता स्विकारते . 
प्रत्येक वेळी स्वाहाचा उच्चार करताना आधीच्या २४ तासात तुम्ही जेव्हढा काळ चुकीचे वागला नाहीत, कुठलेही पाप केले नाही. षड्ररिपूंच्या विकारांपासुन जेव्हढा काळ तुम्ही पूर्णपणे लांब राहिलात  त्या काळाएव्हढे चैतन्य वाहीले जाते.

यज्ञात प्रथम स्वाहा म्हणताना त्याआधीच्या २४ तासात जेव्हढी तुमची श्रद्धा त्याच्या दुप्पट प्रमाणात  नेहमी  चैतन्य वाहीले जाते.दुसर्यांदा स्वाहा म्हणताना परत त्याआधीच्या २४ तासात जेव्हढी श्रद्धा त्याच्या दुप्पट प्रमाणात चैतन्य वाहीले जाते. असे प्रत्येक स्वाहाकाराच्या वेळी तुम्ही वाहीलेले चैतन्य दुप्पट्टीने वाढत जाते. ह्याचाच अर्थ अमर्याद प्रमाणात चैतन्य वाढत जाते. म्हणजेच तुम्ही रसरशीत प्रेममय नसुनही स्वाहा उच्चारातुन तुम्ही वाहीलेले चैतन्य आदिमाता दुप्पट्टीने प्रेमाने स्विकारते, असा हा स्वाहाकार. ही सोय  दत्तात्रेयांनी आणि आदिमातेने मानवासाठी का केली? ह्याचे कारण आपल्याला माहिती पाहीजे. 
यज्ञ म्हणजे काय ?तर आपला स्वत:चा देह हाच मुळ यज्ञ आहे .तुमचा भौतिक,प्राणमय व मनोमय देह हाच त्रिकुंडात्मक यज्ञ असतो. ह्या देहामध्ये जो यज्ञ चालु आहे ,त्याचा अधिष्टाता कोण?
त्याचा अधिष्टाता  आहे, वैश्वानर म्हणजेच दिव्य व पवित्र अग्नीवैश्वानर म्हणजेच मानवासाठी उत्पन्न केलेले परमात्म्याचे स्वरुप .प्रत्येक मनुष्य जन्माला येताना ह्या वैश्वानराला घेवुन येतो व प्राण सोडताना हा वैश्वानर देहातुन बाहेर पडतो.तोच ह्या यज्ञामधला अग्नी पण बनतो. हा यज्ञ अखंड्पणे  दिवस रात्र चालु असतो आणि ह्याचे फळ मिळते यजमानाला म्हणजेच तुम्हालाच. यजमानाला दक्षिणा द्यावी लागते हि दक्षिणा कुठली द्या्यची तर चैतन्याची.  हे यज्ञ कुंड आपणच शरीर,मन, प्राण ह्यांच्या प्रद्न्यापराधामुळे, आपल्या कुकर्मामुळे विध्वंस करतो.यज्ञात बाधा आणत असतो.

श्री क्रुष्णाने गीतेत सांगितले आहे की, 
" अहं वैश्‍वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः । प्राणापानसमायुक्त: पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ "
'सर्व प्रकारचे अन्न पचविण्याचे काम वैश्‍वानर अग्नी बनून मी स्वतः करतो. म्हणजे परमात्मा स्वत: माझ्या देहातील अग्नीचा अधिष्टाता आहे. तरी आपण काय करतो हा यज्ञ कुंड खराब करण्याचे काम करतो. 
आम्ही आमचा देहकुंड, प्राण, मन वारंवार भ्रष्ट करत असतो.त्याला उपाय म्हणजेच हा स्वाहाकार. अनसुया स्वरुप हे मातृ रुप आहे, हीच मुळ चैतन्यमय शक्ती आहे.म्हणुन आपल्याकडॆ चैतन्य नसतानाही ती गोड मानुन घेते. पण त्यासाठी अट एकच सद्गुरु तत्वावर पुर्ण श्रद्धा पाहीजे. 
म्हणून स्वाहाकार शब्द कानावर पडता क्षणीच इतर सर्व गोष्टी विसरुन "देवाचिये द्वारी उभा क्षण भरी" हाच भाव असायला हवा. तुम्ही म्हणाल आम्ही देवाच्या दारात तासन् तास उभे असतो.. पण आपण कसे देवाच्या दारात उभे असतो तर जोपर्यंत आपले काम होत नाही तोपर्यंत देवाकडॆ धावत बसायचे आणि काम झाल्यावर विसरुन जायचे,झोपेचे सोंग घ्यायचे. 
उभा क्षणभरी म्हणजे पुर्णपणे फक्त त्याचे होणे. असे आपण देवाच्या दारात उभे असतो का? बघा स्वाहा शब्द म्हणायला जास्तीत जास्त १ सेकंद लागतो.असा हा १ सेकंद तरी आपल्याला देवासमोर उभे राहता येते का?

