Latest News

आईची पहिली भेट


         जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे प.पू.नंदाई ची प्रत्यक्ष भेट. या वर्षीच्या "आत्मबल" च्या वर्गाला निवड झाल्यापासून ह्या क्षणाची अनामिक ओढ लागली होती .
"आत्मबल" विकास वर्गाच्या सहा महिन्याच्या प्रशिक्षण काळात प.पू.नंदाई सोबत असणार ह्या नुसत्या कल्पनेनेच मन सतत आईभोवती बागडत होते .

१७ जुलै २०१० हा माझ्यासाठी आणि माझ्या १२० सख्यांसाठी अविस्मरणीय दिवस होता. प.पू.नंदाईचे लाभेवीण प्रेम,तिचे " आईपण " आज आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवले. वर्गात उपस्थित असलेल्या प्रत्येकीचा आज जणू पुनर्जन्मच होता.

             आज सर्वाचे वयाचे बंध तुटून पडले होते, आम्ही सगळेच तिची बाळे बनलो होतो. प्रत्येक लेकीसाठी असलेली तिची तळमळ,निष्काम प्रेम, आपले बाळ कधी चुकू नये म्हणून प्रेमाची शिस्त हे सर्व काही तिच्या प्रत्येक उच्चारातून हृदयाला भिडत होते.तिचा प्रत्येक शब्द मनावर कोरला जात होता.
आतापर्यंतच्या जीवनातील चांगले वाईट क्षण आठवून प्रत्येक सखीने आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली होती. पहिल्याच दिवशी आपल्या पदराचा एक एक तुकडा आपल्या प्रत्येक लेकीला देऊन तिने सर्व चिंतामधून आम्हाला मुक्त केले.

"आई" ह्या दोन अक्षरी शब्दात सामावलेले सर्व विश्वातील अपरंपार प्रेम आम्ही सगळ्या जणी अनुभवत होतो.
Her love is something that no on can explain,
It is made of deep devotion and of sacrifice and pain, It is endless and unselfish.
         आतापर्यंतच्या जीवनात आम्ही कसे वागलो त्याचे Analysis  करायला आईने आम्हाला शिकवले.
आम्ही आजपर्यंत कश्या होतो हे एका सुंदर बोधप्रद चित्राद्वारे तिने आम्हाला सांगितले व हे चित्र आपल्याला आत्मबल वर्गाच्या प्रशिक्षण काळात पूर्णपणे बदलायचे आहे व हे बदलले जाणारच हा आमच्यावरचा विश्वासही तिने दाखविला.
प.पू.नंदाईच्या वास्यल्यातून निर्माण झालेला आत्मबल वर्गाच्या प्रशिक्षणाचा काळ म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी कळीचे रुपांतर सुंदर फुलात होण्याचा काळ.  कारण,

  • स्त्री शक्तीचा सुंदर अविष्कार म्हणजे हा आत्मबल वर्ग.

  • स्त्री म्हणून माझे माझ्या कुटुंबियांशी, आप्तांशी, प्रेमाचे संबंध वाढवायला शिकवणारा हा आत्मबल वर्ग.

  • सतत दडपणाखाली जगात आलेल्या स्त्रीला स्वत:मधील कलागुणांची ओळख करून देणारा हा आत्मबल वर्ग .

  • मर्यादा मार्गाने वाटचाल करून उत्कृष्ट प्रपंच कसा करायचा हे शिकवणारा हा आत्मबल वर्ग .

  • सध्या सोप्या शब्दांच्या माध्यमातून इंग्लिश भाषेची भीती घालवून आत्मविश्वासाने जगात वावरायला शिकवणारा हा आत्मबल वर्ग.

  • स्व-च्या कोशातून बाहेर काढून स्त्रीला एकसंघ वृत्तीने कार्य करायला शिकवणारा हा आत्मबल वर्ग.
आत्मबल वर्गाच्या पहिल्याच दिवशी प.पू.नंदाईने आम्ही सगळ्या तिच्या लेकी आमच्यातले वाईट गुण टाकून चांगले बनणारच ह्यावर १०८ % च नाही तर अगदी १,००,००८% इतका विश्वास दाखवला.
प.पू.नंदाई च्या वास्यल्याचे, प्रेमाचे वर्णन करायला खरतर कुठलेही शब्द अपुरेच पडतील. म्हणून फक्त एवढेच म्हणावेसे वाटते -
" बाळ मी तुझाची तुझे गुण गातो, तुझिया स्वरांनी सदैव तृप्त होतो.
असाची असू दे मी तुझिया चरणाला, तू तार नांदे या बालकाला. "

5 comments:

  1. खरच नमिता आई बरोबरचा तो दिवस अविस्मरणीय आहे आपली आई खरच खूप greate आहे.
    तिचा एक एक शब्द कानावर पडतोय. तिचाच चेहरा समोर येतोय. आणि तिच्या बद्दल जेव्डे काही लिहू तेवडे शब्दच अपुरे पडतील.
    आईने तिच्या पदराचा तुकडा आपल्या लेकीला देऊन तिला चिंतामुक्त केले हेच खरे आहे. आणि पुढचे सहा महिने आईच्या पदरात काढायचे आहेत खरच खूप चं अनुभव येणार पुढच्या सहा महिन्यात. खूप enjoy करायचा आई बरोबर आपण सगळ्यांनी.
    हरी ॐ आई.

    ReplyDelete
  2. खुप छान लिहले आहेस..नमिता...आईचा एक एक शब्द आठवला...पहिल्याच दिवशी आपण इतके सुखावून गेलो..सहा महिन्यात काय काय होईल ना!!!!!!!

    ReplyDelete
  3. हरी ॐ नमिता खरेच खुपच सुंदर लिहले आहेस.तू इतके सुंदर लिहले आहे न मला काही सुचत नाही उत्तर देण्यास त्या आपल्या आई बद्दल लिहले किती खुपच कमी आहे ती आपली वस्ताल्याची मूर्ति आहे .सहा महीने तुम्ही मजा करा खुप आणि नमिता तुला खुप काही नविन शिक्न्यास भेटेल यात प्रश्नच नाही.श्री राम .

    ReplyDelete
  4. खरच खूप छान अनुभव, तुम्ही आई ह्या शब्दाला अनुभवा, आत्मबलच्या वर्गात मनसोक्त जगा आपल्या "लाडक्या कनवाळू आईसोबत" असेच आमच्यासोबत share करत रहा Njoy... हरी ॐ

    ReplyDelete
  5. Hari Om Dr.Namita...That was the most memorable day for all of us.....And I cant wait for the next session.....We are truly blessed....You are a great writer....Keep up the good work.Shri Ram....

    ReplyDelete

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.