Latest News

Shree Aniruddha Gurushekrtam Mantra


प्रत्येक सदगुरू भक्ताला वाटत असते की आपल्या गुरूने आपल्याला कानमंत्र म्हणजेच गुरुमंत्र दयावा. पण प.प. पूज्य बापूंनी परमात्म्याच्या प्रत्येक भक्तासाठी एक महन मंगल असा मंत्र जाहीर केला. तो म्हणजे गुरुक्षेत्र मंत्र .

हा मंत्र प्रत्येकासाठी गुरुमंत्रच आहे .त्याचा स्वीकार करावा की नाही ह्याचे स्वातन्त्र प्रत्येकाला आहे.

गुरुक्षेत्र मंत्राचे महत्व :


 गुरुवार दिनांक १ एप्रिल २०१० रोजी प.प.पूज्य बापूंनी ह्या मंत्राची महती सांगीतली. बापू म्हणाले "हा मंत्र मी स्वत: सिद्ध केला आहे , असा मंत्र आजपर्यंत झाला नाही आणि ह्यापुढेही होणार नाही .
  • ह्या मंत्राच्या तीन रचना / अवस्था आहेत .
१) गुरुक्षेत्र बीजमंत्र ( बीजा अवस्था )

२) गुरुक्षेत्र अंकुर मंत्र ( बीजाची वृक्ष बनण्याची अवस्था )

३) गुरुक्षेत्र उन्मीलन मंत्र (कळीचे फुल - फुलाचे फळ - फळापासून बीज होण्याची क्रिया )

हा पुढच्या काळासाठी तारक मंत्र आहे. ह्या मंत्राचे चिंतन करत मनन करायच आहे . ह्या मंत्राच्या पलीकडे कुठलाही मंत्र जाऊ शकत नाही. हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. हा मंत्र सर्वांच्या खुणा पटविणार आहे.

बीज - अंकुर - उन्मीलन ह्या तीनही अवस्था ॐ श्री दत्तगुरवे नमः ह्या महन मंगल महामंत्राने जोडल्या गेल्या आहेत .

उगम आणि सिद्धी :
हा मंत्र ज्या दिवशी सर्व भक्तांसाठी सिद्ध झाला तो दिवस सर्व भक्तांसाठी अतिशय मंगल आणि पवित्र होता. हा दिवस म्हणजेच ,

  • चैत्र पौर्णिमा
  • हनुमान जयंती
  • श्री त्रिविक्रम ची स्थापना   षोडोपचार 
अश्या ह्या महापवित्र दिवशी प.प. पूज्य बापूंनी आपल्या भक्तांसा ठी हा गुरुक्षेत्र मंत्र खुला केला. प.प. पूज्य बापू म्हणाले, " हा पवित्र मंत्र कोणत्याही देवी - देवतेचे पूजन करते वेळी घेता येतो .( जर त्या देवतेचा मंत्र माहित नसेल तर  सोळा वेळा ह्या गुरु मंत्राचे पठण केल्यास त्या देवतेच्या षोडशोपचार पूजनाचे फळ प्राप्त होते.) ह्या मंत्राने केलेले पूजन हे परीपूर्ण होतेच. हा मंत्र कधीही उच्चारता येईल .

आम्ही आमच्या जीवनात नेहमी  देवाचे बोन्साय करत असतो व त्यामुळे देवा वरच्या विश्वासाचे ही बोन्साय करतो. परिणामी मग आमच्या जीवनाचेही बोन्सायच होते .

गुरुपरंपरेच्या आज्ञेने हा गुरुक्षेत्रम मंत्र स्वतः बापूनी सिद्ध केला आहे. कोणासाठी ? तर बापूंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक श्रद्धावान मित्रांसाठी.

आदिमातेचे त्रिधा स्वरूप , काळाचे भूत- वर्तमान-भविष्य हे त्रिविध स्वरूप , जीवनाच्या बाल- तारुण्य-वार्धक्य ह्या तीनही अवस्था सर्व काही ह्या तीन मंत्रानी बनलेल्या गुरूक्षेत्रम मंत्रा मधेच आहेत.

ज्यांना हा मंत्र गुरुमंत्र म्हणून स्वीकारायचा आहे, त्यांनी आज रात्री झोपायच्या आधी किंवा उद्या रात्री किंवा १ महिन्यानंतर रात्री किंवा १ वर्षानंतर रात्री किंवा कधीही रात्री झोपायच्या आधी शांत बसून हात जोडून म्हणा , " हे अनिरुद्धा, ( हे बापुराया ) आजपासून हा मंत्र माझा झाला ( मी स्वीकारला ) .

बापू पुढे हेही म्हणाले की , " तुम्ही जेव्हा हा मंत्र स्वीकारत असाल त्या क्षणी मी तिथे हजर असेन. "

हरी ॐ

3 comments:

  1. good work namita

    Reshmaveera Harchekar

    ReplyDelete
  2. Thank you very very very much as I was eagerly searching for this Gurumantra since I had heard P.P.Bapu's pravachan & since then I wasn't able to go Shree Aniruddha Guru Kshetram & I wanted to gift one from the Bapu Parivar this Gurumantra as his Birthday Gift.
    So,wholeheartedly thank you very very very much.
    Hari Om.
    Pradnya

    ReplyDelete
  3. HARI OM,
    Thank you so much namita tai. ur really great human being.

    ReplyDelete

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.