" देवाचिये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या." 
असे क्षणभर उभे राहिल्यावर आपोआप चारी मुक्ती मिळतील.ह्या मुक्ती कुठल्या ? नवरा म्हणेल बायकोपासुन मुक्ती मिळेल, विद्यार्थी म्हणेल शाळेपासुन मुक्ती मिळेल. नोकर म्हणेल मालकापासुन मुक्ती मिळेल. ह्या अश्या मुक्ती नव्हेत. तर ह्या चार मुक्ती म्हणजे चार पाशांपासुन मुक्ती. जे चार पाश मनुष्याला चांगल्या कार्यापासुन अडवतात अश्या पाशांपासुन मुकती. हे पाश कोणते आहेत ? ते म्हणजे-

१) देवाच्या समोर तुलना करणे.
देवाच्या प्रांगणात उभे राहुन कोणाशीही तुलना करु नका. माझी भक्ती किंवा सेवा दुसर्यापेक्शा जास्त असे कधिही म्हणु नका. बापु दुसर्याकडॆ बघुन हसले, माझ्याकडॆ नाही, दुसर्याला हात दाखवला,मला नाही दाखवला असे तुम्ही म्हणता तेव्हा तुम्हाला काय माहीत बापु कश्यासाठी दुसर्याकडॆ बघुन हसले किंवा हात दाखवला.. ते बापूलाच माहित. त्यामुळे तुम्ही तर्क करत बसु नका. एक लक्षात  ठेवा तुमच्या विचारांवर बापुचा हेतु ठरत नाही.जर अर्थ काढायचेच असतील तर ते चांगले काढा,बापुंनी कोणालाही हात दाखवला,तर तो आशिर्वादच दिला असेच समजा. असा दुसर्यांशी करत असलेल्या तुलनेचा पाश स्वाहा करता आला पाहिजे. 
२) देवादेवांमध्ये तुलना करणे.
विष्णू चांगला की शिव चांगला, लक्ष्मी चांगली की पार्वती चांगली, उजव्या सोंडेचा गणपती कडक , डाव्या  सोंडेचा गणपती नरम, सिद्धीविनायक धन,ऐश्वर्य देतो म्हणुन त्याच्या कडॆ मोठ्या रांगा, रिद्धीविनायक भक्ती देतो , ती कोणालाच नको असते त्यामुळॆ त्याच्याकडॆ कोणीच जात नाही. अश्या प्रकारची देवादेवांमधील तुलना करु नका. आपला बाप तो आपला बाप एव्हढेच लक्षात ठेवा. 
३) देव आणि गुरु ह्यांची तुलना करणे.
नेहमी गुरु निवडताना पवित्र गोष्टच निवडा. समजा उद्या डुक्कराची विष्ठा आणुन त्याला गुरु म्हणुन पुजायला गेलात तर ते गुरु होणार का? नक्कीच नाही. जर मनुष्याला गुरु मानायचे नसेल तर ग्रंथाना गुरु माना. 
 कलियुगात प्रत्येक गल्लीत अनंत कोटी ब्रम्हांड नायक झाले आहेत.ह्याचे कारण आपण मातृवात्सल्यविंदानम मध्ये वाचतो. त्यात कलीने स्पष्ट सांगितले आहे, की त्याला ढोंगी यतीच प्रिय आहेत, त्यामुळे त्यांचीच सर्वत्र चलती आहे. 
सद्गुरु तत्त्व व परमात्मा ह्यांच्यात कधीच भेद मानता कामा नये. तिथे आपला भेदाभेद (भेद व अभेद दोन्ही एकत्र) भाव असला पाहिजे. भेदाभेद म्हणजेच सद्गुरुंचे पुजन करताना परमात्मा व सद्गुरु हे एकच आहेत हा भाव ठेवणे म्हणजे अभेद व सद्गुरुंची सेवा करताना सद्गुरु हे मानव आहेत असे मानून सेवा करणे  हा भाव म्हणजे भेद. 
