Latest News

Namaskar


 

मनाला नम: करणारा, मनाची दिशा बदलणारा तो नमस्कार. ( Namaskar changes the direction of mind towards parmatma .)

हिंदू शास्त्रानुसार नमस्कार एकूण ११ प्रकारचे आहेत.
१) द्विदल नमस्कार : आपण जेव्हा हात एकमेकांना जोडतो, तेव्हा आपल्या शरीरातील सर्व शक्ती केंद्रे एकत्र येतात.  म्हणून हा नमस्कार एका हाताचा न राहता पूर्ण देहाचा होतो.
मनोभाव : मी माझे मन, बुद्धी, व देह ह्या सर्वांनी एकत्र येऊन त्या महाप्राण हनुमंताला , जो सर्वांत केंद्रस्थानी आहे, त्याला नमस्कार करणे.


२) आज्ञानमन :  हाताचे अंगठे हनुवटी खाली म्हणजे विशुद्ध चक्राच्या रेषेत ठेवून दोन्ही हातांच्या तर्जनी आज्ञा चक्राला टेकवून मस्तक झुकवून केलेला नमस्कार .

                               

३) शारण्य नमन : ह्या अवस्थेमध्ये मन आणि बुद्धी ह्याच्यावरील शरीरातील इडा आणि पिंगला ह्या दोन्ही नाड्याचा प्रभाव समानपणे दिसतो. (इडा , पिंगला ह्या उष्ण आणि शीत नाड्या आहेत.)


मनोभाव : जी काही इष्ट देवता असेल त्यांचे नाव घेवून मी संपूर्ण वीर भावाने ( Veerbhav means , I am ready to fight against any situation arising in my life ) शरण आलो आहे , अशी प्रार्थना केली जाते.

४) साष्टांग नमस्कार : आठ स्थिर बिंदूंनी केलेला नमस्कार. ही आठ स्थाने म्हणजे अष्टधा प्रकृतीची स्थाने. ह्या स्थानांना स्थिर करून आणि मानवासाठी प्रथम माता असलेली ' मही ' म्हणजेच पृथ्वीचा आधार घेवून केलेला नमस्कार. आपली प्रकृती चंचल असते. तिचे अष्टांग स्थिर केल्यामुळे अष्टभाव स्थिर होतात.


मनोभाव : हे माते , माझ्या देह, मन, व बुद्धीतील अस्थिरता नाहीशी होऊन मला स्थिरता प्राप्त होऊ दे .

५) सूर्यनमस्कार : सूर्यनमस्कार हा सर्व नमस्कारांमध्ये श्रेष्ठ मानला आहे. हा नमस्कार कुठलेही नामस्मरण न करतानासुद्धा शरीरातील सर्व स्निग्ध शक्तीकेंद्रे जागृत करतो.
सूर्यनमस्कारमुळे इंद्रिय देवता व महाप्राण शक्ती ह्यांच्यामधील दुवा साधला जातो .


६) चरणरज नमस्कार : रज म्हणजे धूळ , चरणरज म्हणजे पायाची धूळ. चरणावरती मस्तक ठेवून केलेला नमस्कार .


जो नमस्कार करणारा आहे त्याचे मस्तक व ज्याला करणार त्याचे चरण हे एकत्र आलेले असतात, अश्या स्थितीतील सर्व प्रणामांना ' चरणरज नमस्कार' म्हणतात.
मानवाच्या मस्तकाच्या ठिकाणी ब्रम्हरंध्राचे स्थान असते. ब्रम्हरंध्र हे आपल्या शरीरातील परमेश्वरी स्पंदने स्वीकारण्याचे एक सातत्याने जागृत व कार्यरत असणारे एकूण १०८ केंद्रांपैकी प्रमुख व सहज केंद्र आहे.










No comments:

Post a Comment

The Warrior Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by nicodemos. Powered by Blogger.