Latest News

Thursday Discourse (17-02-2011)


These are the important points summarized from Parampoojya Sadguru Shree Aniruddha Bapu's discourse delivered on Thursday, 17th February 2011 at Shree Harigurugraam. 


हरि ॐ

सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंचे श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन. (१७-०२-२०११)
सुचना : पुढच्या गुरुवार पासुन वालुकेश्वराचे इथे पुजन केले जाईल. व तिस‍र्या गुरुवारी सर्वांना बेल पत्र वालुकेश्वरावर अर्पण करता येतील.

“जयन्ति मंगला काली, भद्रकाली कपालीनी…” 
गेल्या गुरुवारी आपण कपालीनी हे नाम बघितले. ह्या नामाच्या बाबतीत एक सुंदर गोष्ट सांगायची राहीली होती. वाल्मिकी रामायणामध्ये राम वनवासात गेल्यावर भरत अयोध्येत राह्ताना शपथ घेतो , की १४ वर्षाचा काळ संपल्यानंतर जर रामाचे चरण दिसले नाही, तर तो अग्नी काष्ट भक्षण करेल. १४ वर्षाचा काळ संपायची वेळ जवळ आली आहे हे बघुन भरत अग्नि प्रज्वलित करतो. तेव्हा हनुमत येवुन सांगतात, की श्रीराम पुष्पक विमानातुन येत आहेत .

हे ऐकून आनंदीत होवुन भरत म्हणतो … हनुमंता, “तुला १ लाख गाई, १ हजार ग्राम (गावे), १६ अतिशय सुंदर , कुलवंत सुशिल अश्या तरुणी (सकुंडला) अर्पण करतो.” सकुंडला ह्याचा अर्थ ज्यानी इथे स्त्रीया म्हणुन चुकीचा घेतला , ते हनुमंताने स्त्रीया स्विकारल्या असा अर्थ काढतात. इथे सकुंडला म्हणजे षोडशी कला. जी श्री विद्या आहे त्याचा जो मंत्र आहे त्याला षोड्षी कला आहेत. त्यातली १५ अक्षरेच (कला) मनुष्या ला माहीत असतात. ह्यातील १६ वी कला फक्त हनुमंतच सर्व सामान्य भक्ताला देवु शकतो. तर जो दत्तात्रेयांच्या सांगण्या नुसार वागतो अश्या तपस्व्याला श्री दत्तात्रेय ही १६ वी कला (अक्षर) देतात व विद्या पूर्ण करुन घेतात.

हनुमंत व दत्तात्रेय ह्या दोघांच्या मध्ये आहे ते श्री सिद्धेश्वरी स्वरुप. म्हणजेच आदिमातेचे स्वरुप. ही श्री विद्या मिळावी अशी इच्छा असणारे मुमुक्षु जेव्हा सद्गुरु मंत्राचे सप्रेम नैष्ठिक अनुष्ठान (म्हणजे १०८*१२ वेळा जप) करतात, तेव्हा ही आदिमाता त्यांना हे १६ वे अक्षर बहाल करते.
परंतु श्री दत्तात्रेय व आदिमाता महीषासुरमर्दिनी ही श्री विद्या भक्ताला देताना हनुमंताच्या हातुनच देतात. सुर्याने हनुमंताकडुन ही विद्या सिद्ध करुन घेतली व भरताने त्याचे प्रमाण पत्र दिले. षोडषी विद्येचे प्रमाण पत्र भरताकडुनच प्राप्त होवु शकते.

सकुंडला म्हणजे आञा चक्रातील कुंडला शक्तिच्या धाकट्या बहिणी. हनुमंतला सुद्धा जी पुर्णत्व आणते ती कपालिनी. हनुमंतला श्री विद्येचे पुर्णत्व देणारी शक्ति ती कपालिनी हे आपल्याला ह्या नामाचे गायन करताना लक्षात आले पाहीजे. भरत राम भेटीच्या आधी हनुमंत भेटतो.. बिभिषण राम भेटीच्या आधी हि हनुमंत बिभिषणाला भेटतो.. राम - रावण भेटीच्या आधीही रावणासारख्या नीचाला सुद्धा हनुमंत आधी भेटतो. पण बिभिषणा साठी तो आश्वासक म्हणून येतो तर रावणासाठी तो लंका दहन करणारा म्हणून येतो. आम्हांला ठरवले पाहीजे हनुमंताला आमच्या आयुष्यात कसे आणायचे ते..