हा भेदाभेद कसा असतो ते साईसच्चरितातील कथांवरुन लकशात येते. जेव्हा बाबांचा हात भाजल्याची बातमी चांदोरकरांना कळते तेव्हा ते नुकतेच जेवायला बसलेले असतात तरी ते जेवण तसेच सोडुन लगेच  त्याकाळातील प्रसिद्ध डॉक्टर परमानंद ह्यांना घेवुन शिर्डित येतात.बाबा त्या डॉक्टरांकडुन उपचार करुन घेणार नाही हे माहित असुनही त्या डॉक्टरांना नाना शिर्डित १० दिवस थांबवुन ठेवतात, त्यांची त्या काळात एका दिवसाची फी १००० रुपये होती ती सुद्धा नानांच देतात. इथे नानांनी हा विचार नाही केला की बाबा तर साक्षात  परमात्मा आहेत त्यांना काय गरज आहे डॉक्टरची? बाबांच्या चालण्याच्या वाटेवरील काटे, दगड नेहमी नेवासकर बाजुला काढत का ? तर बाबांना लागु नये म्हणुन. बाबांना पिठ दळताना बघुन चार बायका धावुन येतात व स्वत: दळु लागतात , बाबांना त्रास होऊ नये म्हणुन .. 
म्हणजे पुजा करताना जरी ह्या सर्व भक्तांचा बाबा म्हणजेच देव हा भाव असला तरी देखील सेवा करताना बाबा माणुस आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणुनच ते सतत काळजी घेताना दिसतात. हा भेदाभेद भाव . 
आपण काय करतो तर पुजन करताना भेद करतो म्हणजे सद्गुरुंना मानव समजतो, गुरुला काय कळते आहे कसेही केले तरी चालेल हा भाव असतो तर सेवा करताना अभेद मानतो म्हणजे त्यांना देव समजतो, म्हणजे देवासमोर त्याला मी सेवा करताना दिसेन अशी सेवा करायला धडपडतो. आम्ही आमच्या सोयीनुसार आम्हांला पाहिजे तेव्हा भेद मिटवतो व आम्हांला पाहिजे तेव्हा अभेद ठरवतो. 
सेवा करताना कसे वागायचे ते साईसच्चरितात २३ व्या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे की,
 "गुर्वाज्ञा जेथे स्पष्ट युक्तायुक्त वा  इष्टानिष्ट , हे विचारी तो शिष्य नष्ट"
बोकड कापायचा आहे मग कापायचाच आहे , सर्पदंश झाला तरी बाबांना सोडुन कुठेही जाणार नाही मग जीव गेला तरी चालेल हा भाव म्हणजे भेदाभेद. 
४) शेवटचा पाश म्हणजे मी आणि माझा सद्गुरु ह्यांच्यामध्ये तुलना करणे.
स्वत:च्या आयुष्यात जरा बघा की तुम्ही किती वेळा सद्गुरुंची परीक्षा घेत असता? तुमच्या परीक्षेत  सद्गुरु pass झाले तर तो सद्गुरु चांगला जर fail झाला तर तो सद्गुरु बाद. मग दुसर्या सद्गुरुकडे धाव. 
हा सद्गुरु माझा आहे व तो माझ्यासाठी जे श्रेयस्कर तेच देणारा आहे हा भाव आपण किती जण ठेवतो ?  बापुंना सांगितले पण बापु माझे कामच करत नाहीत.. अश्या प्रकारची सद्गुरुंची परीक्षा घेणे थांबवा .
हे जे चार पाश आहेत ते तुम्हांला जीवनात यशापासुन लांब करतात.अश्या ह्या चार पाशांचे बंध जिने पुर्णपणे तोडुन टाकले ती म्हणजे मीनावैनी. मीनावैनीवरिल documentry video चे काम होत आले आहे.लवकरच सगळयांना हा video पहायलाही मिळेल.तिला ज्या दिवशी तिचा देव गवसला त्या दिवशी ती पुर्णपणे स्वाहाकार झाली. 


जेव्हढ्या प्रमाणात तुम्ही मनापासून मंत्र म्हणता तेव्हढ्या प्रमाणात हे चार पाश ढिले होत असतात.एक  लक्षात ठेवा सद्गुरूंनी दिलेला मंत्र हा नेहमी  स्वाहाकार मंत्र असतो. हे चार पाश ढिले झाल्याशिवाय बंधनातून मुक्तता होऊ शकत नाही.
बंधन म्हणजे काय ? तर स्वतःचे घर आहे पण त्यात  राहता येत नाहे, अन्न आहे पण खाता येत नाही ही बंधनेच आहेत.  म्हणून ह्या चार पाशांपासून मुक्तता व्हायला पाहिजे आणि ही  मुक्तता कोण करते?  तर साक्षात अनसूया . 

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.