Latest News

श्रीमद पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्राचा वार्षिक उत्सव

(श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे दिलेली माहिती) ....

ज्याच्या केंद्रभागी पंचमुख हनुमंत आहे. क्षमा हाच ज्याचा मूळ धर्म आहे, अश्या श्रीमद पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्राचा वार्षिक उत्सव श्री अनिरुद्ध गुरूक्षेत्रम येथे हनुमान चलीसाच्या पठणाने संपन्न होत आहे .
ज्यांना श्रीफळ अर्पण करून आपल्या मनातील पशुवृत्तीचा बळी द्यायची इच्छा आहे, तसेच जे पापी आहेत त्या प्रत्येकाला श्रीमद पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्र क्षमा करणारच, हे सदगुरू श्री अनिरुद्धांचे वचन
आहे.

मी क्षमापित होऊन श्रद्धावान बनण्याची संधी या उत्सवातून मला मिळते. ही माझ्या सदगुरू अनिरुद्धांनी माझ्यावर केलेली कृपाच होय.

 म्हणून तिन्ही लोकांमध्ये ज्याची कीर्ती आहे, जो ज्ञानाचा व गुणाचा सागर आहे ,तसेच श्रद्धावानांचा सेनापती आहे, त्या हनुमंताचा संत तुलसीदासांनी हनुमान चलीसामध्ये वर्णिलेला महिमा पाहूया ,

दोहा --
                             " श्री गुरु चरण सरोज रज ,नीज मनु मुकुरू सुधारी,

बरनौ राघुबर बिमल जसु, जो दायकू फल चारी "

संत श्री तुलसीदासजी म्हणतात ,मी सद्गुरूंच्या चरण धुळीने माझ्या मनोरूपी दर्पणाला स्वच्छ करतो . आणि धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ प्रदान करणाऱ्या रघुवीर श्रीराम प्रभूंच्या निक्खळ यशाचे वर्णन करतो. माझा देह बुद्धिहीन आहे हे जाणून मी पवनकुमार हनुमंताचे स्मरण करतो, व त्या पवनकुमारला प्रार्थना करतो,की हे पवनकुमारा , तू मला उत्तम बळ, उचित बुद्धी दे,व मला विद्या प्रदान कर.तसेच माझे क्लेश व विकार ह्यांचा नाश कर.

संत श्री तुलसीदास विरचित हनुमान चलीसा मधील प्रत्येक शब्द, प्रत्येक चरण मंत्ररूप असून मनाला उचित दिशा देणारे तसेच मनोबल वाढवणारे आहे.
हनुमंत हा श्रीरामांचा दास आहे तर सीतामैयाचा तात आहे. माझ्यासाठी तो भक्तसखा आप्त आहे व प्रत्यक्ष देवही आहे.
रुद्रावतार असलेला हनुमंत माझ्या सर्व वाईट बाजूंचा संहार करणारा, माझी सर्व पापे, पापबीजे व पापपरिणाम ह्यांचा सर्वथा नाश करणारा व सर्वाना वश करणारा आहे.

माझे अध्यात्मिक, आधिदैविक, व आधिभौतिक अश्या पापत्रयांचे निवारण करणारा हनुमंत आपल्या बाळांचे रक्षण करतोच.
  • हनुमंत हा चिरंजीव असून माझ्या देहातील महाप्राण आहे.तो अभेद्य व अपराजित आहे.त्याचे प्रत्येक अंग वज्र आहे. म्हणून त्याला वज्रदेह, वज्रनेत्र,वज्रकर प्राप्त झाले आहेत. हनुमंताच्या हृदयात व मुखात नित्य रामनाम असल्यामुळे त्याचे श्री रामप्रभुंशी नित्य अनुसंधान आहे.
  •  म्हणून हनुमंताचे ध्यान करून जेव्हा मी रामनाम जपतो,तेव्हा मी ही परमात्म्याशी सहज अनुसंधान साधु शकतो. हा हनुमंताच्या भक्तीचा महिमा आहे.तो अभेद्य व महासामर्थ्यवान असूनही श्रीरामभक्तीत तत्पर आहे. व श्री रामाला नित्य शरण आहे.म्हणूनच हनुमंत हा प्रत्येकाचा आदर्श आहे .
त्याप्रमाणे माझे आचरण ठेवण्याचा सातत्याने प्रयास हीच माझी खरी भक्ती आहे. ह्याचे मला नित्य स्मरण ठेवले पाहिजे. हनुमंत हा देव,दानव,यक्ष,राक्षस,भूत,प्रेत,पिशाच्च,दुष्ट ग्रह ह्यांना सर्व दिशांनी बांधून ठेवणारा साक्षात रुद्रावतार असून माझ्या सर्व प्रकारच्या भयाचे निवारण करणारा आहे.
हनुमंताने संजीवनी नावाची औषधी आणून जसे लक्षुमणाचे प्राण वाचविले तसेच माझ्या जीवनात नित्य संजीवनी उत्पन्न करणाऱ्या हनुमंताचे स्मरण म्हणजेच हनुमानचलीसाचे पठण ही माझ्यासाठी नित्य संजीवनीच आहे.
म्हणून वर्षातून एकदा जरी मी हनुमान चालीसाचे १०८ वेळा पठण केले, तर पुढील वर्षभराची संकटे निवारण होतात, ही सदगुरू श्री अनिरुद्धांची ग्वाही आहे.

जो हनुमान चालीसाचे नित्य पठण करतो, त्यास श्री रामाचे दास्यत्व व सख्यत्व प्राप्त होते, असे साक्षात गौरीपती शिवाचे अभिवचन आहे.

मनुष्याच्या जीवनातील 'दुर्गमकाज' श्री हनुमंत जगज्जेता बनून सुगम करतो, ते गुरुक्षेत्रम मंत्राच्या श्रद्धापूर्वक पठणातूनच.

श्री गुरूक्षेत्रम मंत्र महारुद्र हनुमंताचे भक्तकोमल सूक्ष्म रूप आहे. तर तात हनुमंताचे वत्सल स्थूल स्वरूप आहे.आणि भीमकाय आकाराच्या तसेच वज्रांग देहाच्या व अतुलनीय ताकदीच्या श्री हनुमंताचे अगदी सामान्य मनुष्याला सहजपणे पेलणारे तरल स्वरूप आहे. तेही मनुष्य स्वत: कितीही छोट्या आकाराचा,कमकुवत देहाचा ,कमजोर ताकदीचा असला तरीही.

अश्या कपिश्रेष्ठ भक्त श्रेष्ठ व रुद्रस्वरुप असलेल्या हनुमंताला प्रार्थना करूया की , हे महावीरा, विक्रमी बजरंगबली, माझ्यातील कुमतीला नष्ट कर. व मला सुमती देवून साहाय्य कर.श्री रामनामतनु असलेल्या अनिरुद्ध चरणी माझी मती स्थिर ठेव.

हे केसरीनंदना तुला माझी प्रार्थना आहे की,श्री रामनामतनु असलेल्या सदगुरू श्री अनिरुद्धांच्या दोन्ही श्रेष्ठ शक्तींसह, तू माझ्या हृदयात निवास कर.व मला श्री रामनामतनु असलेल्या सदगुरू श्री अनिरुद्धांच्या चरणी स्थिर कर.
 
---  हरी ॐ

No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.