ह्याच बिभिषणाला हनुमंताने षोडशी विद्या दिली. कंठ कूप चक्राचे स्थान बिभिषणाला मिळाले.. कारण "तुम्हरो मंत्र बिभिषण माना..." हनुमंताचा शब्द बिभिषणाने मानला.. हनुमंताला सद्‌गुरु मानले म्हणून. अश्या हनुमंताला श्री विद्या देणारी ती कपालिनी. कपालिनी नंतर येते ते दुर्गा स्वरुप.

दुर्गा : अतिशय उग्र रूप, हिला हजार हात आहेत. दुर्गा.. दुर्गति हारिणी..मनुष्याला स्वत:च्या कुकर्मामुळे जी दुर्गति प्राप्त होवु शकते ती दुर्गती हारिणी.
          ही माझी आई. तीच अनसुया, तीच गायत्री, तीच सिद्धेश्वरी महिषासुरमर्दिनी. हीचे वर्णन खुप सुंदर केले आहे . " दुर्गा दुर्गपारा सारा भवानी.."

* · दुर्गा म्हणजे दुर्गति हारिणी..
* · दुर्गपारा म्हणजे अतिशय दुर्गम( Almost Impossible) असे जे चांगले आहे ते प्राप्त करुन देणारी. हनुमंतची समुद्र पार करताना एका तीरापसुन दुसर्‍या तीरावर घेतलेली उडी म्हणजे दुर्गपारा.
* · सारा म्हणजे ह्या विश्वात जी जी पवित्र गोष्ट .. कुठल्याही सूक्ष्म रुपापासुन ते विस्तृत रुपापर्यंत तर कुठल्याही विस्तृत रुपापासुन ते बीज रूपापर्यंत जे जे पवित्र ते ते सर्व देणारी ती सारा.
* · भवानी ह्या नावाचे १००८ अर्थ आहेत . पण आपल्यासाठी एकच अर्थ तो म्हणजे मुलाकडुन यशस्वी पराक्रम करुन घेणारी आई.

दुर्गा ह्या एकाच नामातुन ती जे अशक्य ते तुमच्या कडुन शक्य करुन घेवु शकते . शिवाजीची पाठराखण करणारी भवानीचीच तलवार होती. व सद्गुरु होते ते रामदास जे हनुमंतचीच ऊपासना करत. शिवाजीने जे मिळवले ते मलाही मिळु शकते फक्त त्यासाठी ती दुर्गा आहे हे मला प्रथम जाणले पाहीजे.

आमच्या अनेक पापातुन वाचवणारी ती एकमेव दुर्गति हारिणी आहे  तिला अनसुया म्हणा, गायत्री म्हणा, कपालिनी म्हणा, अंजनीमाता म्हणा ती शेवटी एकच .
अतिशय प्रेमाने सगळे पुजन व गजर करत आहेत, पण हे फक्त उत्त्सवापर्यन्त न ठेवता आयुष्यभरासाठी करा.

मी कितीही पापी असेन तरी माझी मोठी आई बसली आहे हे लक्षात ठेवा. दुर्गति म्हणजे दलदलीत फसणे. ह्यातुन बाहेर काढते ती दुर्गा ..जी दलदलच नाहीशी करते . इतके हे सुंदर नाव आहे. हे तिचे एकटीचेच सामर्थ्य आहे म्हणुन आम्हाला दुर्गा हे नाव अतिशय पवित्र असले पाहीजे. दुर्गा प्रथम बलिकेच्या रुपात प्रगटली ती म्रुकुंड ऋषींच्या म्हणजेच कपिल मुनींच्या आश्रमात. जिथे ती सगळ्या देवांना दुर्गतीतुन बाहेर काढते.

मातृवात्सल्यविंदानम हा ग्रंथ खरंच प्रेमाने वाचा. सगळे नियम बाजुला सारुन मी (प.पु.बापु) हा ग्रंथ तुम्हाला दिला आहे.

सौम्य वत्सला अशी अनसुया जी बलिकेचे रूप धारण करते तीच दुर्गा रुप ही धारण करते. हिनेच कलि पुरुषाला एका भागाने निष्क्रिय केले. आणि त्यासाठी शस्र वापरले तेही एका भक्ताने पायावर वाहीलेले पळ्साचे पान. ही त्या दुर्गेची ताकत !!  जी कपालिनी तीच दुर्गा ..जी प्रगट होते अनसुयेमुळे .त्यामुळे ह्या गजरात आपोआपच अनसुयेचेही स्मरण होते.

स्वाहा हे ही अनसुयेचेच स्वरुप ..म्हणजेच ह्या गजरात फक्त रण चंडिकेचीच रुपे नाहीत तर ह्या वत्सलेची पण रुपे आहेत. ह्या गजराला भाषेचीही कुठलीच अडचण नाही. इथे अजुन एक नाव आठवते ते नव दुर्गा..स्कंधमाता, कुष्मांडा ... अश्या प्रकारची तिची नऊ नावे आहेत. मृकंड ऋषींच्या नऊ शिष्यांनी ह्या दुर्गा स्वरुपाची तपश्चर्या करण्यासाठी मृकंड ऋषींकडे जप देण्याची विनंती केली.तेव्हा मृकंड ऋषींनी त्यांना प्रत्येकाला मंत्र दिले.त्या तपश्चर्ये मधुन त्यांच्यासमोर जी नऊ स्वरुपे प्रगट झाली ती म्हणजे नव दुर्गेची रुपे. आपण कोणी तपस्वी नाही, म्हणुन तप न करता कोण प्रगट्ली होती? तर अनसुया..म्हणुन आपण तिचेच स्मरण करुया.

"आई ती आई बहु मायाळु, लेकुरालागी अति कनवाळु ।
परि लेकरेच निघता टवाळु,कैसा सांभाळु करी ती ॥ "


                  ह्या ओवीचे proof फक्त मीच देवु शकतो. मी (प.पू.बापू) इतक्या टवाळ्क्या करुनही मला आईने सांभाळ्ले. म्हणून ह्याची १ अब्ज टक्के गॅरेंटी मीच देऊ शकतो. आईसारखे दिसणारे अनेक असतात परंतु खरी आई एकच असते. म्हणूनच आईसारख्यांकडे फिरत बसू नका. माझी (प.पू.बापू) आई, तुमची आई व्हावी म्हणून मी (प.पू.बापू) आलो आहे. ती जी मोठी आई आहे, ती तुम्हां सर्वांची व्हावी, तुम्ही स्वीकारावी, जेणेकरून तिला तुम्हांला बाळ म्हणून स्वीकारणे सोपे होईल .आणि ह्यासाठी लागणारा व्हिसा मीच(प.पू.बापू) मान्य करु शकतो. युगानुयुगे हे असेच आहे, तिने ठरवले म्हणून..ही दुर्गा तुमची आई व्हावी म्हणुन पेन घेवुन मी (प.पू.बापू) बसलो आहे, स्टॅम्प घेऊन नंदाई बसली आहे आणि सील लावायला सुचितदादा बसले आहेत.

आम्हांला ह्या दुर्गेला आई करायचे आहे ..आई ही मानायची गोष्ट नसते. आईचा उत्सव प्रेमाने साजरा करा, तिचा ग्रंथ प्रेमाने वाचा. ही सुवर्ण संधी आम्हांला मिळाली आहे.

"सद्‌गुरुसारिखा असता पाठीराखा... इतरांचा लेखा कोण करी.."
एका सद्‌गुरु तत्वाला शरण गेल्यावर काय काय मिळू शकते ते ह्या दुर्गा नामातून कळ्ते.

हीचेच पुढचे नाव आहे क्षमा. क्षमारुपाने ही गुरुक्षेत्रममध्ये उभी आहे. जोपर्यंत दुर्गा स्वरुपाला आम्ही आई मानत नाही,तोपर्यंत क्षमा स्वरुप आमच्या आयुष्यात येऊच शकत नाही. पुढ्च्या वेळेस आपण बघायचे आहे ह्या क्षमा स्वरुपाकडून क्षमा कशी प्राप्त करून घ्यायची व आपण श्रद्धावानांनी पुरुषार्थ कसा सिद्ध करायचा.
हरि ॐ


(Courtesy: http://www.manasamarthyadata.com/)

2 comments:

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.